मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

दैनंदिन राशीभविष्य: गृहसौख्य, जोडीदाराची साथ आणि शुभ घटनांचा आजचा दिवस; काय सांगते तुमची रास

दैनंदिन राशीभविष्य: गृहसौख्य, जोडीदाराची साथ आणि शुभ घटनांचा आजचा दिवस; काय सांगते तुमची रास

आज भारताचा स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना अनेक शुभेच्छा.आज चंद्र दिवसभर मीन राशीत आहे. पाहूया आजचे राशी भविष्य.

आज भारताचा स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना अनेक शुभेच्छा.आज चंद्र दिवसभर मीन राशीत आहे. पाहूया आजचे राशी भविष्य.

आज भारताचा स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना अनेक शुभेच्छा.आज चंद्र दिवसभर मीन राशीत आहे. पाहूया आजचे राशी भविष्य.

आज दिनांक १५ ऑगस्ट२०२२. वार सोमवार .आज श्रावण कृष्ण चतुर्थी. संकष्टी चतुर्थी. आज श्रावणी सोमवार असून शिव पूजन केल्या जाईल. आज भारताचा स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना अनेक शुभेच्छा.आज चंद्र दिवसभर मीन राशीत आहे. पाहूया आजचे राशी भविष्य. मेष राशीच्या व्यय स्थानात आलेला चंद्र अनेक इच्छा आकांक्षा जागृत करेल. गृहसौख्य मिळेल. मेहनत करून यश प्राप्त होईल. शुक्र आज सुंदर खरेदीचे योग आणणार आहे. बरा दिवस. वृषभ राशी स्थानात आलेला मंगळ कष्ट देणारा असून अनेक खर्च व अडचणी देईल. स्वभावात तेज येईल. व्यवसायात अनेक लाभ होतील. प्रवास योग येतील .दिवस उत्तम . मिथुन गुरू दशम स्थानातअसून मन कार्य करण्यास उत्सुक होईल . प्रवास, भेटीगाठी होतील. घरासाठी आर्थिक व्यय होण्याचे संकेत आहेत. प्रकृती जपा.दिवस मध्यम. कर्क सप्तम स्थानात वक्री शनी सावध राहा असे संकेत देत आहे. चंद्र आज भाग्य स्थानात असून घरात शुभ घटना घडतील. धार्मिक कार्यक्रमात भाग घ्याल. दिवस उत्तम आहे. सिंह राशीच्या व्यक्तींचा जोडीदारासोबत मतभेद होण्याचे संकेत आहेत.जपून रहा. मित्र मंडळी पासून अनेक लाभ होतील. संपर्क व प्रवास होतील.प्रकृती जपा. दिवस मध्यम. कन्या पंचम शनी आणि सप्तम चंद्र एकूण शुभ फळ देण्यास सज्ज आहे.आर्थिक लाभ, कार्यक्षेत्रात भरपूर संधी मिळतील. विजय तुमचाच होईल. दिवस शुभ. तुला आज दिवस मध्यम असून भाग्य साथ देईल. अचानक कुठून तरी चांगली बातमी मिळेल . उच्च शिक्षण आणि संतती साठी शुभ दिवस आहे. वृश्चिक आज दिवस अतिशय आनंदी राहण्याचा आहे.गृह सौख्य, जोडीदार ,संतती या बाबत शुभ फळ देईल. प्रकृतीची काळजी घ्या. दिवस चांगला आहे. धनु द्वितीय स्थानात वक्री शनि कुटुंबात मतभेद घडवून आणेल.लांबचे प्रवास योग येतील .माहिती मिळेल.साहसी आणि कठोर स्वभाव होईल.जोडीदार सोबत दिवस घालवा. मकर आता जरा शांतता आणि स्थैर्य मिळेल. मंगळ वृषभ राशीत असून आर्थिक ताण राहील.आणि कौटुंबिक कलह होतील. वैवाहिक सुख कमी मिळेल. दिवस मध्यम. कुंभ व्यय स्थान मध्ये वक्री शनि आहे. अचानक स्वभावात तेज येईल. कार्य करण्याची इच्छा होईल . चंद्र धार्मिक कार्य घडवून आणेल . आर्थिक घडामोडी होतील. दिवस उत्तम आहे. मीन लाभ स्थानात शनि आणि राशीमध्ये चंद्र अशी ग्रहस्थिती लाभ आणि संतान सुख दाखवत आहे. आज घरात शांत रहा. जास्तीची काम येतील . वैवाहिक सुख मिळेल .दिवस मध्यम. शुभम भवतू!!
Published by:Atharva Mahankal
First published:

Tags: Astrology and horoscope

पुढील बातम्या