Home /News /astrology /

दैनंदिन राशीभविष्य: नवीन जबाबदारी आणि प्रवासाचे योग; नागपंचमीचा दिवस 'या' राशींसाठी ठरणार Lucky

दैनंदिन राशीभविष्य: नवीन जबाबदारी आणि प्रवासाचे योग; नागपंचमीचा दिवस 'या' राशींसाठी ठरणार Lucky

आज चंद्राचे भ्रमण कन्या राशीतून होणार आहे .गुरू चंद्र सम सप्तक योग होणार असून पाहूया आजचे बारा राशींचे राशीभविष्य.

आज दिनांक २ ऑगस्ट २०२२. मंगळवार.श्रावण शुक्ल पंचमी. नागपंचमी. आज नवविवाहित सुवासिनी मंगळागौरीची. पूजा करतात. व सौभाग्याची प्रार्थना करतात आज अत्यंत शुभ दिवस असून आज नाग पूजन देखील केले जाते.आज चंद्राचे भ्रमण कन्या राशीतून होणार आहे .गुरू चंद्र सम सप्तक योग होणार असून पाहूया आजचे बारा राशींचे राशीभविष्य. मेष गुरू व चंद्र अध्यात्मिक उन्नती,कौटुंबिक लाभ दाखवीत आहे . परदेश संबंधी शुभ समाचार मिळतील. आर्थिक लाभ,प्रवास संभवतात. पंचमी गुरुकृपेची जाईल. दिवस उत्तम. वृषभ पंचम स्थानात आलेला गुरू अतिशय शुभ असून संतती प्राप्ती साठी अनुकूल फळ देईल.घरामध्ये शुभ कार्य घडेल.मातृ पितृ सुख लाभेल. शनि मानसिक ताण देईल. नागपंचमी लाभाची. मिथुन राशीच्या कर्म स्थानात येणारा गुरू घर आणि कार्य क्षेत्रात यश देईल.चतुर्थ चंद्र व्यावसायिक व घराचे सुख देईल. आईवडिलांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होईल .दिवस उत्तम. कर्क भाग्य स्थानातील गुरू अचानक सगळ्या क्षेत्रात यश, लाभ मिळवून देईल. अनेक दिवसापासून अडकलेली काम मार्गी लागतील .आर्थिक हानी पासून जपावे. पंचमी बंधू चिंतेची जाईल. सिंह अष्टम गुरू प्रकृतीची चिंता निर्माण करेल. द्वितीय स्थानातील चंद्र सामाजिक प्रतिष्ठा दाखवीत आहे .आर्थिक लाभ होतील. संततीला वेळ द्या. दिवस शांतपणे व्यतीत करा. पंचमी प्रतिष्ठेची. कन्या राशीच्या जातकांचे जोडीदार सोबत असलेले संबंध मधुर होतील. अविवाहित व्यक्तींना साथीदार मिळेल.नवीन पर्वाची सर्वात होईल. कन्या चंद्र मन आनंदी ठेवेल .पंचमी गुरू सेवेची . तुला व्यय स्थानात आलेला चंद्र नोकरी, आर्थिक व्यवहार यासाठी त्रासदायक असून मानसिक ताण देणारा आहे. परदेश प्रवास योग येतील. दिवस उत्तम. वृश्चिक संततीसाठी अतिशय शुभ फल देणारा गुरू उच्च शिक्षणात देखील मदत करेल .कार्य क्षेत्रात लाभ होतील. नवीन जबाबदारी येईल. लाभातील चंद्र आर्थिक लाभ देईल.. दिवस उत्तम. धनु दशम स्थानात चंद्र गृह सौख्य, नवीन वास्तू, वाहन मिळवुन देईल . भाग्य कारक घटना घडतील. शुभ आणि अध्यात्मिक अनुभव येतील .दिवस आत्म उन्नती साठी शुभ राहील. मकर देश विदेशचे प्रवास , भावंडांची भरभराट असा हा काळ आहे. वाणी तेजस्वी होईल. भाग्य चंद्र भ्रमण संततीला शुभ आहे .दिवस शुभ आहे. कुंभ राशीच्या अष्टम स्थानात येणारा चंद्र कौटुंबिक,आर्थिक सुखात कमी निर्माण करेल...जोडीदाराला शुभ काळ. दिवस उच्च प्रतीचे अनुभव देईल. मीन राशीमध्ये आलेला गुरू सुखद समाचार देईल . विचार सुधारतील.तेजस्वी व्यक्तिमत्व होईल चंद्र भ्रमण जोडीदाराची काळजी घ्या असे सुचवीत आहे. दिवस मध्यम फळ देईल. शुभम भवतू!!
Published by:Atharva Mahankal
First published:

Tags: Astrology and horoscope

पुढील बातम्या