मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

दैनंदिन राशीभविष्य: शैक्षणिक क्षेत्रात भरघोस यशाचा आजचा दिवस; पण प्रकृतीकडेही द्या लक्ष; असा जाईल दिवस

दैनंदिन राशीभविष्य: शैक्षणिक क्षेत्रात भरघोस यशाचा आजचा दिवस; पण प्रकृतीकडेही द्या लक्ष; असा जाईल दिवस

आज चंद्राचे भ्रमण मेष राशीतून होईल. सूर्याचा मघा नक्षत्रात प्रवेश होईल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

आज चंद्राचे भ्रमण मेष राशीतून होईल. सूर्याचा मघा नक्षत्रात प्रवेश होईल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

आज चंद्राचे भ्रमण मेष राशीतून होईल. सूर्याचा मघा नक्षत्रात प्रवेश होईल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

आज दिनांक १७ऑगस्ट २०२२. वार बुधवार. तिथी श्रावण कृष्ण षष्ठी. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीतून होईल. सूर्याचा मघा नक्षत्रात प्रवेश होईल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष वैवाहिक जीवन थोडे तणाव पूर्ण राहील. दिवसाचा काही काळ हा चिंतनात घालवाल. राशीतील चंद्र राहू मानसिक अस्वास्थ्य अनुभव देतील. आर्थिक आणि व्यवसाय वृद्धी संभवते. दिवस मध्यम जाईल. वृषभ आर्थिक बाबतीतली गणित चुकीची ठरतील. .काही निर्णय घेण्याची गरज पडेल. घरामध्ये कामाची जबाबदारी वाटेल.काळजी घ्या. दिवस मध्यम आहे. मिथुन चंद्राचे भ्रमण कामाच्या ठिकाणी भरपूर लाभ देईल . कार्य क्षेत्रात भरपूर काम राहील. आर्थिक लाभ होतील.संतती आनंदी राहील . दिवस शुभ. कन्या आज तुमच्यावर खूप प्रेम करणाऱ्या व्यक्तीना काहीतरी क्लेश होतील. वस्तू हरवण्याची शक्यता .खर्च वाढेल .व्यावसायिक दृष्ट्या कठीण दिवस. प्रकृती बरी राहील. दिवस उत्तम. कर्क राशीच्या दशम स्थानातील चंद्र सुखद व्यावसायिक अनुभव देईल. धनस्थानात प्रवेश करणार सुर्य सामाजिक क्षेत्रात प्रभाव वाढवेल. डोळ्यांची काळजी घ्या.दिवस मध्यम. सिंह भाग्य स्थानात चंद्र राहू धार्मिक अनास्था निर्माण करतील .राशीत प्रवेश करणार सुर्य तेजस्वी व्यक्तिमत्व बहाल करेल .जोडीदार आनंदी राहील.दिवस उत्तम. तुला काही लाभ घेऊनच आजचा दिवस उगवेल. जास्तीचे काम करण्याचा, प्रवास, भेटीगाठी चा दिवस आहे.धार्मिक स्थळांना भेट द्यावी अशी इच्छा होईल. दिवस शुभ. वृश्चिक दिवस आजही संथपणे घालवण्याचा आहे. आर्थिक लाभ संभवतात. मात्र जोडीदाराची काळजी घ्या. सहजीवन संथ राहील. प्रवास टाळा. दिवस मध्यम आहे. धनु आज चंद्र कौटुंबिक सुखामध्ये वाढ करेल.दोघे मिळून,भेटवस्तू खरेदी कराल. आनंदी काळ आहे. संतती कडे लक्ष द्या कामाची गडबड राहील. दिवस काही विशेष अनुभव देईल. मकर घरात काही अडचण असेल तर मदत करावी लागेल. प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल.आर्थिक लाभ होतील. तसेच हितशत्रू पासून सावध राहा. दिवस शुभ. कुंभ कुटुंबीय सोबत आनंदाने घालवण्याचा दिवस आहे. शैक्षणिक क्षेत्रात भरघोस यश देईल.वाचनात मन रमेल. भाग्य कारक गुरू यशाचा मार्ग दाखवेल .दिवस शुभ. मीन आज कार्यालयीन जास्तीची काम पार पाडून तुम्ही थकून जाल. प्रवास योग आहेत.आर्थिक लाभ ,काही खरेदी असा हा दिवस आहे. आईवडील खुश असतील. दिवस उत्तम. शुभम भवतू!!
First published:

Tags: Astrology and horoscope

पुढील बातम्या