मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /दैनंदिन राशीभविष्य: नवीन वर्ष, नवा दिवस आणि नवी दिशा; आज कोणत्या राशी होतील आनंदी? वाचा भविष्य

दैनंदिन राशीभविष्य: नवीन वर्ष, नवा दिवस आणि नवी दिशा; आज कोणत्या राशी होतील आनंदी? वाचा भविष्य

राशिभविष्य.

राशिभविष्य.

आज पौष शुक्ल दशमी.सर्व वाचकांना नूतन वर्ष सुखाचे जावो. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

आज दिनांक १ जानेवारी २०२३. वार रविवार. आज चंद्र मेष राशीत भ्रमण करेल.  आज पौष शुक्ल दशमी.सर्व वाचकांना नूतन वर्ष सुखाचे जावो. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

मेष

आज चंद्र राशी स्थानात आहे .राशीतील राहू चंद्र योग संभ्रम निर्माण करील. वयाने मोठ्या भावंडापासून लाभ होतील. मित्र मंडळी भेटतील. मातुल घराण्याची साथ लाभेल. दिवस उत्तम.

वृषभ

आज ग्रह आनंदी मनस्थिती करतील. आता भाग्य साथ देत आहे. अडचणीतून मार्ग निघेल .प्रवास योग येतील. चंद्र राहू व्यय स्थानात आहे. खर्च होईल.. दिवस शुभ.

मिथुन

लाभ स्थानात चंद्र धार्मिक,कौटुंबिक कामात यश देईल .आर्थिक लाभ घडतील . कौटुंबिक समारंभ होतील . कार्य क्षेत्रात नाव मिळेल. व्यय मंगळ कष्ट देईल. दिवस उत्तम.

कर्क

आज चंद्र प्रवास होईल असे सुचवीत आहे. .मन आनंदी राहील. आर्थिक दृष्टया दिवस उत्तम जाईल. बंधू भगिनी भेट होईल. संतती साठी खर्च होईल . दिवस उत्तम आहे.

सिंह

आठवा गुरू सध्या मानसिक , शारीरिक क्लेश देत आहे. जोडीदाराला जपून राहण्याचा काळ आहे. भाग्य स्थानातील चंद्र आज अर्थ, व्यवसायात लाभ देईल. दिवस उत्तम आहे.

कन्या

मानसन्मान , आर्थिक घडामोडी असा सध्याचा काळ आहे. शुक्र घराचे नूतीकरणासाठी मदत करेल..भाग्य साथ देईल. नाव मिळवुन देईल. दिवस उत्तम आहे .

तुला

आज दिवस जवळचे प्रवास,करमणुकी साठी वेळ द्या असे सांगत आहे. घरातील दुखणी, खर्च आता कमी होतील. चंद्र आर्थिक व्यय देईल. सामाजिक दृष्ट्या दिवस उत्तम.

वृश्चिक

भावंडांशी मतभेद, गैरसमज होऊ शकतात. व्यावसायिक संबंध सुद्धा तणावपूर्ण राहतील. आर्थिक लाभ होऊ शकतात. धार्मिक कार्य घडतील. दिवस बरा.

धनु

राहू पंचम स्थानात संभ्रम निर्माण करील. चंद्र नोकरीमध्ये जास्तीची जबाबदारी देईल. कुटुंब सुख कमी मिळेल. व्यवसाय उत्तम राहील.घरात काम भरपूर करावे लागेल.. दिवस मध्यम.

मकर

शनि सध्या तुमच्या राशीस्थानात आहे . चंद्र घरगुती चिंता दूर करेल. भाग्य चांगले राहील .घरात समारंभ होऊ शकतात .. वैवाहिक जीवन सुखी राहील. दिवस बरा.

कुंभ

आज घरामध्ये थोडा ताण जाणवेल. काही जास्तीच्या जबाबदाऱ्या,पाहुणे सुद्धा येऊ शकतात. तृतीय चंद्र राहू मानसिक ,शारीरिक ताण,प्रवास योग देईल. दिवस उत्तम आहे.

मीन

छोटे मोठे प्रवास, खर्च असा हा दिवस आनंदात पार पडेल. चंद्र धार्मिक कारणांसाठी काही खर्च करेल. जोडीदाराला वेळ द्याल. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. दिवस उत्तम.

शुभम भवतू !!

First published:

Tags: Astrology and horoscope