Home /News /astrology /

राशीभविष्य: कोणाला होईल आर्थिक लाभ तर कोणाचे प्रवास योग; जाणून घ्या कसा असल तुमचा आजचा दिवस

राशीभविष्य: कोणाला होईल आर्थिक लाभ तर कोणाचे प्रवास योग; जाणून घ्या कसा असल तुमचा आजचा दिवस

आज दिनांक २५ मे २०२२ वार बुधवार. आज वैशाख कृष्ण दशमी. आज चंद्र मीन राशीतून भ्रमण करेल. तिथे तो गुरू आणि मंगळ या सह असेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

आज दिनांक २५ मे २०२२ वार बुधवार. आज वैशाख कृष्ण दशमी. आज चंद्र मीन राशीतून भ्रमण करेल. तिथे तो गुरू आणि मंगळ या सह असेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष आज व्यय स्थानातील चंद्र भ्रमण बरे असून काही ताण असेल तर विचलित होऊ नका. मंगळ गुरू धार्मिक आस्था निर्माण करतील. दिवस शुभ. वृषभ राशीच्या लाभ स्थानातील चंद्र आज आर्थिक, व्यावसायिक लाभ देईल. प्रकृती ठीक राहील. दशम स्थानातील शनि अनुकूल असून मंगळ उत्तम नावलौकिक देईल. शुभ दिवस. मिथुन आज दशम स्थानातील चंद्र मंगळ कामकाजासाठी उत्तम आहे. नवीन संधी मिळतील . प्रकृतीची काळजी घ्या असे ग्रह सुचवीत आहे. . दिवस शुभ जाईल. कर्क चंद्र आज विविध क्षेत्रात विशेष घडामोडी घडवून आणेल. आर्थिक लाभ संभवतो. तुमच्यावर नवीन जबाबदारी येईल. अष्टम शनि पाठदुखी पासून जपा . दिवस मध्यम. सिंह आज दिवस अनेक घटना घडवणारा आहे. आज मन त्रस्त राहील. गृह लाभ होइल. दिवस जोडीदाराला आर्थिक लाभ घडवेल. मध्यम दिवस. कन्या आज दिवस मध्यम असून प्रकृती जरा जपून असावे .काही विचित्र अशी हुरहूर लागून राहिलं. कार्यक्षेत्रात भरपूर काम कराल . प्रवास योग येतील. काळजी घ्या. दिवस ठीक आहे. तुला राशीच्या सहाव्या स्थानात चंद्र जीवनात सुखाचे क्षण निर्माण करेल. खरेदी कराल. आर्थिक दृष्ट्या लाभ होईल. घरात काही विशेष घटना घडतील. लाभ देणारा दिवस. वृश्चिक चंद्र भ्रमण प्रकृतीच्या तक्रारी निर्माण करेल. आर्थिक घडामोडी , अध्यात्मिक व्यक्तींची भेट घडवून आणेल. स्वतःवर वेळ आणि पैसा खर्च कराल. अनपेक्षित अडचणी येतील. दिवस मध्यम. धनु चंद्र भ्रमण आज कार्यालयीन जीवनात यश देईल..आईशी मंगळ मतभेद करील. जोडीदाराची काळजी लागून राहील. दिवस मध्यम.. मकर राशीच्या तृतीय स्थानातील चंद्र गुरू भ्रमण प्रवासाचे योग आणेल. त्यात तुम्ही अडकून जाल.मंगळ गुरू खर्चाचे नवीन मार्ग तयार करतील. तसेच प्रप्तीही वाढेल. दिवस चांगला आहे. . कुंभ चंद्र मंगळ गुरू धनस्थानात आहे. .व्यय शनि कायदा पाळा असे सांगत आहे. आर्थिक लाभाचे मार्ग मिळतील. मात्र सांभाळून असा. दिवस मध्यम जाईल. मीन कौटुंबिक लाभ देणारा हा दिवस आहे. समारंभ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवन थोडे नाराज राहील. दिवस अतिशय शुभ आहे. शुभम भवतू!!
Published by:Atharva Mahankal
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

पुढील बातम्या