मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

दैनंदिन राशीभविष्य: एकीकडे शत्रू तर दुसरीकडे आर्थिक ताण; आजचा दिवस या राशींनी जरा जपून

दैनंदिन राशीभविष्य: एकीकडे शत्रू तर दुसरीकडे आर्थिक ताण; आजचा दिवस या राशींनी जरा जपून

आज दिनांक २६ जुलै २०२२ वार मंगळवार .आज आषाढ कृष्ण त्रयोदशी. आहे. चंद्र मिथुन राशीतून भ्रमण करेल. तिथून तो शुक्रा सोबत योग करेल. पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य

  • Published by:  Atharva Mahankal

आज दिनांक २६ जुलै २०२२ वार मंगळवार .आज आषाढ कृष्ण त्रयोदशी. आहे. चंद्र मिथुन राशीतून भ्रमण करेल. तिथून तो शुक्रा सोबत योग करेल. पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य

मेष

दशम स्थानातील शनि भ्रमण कार्यालयीन गाठभेट, संपर्क,घरा विषयक घडामोडी दख्वत आहे. काहीसे निराश वाटेल. जपून रहा. चंद्र तृतीय स्थानात आहे. प्रवास होतील. दिवस मध्यम.

वृषभ

शुक्राचा मिथुन राशीतील प्रवेश आनंद निर्माण करेल .कार्यक्षेत्रात महत्वाच्या घटना घडतील. आई वडील भेट होईल .व्यय राहू चिंता देईल. संतती सुख मिळेल. दिवस बरा आहे.

मिथुन

राशीच्या अष्टम स्थानामध्ये शनि मोठा बदल करेल. प्रकृती नाजूक राहील. संतती सुख मिळेल .चंद्र शुक्र भ्रमण खरेदी, प्रवासाचे योग आणेल. दिवस बरा आहे.

कर्क

सप्तम स्थानात वक्री शनि काही काळ सावधगिरीचा इशारा देत आहे . प्रवास टाळा. नुकसान होण्याची शक्यता व्यय चंद्र गृहक्षेत्रात घडामोडी होतील.खर्च होईल. नातेवाईक भेट होईल . दिवस मध्यम.

सिंह

लाभस्थानात चंद्र आर्थिक बाबतीत काळजी घ्या असा इशारा देत आहे. व्यवसाय जपून करा. चंद्र भ्रमण शुभ असून धार्मिक पूजा इत्यादी कराल.दिवस शुभ.

कन्या

दशम स्थानातील चंद्र शुक्र व्यावसायिक शत्रू पासून सुटका देतील.तुमचाच विजय होईल.चंद्र भ्रमण आर्थिक लाभ देईल . अष्टम राहू घातक असून प्रकृती जपा. दिवस मध्यम.

तुला

संतती चिंता, शिक्षणात अडचणी असा हा काळ थोडा जपून राहण्याचा आहे. पोटाची काळजी घ्या.भाग्य स्थानात होणारे शुक्र आणि

चंद्र भ्रमण संतती साठी खर्च करावा लागेल असे सुचवीत आहे.दिवस मध्यम .

वृश्चिक

राशी स्वामी मंगळ राहूसोबत शष्ठ स्थानात असून नातेसंबंध जपण्याचे संकेत देत आहे. आर्थिक व्यय,शत्रू पिडा संभवते. अष्टम चंद्र शुक्र आहेत .प्रकृती जपा. दिवस मध्यम.

धनु

चतुर्थ स्थानात गुरू वास्तू योग आणेल . भावंडं भेटतील. त्यांना जपा. कार्यालयीन कामात खूप वेळ जाईल.जबाबदारी वाढेल. संततीसोबत काही वेळ घालवा .दिवस उत्तम.

मकर

वक्री शनि राशीत आहे. चतुर्थ मंगळ राहू हा एक मोठा बदल आहे. आर्थिक बाजू सांभाळा. कुटुंबात काही घटना घडतील. घरामध्ये विशेष धार्मिक काम निघेल. उत्तम दिवस .

कुंभ

राशीमध्ये वक्री शनि जपून राहण्याचे संकेत देत आहे .प्रवास योग येतील. काळजी घ्या. पंचम चंद्र संतती बाबत काही ताण निर्माण होण्याची शक्यता. दिवस उत्तम.

मीन

व्यय स्थानातील शनि आणि चतुर्थ चंद्र जपून राहण्याचा संकेत देत आहे . आर्थिक ताण संभवतो. प्रवास योग येतील. राशीतील गुरू जोडीदाराला शुभ फल देईल.दिवस उत्तम.

शुभम भवतू!!

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle