मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

दैनंदिन राशीभविष्य: या राशीला लागेल नवीन शुभ घटनांची चाहूल; फक्त आज कोणाशीही वाद घालू नका; असा जाईल दिवस

दैनंदिन राशीभविष्य: या राशीला लागेल नवीन शुभ घटनांची चाहूल; फक्त आज कोणाशीही वाद घालू नका; असा जाईल दिवस

श्रावण कृष्ण अष्टमी/नवमी.चंद्र वृषभ राशीत असून गुरूशी लाभ योग करेल.आज दहीहंडी साजरी केल्या जाईल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य .

श्रावण कृष्ण अष्टमी/नवमी.चंद्र वृषभ राशीत असून गुरूशी लाभ योग करेल.आज दहीहंडी साजरी केल्या जाईल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य .

श्रावण कृष्ण अष्टमी/नवमी.चंद्र वृषभ राशीत असून गुरूशी लाभ योग करेल.आज दहीहंडी साजरी केल्या जाईल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य .

आज दिनांक १९ ऑगस्ट२०२२. वार शुक्रवार. श्रावण कृष्ण अष्टमी/नवमी.चंद्र वृषभ राशीत असून गुरूशी लाभ योग करेल.आज दहीहंडी साजरी केल्या जाईल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य . मेष आज दिवस तुम्हाला बरा आहे. चंद्र मन आनंदी ठेवेल. चतुर्थ स्थानातील शुक्र स्त्री वर्गा कडून अकल्पित लाभ प्राप्त करून देईल. संततीची काळजी घ्या. दिवस शुभ. वृषभ आज आर्थिक दृष्ट्या दिवस अवघड आहे. पण अनपेक्षित खर्च झाले तरी आनंद मिळेल. नाव लौकिक वाढेल. प्रवास योग येतील. संतती आनंदी राहील. दिवस शुभ फल देईल. मिथुन अचानक कामासाठी प्रवास योग आहे. भाग्यात शनि ,धार्मिक कार्यात यश देतील. शुक्राचा आनंद दायक वावर तुम्हाला नवीन शुभ घटनांची चाहूल देईल. प्रकृती सांभाळून असा. दिवस मजेत जाईल. कर्क राशीच्या लाभ स्थानातील चंद्र अचानक उलाढाल घडवेल. तुम्हाला काही नवीन जबाबदारी येईल. घरात देखील काम राहील. उत्तम खरेदी कराल .दिवस आनंदात जाईल. सिंह आज दिवस भाग्य दायक असून अध्यात्मिक अनुभव देईल.कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील . आर्थिक लाभ होतील.गाठीभेटी होतील. दिवस सौख्याचा जाईल. कन्या आज दिवस गडबडीचा व कष्टाचा आहे.अंगावर घेतलेली जबाबदारी जास्त ताण देईल. मात्र भाग्य साथ देईल .कुठल्याही प्रसंगात विचलित होऊ नका. जोडीदाराला त्रास राहील. दिवस शांतपणे घालवा. तुला आज दिवस अष्टम चंद्राच्या प्रभावात आहे. गृह सौख्य ,आर्थिक लाभ ह्यात कष्ट होतील. मन उद्विग्न राहील.प्रकृती जपा. नातेवाईक भेटतील. दिवस मध्यम. वृश्चिक आज दिवस कोणाशीही वाद विवाद न करता घालवा. संततिशी संवाद होतील. दिवस ईश्वराची सेवा करण्यात घालवा. आर्थिक बाजू जपा. चांगला दिवस. धनु राशीच्या शश्ठ स्थानातील चंद्र मंगळ जीवनात यश मिळवून देईल. घरात शुभ घटना घडतील .आर्थिक खर्च होतील. मुला सोबत दिवस सुखात जाईल.मध्यम दिवस. मकर तुमच्या पंचम स्थानातील चंद्र शुभ संकेत देत आहे . आज भाग्य उजळेल . आनंदात दिवस साजरा करताना त्रास विसरून जाल.प्रवास योग येतील . दिवस शुभ आहे. कुंभ राशीच्या व्यक्तींनी आर्थिक हानी पासून जपावे. मात्र अचानक होणारा धनलाभ आनंद देईल. प्रवास योग येतील.नवीन वस्त्र,दागिना खरेदी कराल. संतती खुश राहील.दिवस उत्तम. मीन आज उत्तम प्रतीचा लाभ मिळणार असून आर्थिक बाजु समृद्ध होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. प्रवास योग ,संपर्क यात दिवस अतिशय गडबडीत जाईल. शुभम भवतू !!
Published by:Atharva Mahankal
First published:

Tags: Astrology and horoscope

पुढील बातम्या