मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

दैनंदिन राशीभविष्य: जन्माष्टमीच्या दिवशी कोणत्या राशींवर असेल श्रीकृष्णाची कृपा; कोणाच्या नशिबात असेल दहीहंडी; वाचा भविष्य

दैनंदिन राशीभविष्य: जन्माष्टमीच्या दिवशी कोणत्या राशींवर असेल श्रीकृष्णाची कृपा; कोणाच्या नशिबात असेल दहीहंडी; वाचा भविष्य

आज अत्यंत शुभ दिवस असून आज चंद्राचे भ्रमण मेष राशीतून होणार आहे .पाहूया आजचे बारा राशींचे राशीभविष्य.

आज अत्यंत शुभ दिवस असून आज चंद्राचे भ्रमण मेष राशीतून होणार आहे .पाहूया आजचे बारा राशींचे राशीभविष्य.

आज अत्यंत शुभ दिवस असून आज चंद्राचे भ्रमण मेष राशीतून होणार आहे .पाहूया आजचे बारा राशींचे राशीभविष्य.

आज दिनांक १८ ऑगस्ट २०२२. गुरूवार.श्रावण कृष्ण अष्टमी. श्रीकृष्ण जन्माष्टमी.भगवान श्रीकृष्णाचा जन्म उत्सव आज भारतभर आनंदाने साजरा केल्या जातो. आज अत्यंत शुभ दिवस असून आज चंद्राचे भ्रमण मेष राशीतून होणार आहे .पाहूया आजचे बारा राशींचे राशीभविष्य. मेष राहू व चंद्र अध्यात्मिक उन्नती,कौटुंबिक लाभ दाखवीत आहे . परदेश संबंधी शुभ समाचार मिळतील. आर्थिक लाभ,प्रवास संभवतात. अष्टमी गुरुकृपेची जाईल. दिवस उत्तम. वृषभ व्यय स्थानात आलेला चंद्र कष्ट दायक असून परदेश संबंधी अनुकूल फळ देईल.घरामध्ये काही घटना घडतील.मातृ पितृ सुख लाभेल. शनि मानसिक ताण देईल. जन्माष्टमी लाभाची. मिथुन राशीच्या लाभ स्थानात येणारा चंद्र घर आणि कार्य क्षेत्रात यश देईल. व्यावसायिक व घराचे सुख देईल. आईवडिलांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होईल .दिवस उत्तम. कर्क भाग्य स्थानातील गुरू अचानक सगळ्या क्षेत्रात यश,लाभ मिळवून देईल. अनेक दिवसापासून अडकलेली काम मार्गी लागतील .आर्थिक हानी पासून जपावे. अष्टमी उत्साहात साजरी कराल. सिंह अष्टम गुरू काही अडथळे निर्माण करेल. भाग्य स्थानातील चंद्र सामाजिक प्रतिष्ठा दाखवीत आहे .आर्थिक लाभ होतील. संततीला वेळ द्या. दिवस शांतपणे व्यतीत करा. अष्टमी प्रतिष्ठेची. कन्या राशीच्या जातकांचे जोडीदार सोबत असलेले संबंध तणावपूर्ण होतील. अविवाहित व्यक्तींना साथीदार मिळेल. नवीन पर्वाची सर्वात होईल. चंद्र मन उदास ठेवेल .अष्टमी गुरू सेवेची . तुला सप्तम स्थानात आलेला चंद्र वैवाहिक सुख, आर्थिक व्यवहार यासाठी त्रासदायक असून मानसिक ताण देणारा आहे.परदेश प्रवास योग येतील. दिवस मध्यम. वृश्चिक संततीसाठी अतिशय शुभ फल देणारा गुरू उच्च शिक्षणात देखील मदत करेल .कार्य क्षेत्रात लाभ होतील.नवीन जबाबदारी येईल. चंद्र शारीरिक कष्ट देईल.. दिवस मध्यम. धनु पंचम स्थानात चंद्र संतती सौख्य,नवीन वास्तू, मिळवुन देईल .भाग्य कारक घटना घडतील. शुभ आणि अध्यात्मिक अनुभव येतील .दिवस आत्म उन्नती साठी शुभ राहील. मकर देश विदेशचे प्रवास ,भावंडांची भरभराट असा हा काळ आहे. वाणी तेजस्वी होईल. चतुर्थ चंद्र भ्रमण घरासाठी शुभ आहे .दिवस शुभ. कुंभ राशीच्या तृतीय स्थानात येणारा चंद्र कौटुंबिक,आर्थिक सुखात कमी निर्माण करेल...जोडीदाराला शुभ काळ. प्रवास होतील.दिवस उच्च प्रतीचे अनुभव देईल. मीन राशीमध्ये आलेला गुरू सुखद समाचार देईल . विचार सुधारतील.तेजस्वी व्यक्तिमत्व होईल चंद्र भ्रमण जोडीदाराची काळजी घ्या असे सुचवीत आहे. दिवस मध्यम फळ देईल. शुभम भवतू!!
First published:

Tags: Astrology and horoscope

पुढील बातम्या