मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

दैनंदिन राशीभविष्य: मीन राशी आज अचानक होणार मालामाल; काय सांगतं तुमचा आजचं भविष्य? जाणून घ्या

दैनंदिन राशीभविष्य: मीन राशी आज अचानक होणार मालामाल; काय सांगतं तुमचा आजचं भविष्य? जाणून घ्या

आज दिनांक १९ जुलै २०२२. वार मंगळवार. आज आहे आषाढ कृष्ण षष्ठी. आज चंद्र मीन राशीत भ्रमण करेल. गुरू चंद्र गजकेसरी योग होणार आहे. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

  • Published by:  Atharva Mahankal

आज दिनांक १९ जुलै २०२२. वार मंगळवार. आज आहे आषाढ कृष्ण षष्ठी. आज चंद्र मीन राशीत भ्रमण करेल. गुरू चंद्र गजकेसरी योग होणार आहे. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

मेष

राशीच्या व्यय स्थानात चंद्रगुरू ही धार्मिक क्षेत्रात नवीन संधी आणेल. मित्र मैत्रिणी शी मतभेद होतील. तृतीय स्थानात आलेला शुक्र शुभ घटनांची सुरवात करेल. कला प्रकारात रुची निर्माण होइल .दिवस शुभ.

वृषभ

नवम स्थानात आलेला शनी कार्य क्षेत्रात एखाद्या व्यक्ती मुळे मनस्ताप दाखवत आहे .एक प्रकारचा अडथळा प्रत्येक कामात येईल .प्रवास योग येतील . चंद्र गुरू गृहसौख्यात वाढ करेल. दिवस शुभ.

मिथुन

मिथुन लग्न आणि रास असलेल्या व्यक्तींनी दशम गुरू चंद्राचा उत्तम अनुभव घ्यावा .गुरू अनुकूल आहे . घरासाठी शुभ योग येतील. राशीतील शुक्र सौंदर्य दृष्टी देईल .दिवस उत्तम.

कर्क

राशीच्या सप्तमात शनि व दशम राहू काळजी घ्या असे सुचवीत आहे. प्रकृती सांभाळा. कामाची जबाबदारी वाढेल.भाग्य चंद्र गुरू आर्थिक, सामाजिक लाभ देतील. दिवस चांगला.

सिंह

आजचे चंद्र भ्रमण अष्टम स्थानात आहे. कार्यक्रमात जोडीने सहभाग घ्याल. काळ सावधगिरीने राहण्याचा आहे . घराकडे विशेष लक्ष द्या. मध्यम दिवस.

कन्या

राशीच्या सप्तम स्थानात येणारे चंद्र गुरू भ्रमण आनंदी राहा असे सांगत आहे. प्रवास योग येतील. आर्थिक लाभ होईल. अष्टमात राहू आहे, स्त्रियांनी विशेष काळजी घ्यावी. दिवस मध्यम.

तुला

गृह कलह ,घरात मोठ्या दुरुस्त्या, खर्च असा हा काळ आहे.आर्थिक प्राप्ती होईल.जोडीदाराच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष नको. दिवस आनंदी राहील.

वृश्चिक

संतती तुमच्यावर खुश होइल. त्यांना काही संधी येतील. प्रवासात त्रास , नुकसान संभवते. बोलण्यातून गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या.आर्थिक लाभ होतील. दिवस मध्यम.

धनु

चतुर्थ चंद्र गुरू आज उत्तम फळ देईल. मात्र शनि आर्थिक दृष्ट्या सांभाळून राहवे असे सांगत आहे. कुटुंबात काही समस्या निर्माण होतील. सावध राहा. दिवस बरा.

मकर

जपून राहण्याचा काळ आहे. मंगळ, चतुर्थ राहू कुठल्याही कामात अडथळे आणतील. भांडण तंटा होऊ नये म्हणून सावध रहा. प्रवास योग येतील. दिवस मध्यम.

कुंभ

राशीच्या धनस्थानात चंद्र गुरू म्हणजे कुटुंबात महत्वाच्या घटना किंवा आर्थिक क्षेत्रात यश असे योग आणतील. तृतीय राहू महत्वाचे निरोप आणेल. दिवस उत्तम.

मीन

शनि नुकसानी पासुन सावध रहा असे सांगत आहे. संतान चिंता वाटेल राशीतील गुरू चंद्र अचानक आर्थिक लाभ देतील. मन धार्मिक क्षेत्राकडे झुकेल. दिवस चांगला.

शुभम भवतू.!!

First published:

Tags: Astrology and horoscope