मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

दैनंदिन राशीभविष्य: आज घरामध्ये काही आनंददायक घटना घडतील; प्रकृती जपण्याचे संकेत

दैनंदिन राशीभविष्य: आज घरामध्ये काही आनंददायक घटना घडतील; प्रकृती जपण्याचे संकेत

राशिभविष्य.

राशिभविष्य.

आज माता शैलपुत्री या रूपात देवीची पूजा केल्या जाते. चंद्र कन्या राशीत भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

आज दिनांक२६ सप्टेंबर २०२२.आज आश्विन शुद्ध प्रतिपदा.आज आदिशक्ती श्री जगदंबेचा शारदीय नवरात्रौत्सव आरंभ होईल अत्यंत शुभ अश्या ह्या महा उत्सवाच्या सर्व भाविकांना मंगल शुभेच्छा. घटस्थापनेचा शुभ काळ हा सकाळी १२ पर्यंत असेल. आज मातामह श्राद्ध देखील केले जाते .आज माता शैलपुत्री या रूपात देवीची पूजा केल्या जाते. चंद्र कन्या राशीत भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

मेष

आज षष्ठ चंद्र कौटुंबिक कामासाठी प्रवास योग घडवून आणेल. शुभ गुरूचे गोचर आनंद देईल. आर्थिक लाभ संभवतो. कौटुंबिक समारंभ होतील.. दिवस शुभ.

वृषभ

आज पंचम स्थानातील चंद्र कुटुंबासाठी काही विशेष घडामोडी, आनंद आणि गृह सौख्य देईल. धार्मिक समारंभात भाग घ्याल. सामाजिक जीवनात प्रतिष्ठा लाभेल.. उत्तम दिवस.

मिथुन

राशी च्या चतुर्थ स्थानातील चंद्र शुक्राशी योग करीत आहे. अध्यात्मिक अनुभव येतील. घरात भरपूर वेळ घालवाल.खर्च वाढेल . प्रकृती जपा. दिवस चांगला जाईल.

कर्क

तृतीय स्थानात चंद्र काही आनंदी अनुभव देईल.आर्थिक बाजू उत्तम राहील..मन स्थिर होईल. मित्र मंडळ भेटेल. प्रकृती उत्तम राहील. दिवस मजेत जाईल .

सिंह

आज चंद्र शुक्र योग आहे, आर्थिक लाभ झाल्यामुळे आनंदी राहाल. तसेच कुटुंबसुख लाभेल. प्रकृती नाजूक राहील. जोडीदाराला वेळ द्या. प्रवास घडेल. दिवस शुभ.

कन्या

आज चंद्र राशी स्थानात आहे.चतूर्ग्रही योग बनत आहे. तुमच्यावर कुटुंबाच्या बाबत निर्णय घेण्याची वेळ येईल . सामाजिक जीवनात प्रसिद्धीच्या झोतात याल.. गुरू जोडीदाराची मदत करेल. दिवस शुभ.

तुला

आज राशीच्या व्यय स्थानात चंद्र बुध शुक्र उच्च फळ देण्यास सज्ज आहे. गृह आणि धार्मिक क्षेत्रात यश मिळेल. प्रकृती ठीक राहील . खर्च होतील..दिवस शुभ.

वृश्चिक

आज घरात आनंदात राहण्याचा दिवस. चंद्र प्रकृती संबंधी चांगले फळ देईल..घरा मध्ये काही विशेष घटना घडतील. प्रवास योग येतील. दिवस मध्यम.

धनु

आज जीवनातील एक चांगला दिवस आहे कार्यक्षेत्रात देखील चांगला अनुभव देईल. अचानक आर्थिक लाभ होतील . गुरू घरामध्ये शुभ फळ देईल. दिवस आनंदात जाईल.

मकर

चंद्र भाग्य स्थानात आहे. काही प्रकृतीचे त्रास, आर्थिक चिंता असतील तर आज कमी होतील.आनंद निर्माण होईल. कुटुंबाकडे लक्ष द्या. कार्यालयीन कामकाज वाढेल. नातेवाईक भेट संभवते. मध्यम दिवस.

कुंभ

चंद्र शुक्र योग आज सांभाळून दिवस घालवा असे सुचवीत आहे. संतती कडे लक्ष द्या. खर्च टाळा. धार्मिक स्थानाला भेट देण्याचे योग.घरामध्ये विशेष घटना घडतील . दिवस मध्यम.

मीन

आज चंद्र आर्थिक दृष्ट्या घडामोडी घडवेल.घरामध्ये काही आनंददायक घटना घडतील .प्रकृती जपा. धार्मिक स्थानाचा प्रवास होईल. दिवस शुभ आहे.

शुभम भवतू!!

First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya