Home /News /astrology /

राशीभविष्य: वृषभ, कन्येसाठी कठीण दिवस; या राशींसाठी रविवार उत्तम

राशीभविष्य: वृषभ, कन्येसाठी कठीण दिवस; या राशींसाठी रविवार उत्तम

दैनंदिन राशीभविष्य: तुमच्यासाठी रविवार कसा असेल? पाहा आपापल्या राशीचं भविष्य..

आज रविवार दिनांक 4 जुलै 2021 तिथी ज्येष्ठ कृष्ण दशमी. आजचे बारा राशींचे राशी भविष्य. मेष दिवस संथ, शांत  आणि नेहमी प्रमाणे जाईल. आर्थिक स्थिती ठीक . प्रकृती स्थिर राहील दैनंदिन कामे करीत रहा. दिवस  चांगला आहे. वृषभ खर्च जरा जपून करा. व्ययस्थानातील चंद्र मानसिक दृष्ट्या कठीण जाईल. दशमातील गुरू  शुभ फळ देईल. दिवस मध्यम  आहे. छोटासा फेर फटका मारून याल. मिथुन आज लाभातील चंद्र  उत्तम फळ देण्यास सज्ज आहे. व्ययस्थानातील राहू, अणि धन स्थानातील मंगळ आर्थिक  बाजू सांभाळा असे सुचवतो आहे. दिवस शुभ. कर्क आज दिवस यशदायक आहे. चंद्र दशमात असून आज कोणतीही नवीन जबाबदारी घेणे योग्य नाही. दिवस आरामात घरी घालवा. दिवस चांगला आहे. सिंह भाग्य स्थानातील चंद्र  आज निश्चित पणे शुभ फळ देईल. आरोग्याच्या तक्रारी कडे मात्र लक्ष द्या. दिवस संथ व नेहेमीसारखाच जाणार आहे. खर्च जपून करा. कन्या अष्टमात स्थानातील चंद्र भ्रमण नको ते प्रश्न उभे करेल. अचानक नवीन घटना घडतील. परिवारा सोबत घरी शांततेत दिवस काढणे उत्तम. फार उलाढाली करू नये. तुला आज कौटुंबिक  सहल, मौजमजेसाठी वेळ काढला तर आनंद वाटेल. पैसा  घरगुती कारणांसाठी खर्च होईल. दिवस चांगला आहे. मात्र प्रवासात काळजी घ्या. वृश्चिक दिवस कंटाळवाणा, मन आणि शरीर थकलेले राहील. आज पैशाचे व्यवहार करू नका. जोडीदाराकडून जास्त अपेक्षा ठेऊ नका. निराशा होईल. दिवस अनुकूल नाही. धनू आज मुलांना घेऊन फिरून येण्याचा दिवस आहे आर्थिक व्यवहार जपून करा. बहीण भावंड चांगली बातमी देतील. मंगळ  अधिक साहस करू नये असे सांगतोय. मध्यम दिवस . मकर सुट्टीचा दिवस आज घर  अणि कुटुंब यांच्या करता काही विशेष  प्लॅनिंग कराल. त्यांना घेऊन बाहेर पडाल. मुलं आनंदात राहतील. दिवस  उत्तम जाईल. कुंभ आर्थिक बाजू चांगली राहील. आरोग्य सांभाळा. छोटे प्रवास, कार्य क्षेत्रात उत्तम प्रगती होईल.  कुंभ राशीतून भ्रमण करणारा गुरू शुभ संकेत देईल. दिवस उत्तम. मीन कौटुंबिक आणि आर्थिक सुख मिळणारे आहे. घरी कोणीतरी पाहुणे येण्याची शक्यता आहे. आज दिवस  मौजमजेत कुटुंबातील व्यक्ती समवेत घालवा. शुभ दिवस आहे.
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

पुढील बातम्या