• Home
  • »
  • News
  • »
  • astrology
  • »
  • दैनंदिन राशीभविष्य : या राशीची साडेसाती सुरू; पाहा तुमची रास तर नाही ना?

दैनंदिन राशीभविष्य : या राशीची साडेसाती सुरू; पाहा तुमची रास तर नाही ना?

Today Horoscope : तुमच्या राशीत आज काय आहे पाहा.

  • Share this:
आज रविवार दिनांक 3 ऑक्टोबर,  2021 आज चंद्र दिवसभर सिंह राशीतून भ्रमण करेल. . आजचे बारा राशींचे भविष्य जाणून घेऊया मेष दिवस चांगला असून गृह, कुटुंब, संतती याबाबतीत लक्ष घालण्याचा आहे. अध्यात्मिक साधना करण्यासाठी फार शुभ काळ. विद्यार्थ्यांना दिवस  अनुकूल आहे. आर्थिकदृष्ट्या समाधानकारक. वृषभ राशीत असलेला राहू निर्णय घेताना थोडी द्विधा मनस्थिती करतील. वैचारिक गोंधळ निर्माण होईल. संततीकडे लक्ष द्या. प्रकृती उत्तम राहिल. घर काम जास्त वेळ घेईल. दिवस चांगला आहे. मिथुन आज होणारे प्रवास फायदा करून देतील. गुरू शुभ आहे. अष्टम शनी आणि मंगळ व्यवहार सांभाळून करा हे सांगतात. प्रकृती जपा. षष्ठ स्थानी आलेला शुक्र खरेदी करायला लावेल. दिवस चांगला आहे. कर्क आज राशीच्या धनस्थानातील चंद्र भ्रमण शुभ संकेत देत आहे. आर्थिक बाजू भक्कम राहील. अचानक धनलाभ संभवतो. पंचमात शुक्र अधिकारी व्यक्तीशी सांभाळून बोला. फायदा होईल. दिवसअनुकूल आहे. सिंह राशीत असलेला चंद्र, धन स्थानातील सूर्य अनेक संधी निर्माण करतील. चंद्र शुक्र योग शुभ आहे. मंगळ नवीन खर्च उभे करायला तयार आहे. पण काळजी नका. शुक्र आर्थिक लाभ करून देईल. गुरू उपासना करावी. कन्या आज दिवस फारसा अनुकूल नाही. विचित्र अशी हुरहूर जाणवेल. खर्च होईल. नवीन काम सुरू होईल. भावंडं मदत करतील. मुलांची अवाजवी चिंता करू नका. गुरू जप करणं योग्य ठरेल. तुला आज दिवस लाभदायक आहे. आवडत्या व्यक्तीला भेटावंसं वाटेल. केलेल्या कामाची प्रशंसा होईल. कामाचे फळ देणारा दिवस. वडील व्यक्तींची काळजी घ्या. त्यांना वेळ द्या. दिवस शुभ. वृश्चिक आज तुमचा मान वाढेल. तसंच कामही वाढेल. जास्त ताण घेऊ नका. प्रकृतीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. जोडीदाराला काही नवीन वस्तू  मिळू शकतात. दिवस चांगला आहे. धनु भाग्यशाली दिवस. ताण कमी  होईल. छोटे प्रवास, मौजमजेसाठी वेळ जाईल किंवा त्यासंबंधी चर्चा होईल. तुमच्या बुद्धीचा उत्तम वापर करून  घ्या. भविष्याचे आर्थिक नियोजन  करा. मकर मानसिक  ताणतणाव, आर्थिक नुकसान, संतती चिंता असा हा दिवस आहे. पण गुरू महाराज सगळ्यातून बाहेर काढतील. विश्वास ठेवा. मधुमेही व्यक्तींनी जास्त काळजी घ्या. खाण्यापिण्याचे बंधन पाळा. दिवस मध्यम . कुंभ दिवस आनंदी आहे. मौजमजेसाठी वेळ काढा. जोडीने फिरायला जा किंवा घरात काही विशेष पूजा करा. शत्रूकडे लक्ष असू द्या. साडेसाती  सुरू आहे. शनी जप करा. दिवस शुभ. मीन आज काहीसा थकवा येईल. खर्च करावा, कर्ज घ्यावं असं वाटेल. पण सावध. कोणाला हेवा वाटेल असं सध्या काही करू नका. शांततेत आपलं काम करत रहा असं ग्रह सुचवतात. दिवस मध्यम. शुभम भवतु.
Published by:Priya Lad
First published: