मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

दैनंदिन राशीभविष्य: हर्ष आणि उल्हासाने भरून जाईल या राशीचं आयुष्य; कसा असेल आजचा दिवस? जाणून घ्या

दैनंदिन राशीभविष्य: हर्ष आणि उल्हासाने भरून जाईल या राशीचं आयुष्य; कसा असेल आजचा दिवस? जाणून घ्या

आज दिनांक २० जुलै २०२२. वार बुधवार. आषाढ कृष्ण सप्तमी.चंद्र सायंकाळ पर्यंत मीन राशीत असून गुरूशी योग करेल.पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य .

  • Published by:  Atharva Mahankal

आज दिनांक २० जुलै २०२२. वार बुधवार. आषाढ कृष्ण सप्तमी.चंद्र सायंकाळ पर्यंत मीन राशीत असून गुरूशी योग करेल.पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य .

मेष

आज दिवस तुम्हाला भाग्य दायक आहे. चंद्र मन आनंदित ठेवेल. तृतीय स्थानातील शुक्र स्त्री वर्गा कडून अकल्पित लाभ प्राप्त करून देईल. संततीची काळजी घ्या. दिवस शुभ.

वृषभ

आज आर्थिक दृष्ट्या दिवस उत्तम आहे.अनपेक्षित खर्च झाले तरी आनंद मिळेल. नाव लौकिक वाढेल. संतती आनंदी राहील.दिवस शुभ फल देईल.

मिथुन

अचानक कामासाठी प्रवास योग आहे. भाग्यात शनि ,धार्मिक कार्यात यश देतील. शुक्राचा आनंद दायक वावर तुम्हाला नवीन शुभ घटनांची चाहूल देईल. प्रकृती सांभाळून असा. दिवस मजेत जाईल.

कर्क

राशीच्या भाग्य स्थानातील चंद्र अचानक उलाढाल घडवेल. तुम्हाला काही नवीन जबाबदारी येईल. घरात देखील काम राहील. उत्तम खरेदी कराल .दिवस आनंदात जाईल.

सिंह

आज दिवस भाग्य दायक असून अध्यात्मिक अनुभव देईल.कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील . आर्थिक लाभ होतील.गाठीभेटी होतील. दिवस सौख्याचा जाईल.

कन्या

आज दिवस गडबडीचा व कष्टाचा आहे.अंगावर घेतलेली जबाबदारी जास्त ताण देईल.मात्र विचलित होऊ नका.जोडीदार आनंदी राहील. दिवस शांतपणे घालवा.

तुला

आज जोडीने आनंदात गृह सौख्य अनुभव कराल. हर्ष आणि उल्हास याने मन भरून जाईल. नातेवाईक भेटतील. दिवस शुभ.

वृश्चिक

आज दिवस कोणाशीही वाद विवाद न करता घालवा.संतातिशी वाफ होतील. . दिवस ईश्वराची सेवा करण्यात घालवा. आर्थिक बाजू जपा.चांगला दिवस.

धनु

राशीच्या चतुर्थ स्थानातील चंद्र गुरू सामाजिक जीवनात प्रतिष्ठा व आनंद मिळवून देईल. घरात शुभ घटना घडतील आर्थिक लाभ होतील. मुला सोबत दिवस सुखात जाईल.

मकर

तुमच्या राशीस्थनातील शनि अजूनही ताण देत आहे तरी आज भाग्य उजळेल . आनंदात दिवस साजरा करताना त्रास विसरून जाल.प्रवास योग येतील . दिवस शुभ आहे.

कुंभ

राशीच्या व्यक्तींनी आर्थिक हानी पासून जपावे. मात्र अचानक होणारा धनलाभ आनंद देईल. नवीन वस्त्र,दागिना खरेदी कराल. संतती खुश राहील.दिवस उत्तम.

मीन

आज उच्च प्रतीचा लाभ मिळणार असून आर्थिक बाजु समृद्ध होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. दिवस अतिशय गडबडीत जाईल.

शुभम भवतू !!

First published:

Tags: Astrology and horoscope