• Home
  • »
  • News
  • »
  • astrology
  • »
  • दैनंदिन राशिभविष्य : आज या राशींचं फळफळणार नशीब; नोकरी, व्यवसायाची उत्तम संधी

दैनंदिन राशिभविष्य : आज या राशींचं फळफळणार नशीब; नोकरी, व्यवसायाची उत्तम संधी

दैनंदिन राशिभविष्य

दैनंदिन राशिभविष्य

Daily horoscope : आज या राशींसाठी दिवस शुभ आहे.

  • Share this:
आज रविवार दिनांक 5 सप्टेंबर 2021. श्रावण कृष्ण चतुर्दशी. चंद्र आश्लेषा नक्षत्रात भ्रमण करेल. तर सूर्य सिंह राशीत असेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष आज तुम्हाला दिवस शुभ असून सूर्य आणि चंद्र योगाचे फळ मिळेल प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील. अविवाहित व्यक्तीसाठी लवकरच छानसा प्रस्ताव येईल. गृहसौख्य उत्तम. दिवस शुभ. वृषभ आज  चंद्र  भ्रमण  सुखद आहे. राशीतील राहू आणि शनि थोडी नकारात्मक मानसिकता करतील. पण तुम्ही प्रयत्‍नपूर्वक त्यावर विजय मिळवाल. आर्थिक बाजू ठीक राहील. दिवस चांगला आहे. मिथुन आज धन स्थानातील चंद्र भ्रमण अनुकूल फळ देणार आहे. रवि बुध संभाषण चातुर्य आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व देईल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. दिवस शुभ. कर्क राशीतील चंद्र तुम्हाला धाडस आणि फिरण्याची आवड निर्माण करणार आहे. सूर्य डोळ्यासंबंधी काही विकार निर्माण करेल. काळजी घ्या. सिंह आज मंगळ आर्थिक हानी, शारीरिक कष्ट दाखवत आहे. दिवस कामात व्यस्त असा जाईल. काहीतरी हुरहुर लावणारा दिवस आहे. राशी स्वामी रवि व्यस्तता देईल. कन्या राशी स्वामी बुध स्वराशीत असून तुम्हाला उत्तम बुद्धिमत्ता प्रदान करेल. चंद्र मंगळ केलेल्या कष्टाचे फळ मिळू देणार नाहीत. प्रकृती अस्वस्थ राहील. दिवस मध्यम. तुला आज ऑफिसमध्ये भरपूर काम असणार आहे. मात्र त्यात तुम्हाला आनंद मिळेल. भाग्यकारक दिवस आहे. नोकरी व्यवसायात नवीन संधी मिळतील. दिवस चांगला आहे. वृश्चिक आज दिवस उत्तम असून नवीन संधी, प्रवास, आप्त परिवार भेट करून देणारा ठरेल. घरात शांतता आणि आनंद राहिल. छोटीशी मेजवानी आयोजित कराल. शुभ दिवस. धनु आज दिवस प्रतिकूलता वाढवणारा आहे. 2 दिवस जाणवणारा  ताण  वाढेल. भागीदारीमध्ये चांगले यश मिळेल. आर्थिक त्रास मात्र जाणवेल. मकर आजचा दिवस  व्यवसाय पूरक आहे. काही निर्णय होतील. जे फायद्याचे ठरतील. पती पत्नी एकमेकांना समजून घेतील. नोकरी नवीन संधी मिळतील. दिवस शुभ आहे. कुंभ आज प्रकृती अस्वस्थ आहे असं वाटेल. पण काम करावं लागेल मात्र थोडा वेळ स्वतःला द्या. थोडा आराम करा. मानसिक ताण जाणवत असेल तर काही उपाय करा. दिवस मध्यम आहे. मीन मुलांना नवीन खरेदी करण्याची इच्छा होईल. तुम्ही ती आनंदाने पूर्ण करणार आहात. काही विशेष अध्यात्मिक साधना करण्यासाठी फार शुभ दिवस असून दिवस आनंदात घालवा. शुभम भवतु!!
Published by:Priya Lad
First published: