मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

दैनंदिन राशीभविष्य: 'या' राशीवर होणार आज शनीचा परिणाम; घरात विचित्र घटना घडण्याचे संकेत; तुमची रास तर नाही ना?

दैनंदिन राशीभविष्य: 'या' राशीवर होणार आज शनीचा परिणाम; घरात विचित्र घटना घडण्याचे संकेत; तुमची रास तर नाही ना?

आज दिनांक १६ऑगस्ट २०२२ मंगळवार.. तिथी श्रावण कृष्ण पंचमी.  आज चन्द्र मीन राशीतून भ्रमण करेल.गुरू चंद्र शुभ योग होईल . पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

आज दिनांक १६ऑगस्ट २०२२ मंगळवार.. तिथी श्रावण कृष्ण पंचमी. आज चन्द्र मीन राशीतून भ्रमण करेल.गुरू चंद्र शुभ योग होईल . पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

आज दिनांक १६ऑगस्ट २०२२ मंगळवार.. तिथी श्रावण कृष्ण पंचमी. आज चन्द्र मीन राशीतून भ्रमण करेल.गुरू चंद्र शुभ योग होईल . पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

    आज दिनांक १६ऑगस्ट २०२२ मंगळवार.. तिथी श्रावण कृष्ण पंचमी.  आज चन्द्र मीन राशीतून भ्रमण करेल.गुरू चंद्र शुभ योग होईल . पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष राशितले राहू आणि धन स्थानातील मंगळ सात्विक आचरण करा असे सांगत आहेत. चंद्र व्यय स्थानात प्रकृतीला त्रास घडवेल. गुरू देखील व्ययात आहे , धार्मिक कामा साठी वेळ द्यावा लागेल. दिवस शुभ. वृषभ चंद्र तुम्हाला व जोडीदाराला आर्थिक भरभराट देईल.स्वतः वर खर्च कराल. घरासाठी चैनीच्या वस्तू खरेदी कराल.धार्मिक कामासाठी वेळ द्याल. दिवस उत्तम आहे. मिथुन दशम स्थानात गुरू चंद्र आर्थिक आणि मानसिक लाभ देईल.. जोडीदाराशी काही तरी कुरबुर होईल.व्यवसाय वृद्धी चे संकेत आहेत . प्रकृती ठीक राहील.दिवस शुभ. कर्क आज दिवस कुटुंबीयांसोबत,संतती सोबत घालवा. स्वतःला वेळ द्या. काही आर्थिक प्रश्न सोडवावे लागतील. धार्मिक आस्था वाढीस लागेल..दिवस उत्तम आहे. सिंह चंद्र सामाजिक क्षेत्रात नाव करील. काही चिंता असेल तर ती आता दूर होईल. नोकरी साठी उत्तम काल. जोडीदार आनंदी राहील. दिवस मध्यम. कन्या आज दिवस खूप काही नवीन घटना घेऊन येईल. थोडी हुरहूर मनात राहील. चंद्र कामाचा ताण देईल. घरामध्ये काही नवीन बदल कराल. जोडीदारसोबत खरेदी होईल.. दिवस मध्यम आहे तुला आज दिवस दगदग, प्रवास यांनी तुम्हाला त्रस्त करेल. संतती सुख मिळेल. सूर्य बुधकाही विशेष अनुभव देईल. आर्थिक लाभ संभवतात. दिवस मध्यम. वृश्चिक आज कार्यालयीन प्रश्नांचा सामना करावा लागेल.वैवाहिक जीवन थोडे तणावपूर्ण होईल .प्रकृतीची काळजी घ्या. जास्त दगदग करू नका. आर्थिक लाभ होतील.दिवस चांगला. धनु आज चतुर्थ स्थानात चंद्र कुटुंबात आनंद निर्माण करेल.आर्थिक देणे घेणे होईल. नातेवाईक भेट होण्याचे संकेत आहेत. दिवस उत्तम. मकर आजचा दिवस हा घर आणि कुटुंब यांना वेळ देण्याचा आहे. बंधुभेट होईल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल . शैक्षणिक बाजू ठीक राहील ..दिवस मध्यम आहे. कुंभ शनि घरात काही विचित्र अनुभव देईल..आईवडील नाराज होणार नाहीत याची काळजी घ्या. संततीचे सुख मिळेल घरात जास्तीची काम निघतील.आर्थिक घडामोडी घडतील. आनंदात दिवस जाईल. मीन आज कुठे तरी प्रवासाला जाण्याचा बेत ठरेल. भावंडं भेटतील. महत्वाचे निरोप मिळतील राशीतील गुरू चंद्र आणि तृतीय मंगळ अधिकार प्राप्ती करून देतील. दिवस शुभ आहे. शुभम भवतू!!
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Astrology and horoscope

    पुढील बातम्या