मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

दैनंदिन राशीभविष्य: प्रचंड मानसिक ताण आणि वादविवादाचा आजचा दिवस; अनावश्यक धाडस करू नका

दैनंदिन राशीभविष्य: प्रचंड मानसिक ताण आणि वादविवादाचा आजचा दिवस; अनावश्यक धाडस करू नका

आज श्रवण नक्षत्रात भ्रमण करेल.चंद्र शनि योग होणार आहे. रक्षा बंधन सकाळी १०.३८ नंतर करावे. पाहुया आजचे बारा राशींचे भविष्य.

आज श्रवण नक्षत्रात भ्रमण करेल.चंद्र शनि योग होणार आहे. रक्षा बंधन सकाळी १०.३८ नंतर करावे. पाहुया आजचे बारा राशींचे भविष्य.

आज श्रवण नक्षत्रात भ्रमण करेल.चंद्र शनि योग होणार आहे. रक्षा बंधन सकाळी १०.३८ नंतर करावे. पाहुया आजचे बारा राशींचे भविष्य.

आज दिनांक ११ऑगस्ट २०२२ गुरूवार . आज श्रावणी पौर्णिमा .नारळी पौर्णिमा सकाळी १०.३८ नंतर प्रारंभ होईल.चंद्र आज श्रवण नक्षत्रात भ्रमण करेल.चंद्र शनि योग होणार आहे. रक्षा बंधन सकाळी १०.३८ नंतर करावे. पाहुया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष आज दशम चंद्र काही विशेष कामासाठी कार्यक्षेत्रात तुमचे महत्व वाढेल. विशेष पूजा हातून घडेल. चंद्र शनि विष योग आहे ,मानसिक स्वास्थ्य जपा. दिवस उत्तम.. वृषभ आज दिवस लाभदायक असून महत्वाचे निरोप मिळतील . मौल्यवान खरेदी, आर्थिक लाभ होतील. वडीलधारी व्यक्ती मदत करेल. तरीही सावध रहा. दिवस शुभ. मिथुन सावध राहण्याचा दिवस. आर्थिक लाभ होईल. धन स्थानात शुक्र आहे.मात्र खर्च देखील भरपूर होईल. घरात काही तणावाची स्थिती राहील. महत्वाचे निर्णय टाळा. दिवस उत्तम. कर्क आज प्रकृती ठीक राहिल. व्यवसायात प्रगती होईल. जोडीदाराची काळजी घ्या. ईश्वराची उपासना सर्व संकटातून मार्ग काढेल. चंद्र शनि विषयोग आहे. मानसिक ताण होईल..दिवस मध्यम. सिंह शत्रू डोकं वर काढण्याचा प्रयत्न करतील. पण शनि त्यांचा प्रयत्न हाणून पाडेल. चंद्र जोडीदाराला आर्थिक नुकसान दाखवत आहे. आरोग्य चिंता वाटेल. दिवस मध्यम. कन्या जोडीदाराला नवीन संधी प्राप्त होतील. मुलांची चिंता वाटेल. आर्थिक आणि शारीरिक व्याधी कमी होतील. कार्यक्षेत्रात नाव मिळेल. दिवस उत्तम. तुला गृह ,नवीन वाहन याचे योग येतील . कुठेही अनावश्यक धाडस करू नये. कार्यक्षेत्रात विशेष घटना घडतील. आई वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल . महत्वाचा निर्णय आज घ्या. दिवस उत्तम. वृश्चिक आज अचानक घरा संबंधी काही काळजी वाटेल. आर्थिक घडामोडी होतील. बंधुभगिनी भेट होईल. जास्तीचे काम पडेल. पण भाग्य साथ देईल. वादविवाद टाळा. दिवस उत्तम. धनु आज अनेक ठिकाणाहून जबाबदाऱ्या येतील. आर्थिक चिंता दूर झाली तरी खर्च जपून करा. प्रवास, बंधूभेट संभवते. कुटुंब सुख लाभेल..दिवस उत्तम. मकर शनि चंद्र राशी स्थानात अनेक संमिश्र फळ देणार आहेत .फार ताण घेऊ नका . डोकेदुखीचा त्रास होईल .जोडीदाराला शुभ काळ. आर्थिक प्राप्ती चांगली राहील .दिवस उत्तम. कुंभ जपून रहा.फार महत्वाचे निर्णय लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न करा. आर्थिक कामं पूर्ण होतील. धार्मिक कार्यात वेळ जाईल. देवदर्शन घडेल..दिवस मध्यम. मीन कुटुंबियांच्या समवेत दिवस जाईल.काही तरी विशेष करून दाखवाल. लोकांमध्ये तुमच्या नावाची चर्चा होईल . आर्थिक दृष्ट्या कठीण दिवस आहे.उपासना करा. दिवस मध्यम. शुभम भवतू!!
First published:

Tags: Astrology and horoscope

पुढील बातम्या