Home /News /astrology /

Daily Horoscope: 'या' राशीचा प्रत्येक प्रयत्न होईल यशस्वी; कसा असेल तुमचा 23 मेचा दिवस? जाणून घ्या भविष्य

Daily Horoscope: 'या' राशीचा प्रत्येक प्रयत्न होईल यशस्वी; कसा असेल तुमचा 23 मेचा दिवस? जाणून घ्या भविष्य

ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 23 मे 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 23 मे 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) काम आणि खासगी आयुष्य यातील समतोल साधण्याचा तुम्ही करत असलेला प्रयत्न यशस्वी होईल. एखाद्या अनुभवी व्यक्तीला भेटण्याने मनाला स्वस्थता लाभेल. आधीच्या अनुभवांमुळे कुणावर विश्वास ठेवणं कठीण होईल. LUCKY SIGN – Good humor वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) दैनंदिन कामं सुरळीत पार पडतील. अनपेक्षितपणे कळलेल्या बातमीमुळे मनात शंका निर्माण होतील. एखाद्या नव्या खेळामध्ये रस घ्याल. LUCKY SIGN - A large hoarding मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) भावंडाशी वाद झाल्यास सध्या तरी लगेचच आपलं मत व्यक्त करू नका. बऱ्याच कालावधीनंतर एखाद्याशी गप्पा मारण्यासारख्या छोट्या-छोट्या गोष्टींमधून आनंद मिळेल. हव्या त्याच व्यक्तीसोबत मैत्री कराल. LUCKY SIGN - A silicon mould कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) द्विधा मनःस्थितीतून बाहेर पडाल. काम पूर्ण करण्याकडे तुमचा कल असेल. विचार स्पष्ट असण्याची गरज आहे. तुम्ही तुमचा प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याने सोशल स्टेटसबाबत जागरूक राहणं आता योग्य वाटेल. LUCKY SIGN - A blue ribbon सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) पूर्ण दिवस उत्साही राहाल. एखादी सकारात्मक बातमी मिळल्यानेच बहुधा हा उत्साह अंगात संचारला असेल. कामाच्या ठिकाणी थोडी स्पर्धा जाणवेल. LUCKY SIGN – Favorite dessert कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) कामं वेळेत पूर्ण न केल्याने निराशा येण्याची शक्यता आहे त्यामुळे दैनंदिन कामाची यादी करून नियोजन करा. त्यासाठी मदत लागली तर घ्या. इतरांसोबत योग्य संवाद ठेवा, जेणेकरून त्यांना तुम्हाला समजून घेता येईल. LUCKY SIGN - A souvenir तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) स्वतः ठरवलेल्या गोष्टी पूर्ण करण्याची वेळ आली आहे. जीवनात घडलेल्या काही घटना किंवा वागण्याची पद्धती तुम्ही पुन्हा अनुभवता आहात असं वाटेल. तुमच्या भावंडाच्या बाबतीत घरगुती वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN – A copper bottle वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) अचानकपणेच एखादी गोष्ट मिळवण्याची तुमची झालेली इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायला आजचा दिवस लकी आहे. आता तुम्ही ती इच्छा पूर्ण करू शकाल असं दिसतंय. या कामाबद्दलची माहिती कुणालाही सांगू नका अन्यथा कामात बिघाड होईल. LUCKY SIGN – A terracotta bowl धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) काही व्यक्तींचा तुमच्यावर नकारात्मक प्रभाव पडेल आणि त्यांचा सहवास तुम्ही टाळू शकणार नाही. दूरवर चालायला जाणं आणि नवी स्ट्रॅटजी आखल्यानेच डोकं शांत होईल. LUCKY SIGN - A glass top table मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) कोणत्याही कामाची तयारी घाईने केलीत तर ते काम फसेल. शेवटच्या क्षणी होणारी तगमग त्रासदायक ठरेल. एकावेळी एकच गोष्ट करा. मेडिटेशनचा फायदा होऊ शकतो. LUCKY SIGN - A rubik’s cube कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) दिवसभर एखादं जुन्या ध्येयाच तुमच्या मनात घोळत राहील. नव्या दिशेनी आताच काही प्रयत्न केले, तर फायद्याचे ठरतील. एखाद्या नोकरीसाठी तुम्हीच योग्य उमेदवार असल्याचं मित्रं आत्मविश्वासपूर्वक सांगतील. LUCKY SIGN - Chocolates मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) काहीतरी चुकत असल्याची स्पष्ट जाणीव करून देणारे संकेत मिळतील. आज पाऊस पडू शकतो त्यामुळे त्यासंबंधीची तयारी करून ठेवा, म्हणजे रेनकोट, छत्री जवळ बाळगा. भविष्यातील एखाद्या संवादाबद्दल मनात निराशा असेल, तर काळजी करू नका, तुम्हाला हवं तसंच घडेल. LUCKY SIGN - A new vehicle
First published:

पुढील बातम्या