मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

दैनंदिन राशीभविष्य: अष्टमीच्या दिवशी 'या' राशींवर असेल देवीची कृपा; दिवस जाईल आनंदात

दैनंदिन राशीभविष्य: अष्टमीच्या दिवशी 'या' राशींवर असेल देवीची कृपा; दिवस जाईल आनंदात

राशिभविष्य.

राशिभविष्य.

हवन कुमारिका पूजन आज करतात. चंद्र धनु राशीतून भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

आज दिनांक ३ ऑक्टोबर २०२२ वार शनिवार .आज आश्विन शुद्ध अष्टमी.महा अष्टमी. अष्टमी उपवास. आज महागौरीचे पूजन केले जाईल. हवन कुमारिका पूजन आज करतात. चंद्र धनु राशीतून भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य

मेष

दशम स्थानातील शनि भ्रमण अधिकारी गाठभेट,संपर्क, घरा विषयक घडामोडी दाखवत आहे. काहीसे संथ गतीने आयुष्य जाईल. जपून रहा. शुक्र षष्ठ स्थानात आहे. संतती आनंदी राहील . दिवस उत्तम.

वृषभ

शुक्राचा कन्या राशीतील प्रवेश आनंद निर्माण करेल .कार्यक्षेत्रात महत्वाच्या घटना घडतील.आई वडील भेट होईल . व्यय राहू चिंता देईल. संतती सुख मिळेल. दिवस बरा आहे.

मिथुन

राशीच्या सप्तम स्थानामध्ये चंद्र मोठा व्यावसायिक बदल करेल. प्रकृती बरी राहील. संतती सुख मिळेल . शुक्र भ्रमण खरेदी, प्रवासाचे योग आणेल. दिवस बरा आहे.

कर्क

सप्तम स्थानात वक्री शनि काही काळ सावधगिरीचा इशारा देत आहे . प्रवास टाळा. नुकसान होण्याची शक्यता. षष्ठ चंद्र आहे .घडामोडी होतील.खर्च होईल. नातेवाईक भेट होईल . दिवस मध्यम.

सिंह

पंचम स्थानात चंद्र संतातीची काळजी घ्या असा इशारा देत आहे. व्यवसाय जपून करा. चंद्र भ्रमण शुभ असून जोडीदार आनंदी राहिलं. धार्मिक पूजा इत्यादी कराल.दिवस शुभ.

कन्या

चतुर्थ स्थानातील चंद्र व्यावसायिक शत्रू पासून सुटका देईल.गृहसौख्य मिळेल. तुमचाच विजय होईल.चंद्र भ्रमण आर्थिक लाभ देईल .अष्टम राहू घातक असून प्रकृती जपा. दिवस मध्यम.

तुला

संतती चिंता, शिक्षणात अडचणी असा हा काळ थोडा जपून राहण्याचा आहे. पोटाची काळजी घ्या.तृतीय स्थानात

चंद्र भ्रमण भावंडासाठी खरचं करावा लागेल असे सुचवीत आहे.दिवस मध्यम .

वृश्चिक

राशी स्वामी मंगळ सप्तम स्थानात असून नातेसंबंध जपण्याचे संकेत देत आहे. आर्थिक व्यय,शत्रू पिडा संभवते. धन चंद्र आहे . धनु वत 6मातेची प्रकृती जपा. दिवस मध्यम.

धनु

चतुर्थ स्थानात गुरू v राशीत चंद्र वास्तू योग आणेल . भावंडं भेटतील. त्यांना जपा.कार्यालयीन कामात खूप वेळ जाईल.जबाबदारी वाढेल.संततीसोबत काही वेळ घालवा . दिवस उत्तम.

मकर

वक्री शनि राशीत आहे. आर्थिक बाजू सांभाळा. कुटुंबात काही घटना घडतील. घरामध्ये विशेष धार्मिक काम निघेल. व्यय चंद्र आरोग्य चिंता लावेल. खर्च होईल. मध्यम दिवस .

कुंभ

लाभ स्थानात चंद्र जपून राहण्याचे संकेत देत आहे .प्रवास योग येतील. काळजी घ्या. संतती बाबत काही ताण निर्माण होण्याची शक्यता.लाभ स्थानातील चंद्र आणि व्यय शनि जपून राहण्याचा संकेत देत आहे . आर्थिक ताण संभवतो. प्रवास योग येतील. दिवस चांगला.

मीन

राशीतील गुरू जोडीदाराला शुभ फल देईल. सप्तम शुक्र वैवाहिक सुखासाठी उत्तम.व्यवसाय वृद्धी होईल. दिवस उत्तम.

शुभम भवतू!!

First published:

Tags: Astrology and horoscope