Home /News /astrology /

Daily horoscope : तुमचा रविवार कसा जाणार; पाहा तुमचं आजचं राशिभविष्य

Daily horoscope : तुमचा रविवार कसा जाणार; पाहा तुमचं आजचं राशिभविष्य

Daily horoscope 23 January 2022 : सूर्यराशीनुसार तुमच्या राशीत आज काय आहे पाहा.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 23 जानेवारी 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) जुनी वचनं नव्याने आठवून ती पूर्ण करण्याची हीच वेळ आहे. तुमच्या जुन्या जखमा, खासकरून भावनिक जखमा आतापर्यंत बऱ्या झाल्या असतील. लोकांना माफ करण्याने त्यासाठी मदत होईल. स्वतःला आणि जोडीदाराला नव्याने मानसिक तयारीसाठी वेळ द्या. डाएटच्या बाबतीत वेगन ब्रेक गरजेचा आहे. तुमच्या सहकाऱ्यांना तुमच्या मदतीची गरज भासेल. शासकीय सेवेत असणारे अतुलनीय कामगिरी करू शकतात. LUCKY SIGN - 3 कबुतरं (three pigeons) वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) महत्त्वाची कामं तातडीने केल्यास मदत होईल. दूरचे नातेवाईक तुमच्या कौशल्याची तारीफ करतील आणि तुमच्याकडे सल्ला मागतील. रेंगाळणाऱ्या कायदेशीर बाबींपासून लांब राहा. न्यायालयाबाहेर तोडगा निघण्याची शक्यता असल्यास ते नक्की करा. हॉटेलमध्ये जास्तीचा काळ मुक्काम होण्याचे संकेत आहेत. कुटुंबासोबत एखाद्या समारंभाला जाल. तो मनोरंजक ठरेल. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा. कारण किरकोळ चोरी होण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN from above – नवी स्टेशनरी (new stationery) मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) कारखानदार आणि छोट्या व्यावसायिकांना त्यांच्या कामात यश मिळेल. सध्याच्या घडीला आर्थिक बाबतीत बऱ्याच सकारात्मक घडामोडींची चिन्हं दिसत आहेत. कोणत्याही नव्या कागदपत्रांवर, खासकरून छापलेल्या कागदांवर स्वाक्षरी करताना काळजी घ्या. कामासंबंधी प्रवास होण्याचीही चिन्हं आहेत. काही वेळातच तुमच्या नव्या विस्ताराच्या योजनांना योग्य प्रतिसाद मिळेल. सध्या आरोग्याला प्राधान्य कमी असल्यामुळे थकवा किंवा अशक्तपणाची लक्षणं दिसतील. LUCKY SIGN from above – सिट्रस फळं (citrus fruits) कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) सध्या तुम्ही भरपूर खरेदी करत आहात आणि ती थांबण्याची काही लक्षणं दिसत नाहीत. मनोरंजनाच्या नव्या शिफारशींमुळे डिजिटल स्क्रीनसमोर काही तास घालवण्याची शक्यता आहे. रोमान्सचे संकेत आहेत. हळुवार बहरणारा पण मनावर जास्त काळ परिणाम करणारा हा रोमान्स असेल यात शंका नाही. ही व्यक्ती अशी असेल जिला तुम्ही आधीपासून ओळखत असाल. आर्थिक बाबतीतले सर्व व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. तुम्हाला गंभीर योजनांवर पुन्हा काम करावंसं वाटेल आणि वेळेचं चांगलं नियोजन कराल. LUCKY SIGN from above – चंदेरी ट्रे (A silver tray) सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) सध्या तुम्हाला थोडं जास्त उत्साही वाटू शकेल. ग्रहानुसार तात्पुरत्या न्यायालयीन लढाईच्या टप्प्याची चिन्हं आहेत; पण तो तुमच्या बाजूने संपेल. काही योजनांच्या मुदतीत बदल झाल्यामुळे आणि संसाधनांमुळे त्यांच्यात व्यत्यय येऊ शकतो. एखाद्या चांगल्या सहायकाचा शोध घेऊन तुमचं जीवन सोपं करा. नाही तर लवकरच तुम्हाला अति काम केल्यासारखं वाटेल. तुमचे विचार स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न करवा अथवा समोरच्या व्यक्तीला तुमच्या बाबतीत गैरसमज होऊ शकतो. LUCKY SIGN from above – कबुतराचं घरटं (A pigeon nest) कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) सध्याच्या परिस्थितीला सामोरं गेल्यास तुम्हाला भविष्यासाठी मजबुती मिळेल. त्यामुळे सध्या शॉर्टकटचा शोध घेऊ नका. तात्पुरती उपाययोजना करण्याऐवजी आक्रमक दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या जुन्या मित्रांकडून व्यवसायाचा प्रस्ताव येऊ शकतो. तो तुमच्या कामाचा ठरेल. त्यामुळे त्याची तुम्हाला मदत होईल असा विचार करा. तुमची आंतरिक लढाई तुमच्या नव्या इच्छाशक्तीपुढे हार मानेल. LUCKY SIGN from above – नव्याने सुरू झालेलं दुकान (a newly inaugurated shop) तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) सध्याची जीवनातली स्थिती तुम्हाला आरामादायी वाटेल. काही नातेवाईक किंवा मित्र लवकरच एखादं गेट टुगेदर प्लॅन करण्याची शक्यता आहे. पैशासंबंधीच्या समस्यांवर नवा सकारात्मक उपाय मिळू शकेल. तुमच्यासमोर एखादं अनपेक्षित काम नवीन आव्हान घेऊन येईल; पण ते तुम्हाला उत्साह आणि प्रेरणा देण्यासाठी पुरेसं असेल. जुन्या गोष्टींबाबत तुमचे विचार स्पष्ट ठेवा. कारण ते नंतर अडथळा आणू शकतात. तुमच्या जुन्या सहकाऱ्यांच्या संपर्कात राहिल्यास उत्तम ठरेल. LUCKY SIGN from above – फ्रेंच विंडो (a French window) वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) तुमच्या भावना जास्त वेळ मनात ठेवू नका. तुमच्या कौशल्यांना नव्याने वाव मिळेल. तुमच्या कल्पनांना आता आकार मिळू शकेल. पण सध्याच्या परिस्थितीत शक्य असल्यास भांडण किंवा वाद टाळलेलाच बरा. आजच्या दिवसात शॉपिंग आणि नवीन खरेदीची शक्यता आहे. पण यामध्ये किरकोळ खरेदीशिवाय काही नसेल. घरातल्या व्यक्तींशी चांगल्या संवादाची गरज आहे. त्यामुळे त्यांना थोडा वेळ नक्की द्या. कोणी कर्ज मागितल्यास ते न दिल्यास बरं होईल. LUCKY SIGN from above – A bundle of grass धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) तुमच्या डोक्यात गोंधळ सुरू आहे, असं वाटेल आणि त्यामुळे तुमचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न कराल. हा गोंधळ काही काळ तसाच राहील; पण त्याबाबतीत अतिविचार न केल्यास चांगलं राहील. कारण ते हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. एखादा समजून घेणारा मित्र भावनिक आधार देऊ शकतो. एखाद्या मंजुरीसाठी तुम्ही अर्ज केला असल्यास त्यात विनाकारण विलंब होईल. तुमच्या दिनचर्येत बदल करा, जेणेकरून ती सध्यापेक्षा जास्त फलदायी असू शकेल. LUCKY SIGN from above – पांढरा मग (white mug) मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) कामाच्या ठिकाणाहून चांगली बातमी मिळाल्याने आनंदी व्हाल. तुमचे वरिष्ठ तुमच्या सर्व प्रयत्नांची दखल घेण्याची शक्यता आहे. जे योग्य वेळी तुम्हाला कळेलच. तुमच्या जोडीदाराला तुम्हाला काही तरी सांगायचं आहे; पण त्यांना संकोच वाटत असल्यास तुम्ही पुढाकार घेऊन संवाद साधा. काही वेळा वाद घालण्यापेक्षा शांतता बरी असते. त्यामुळे प्रत्येक वादात तुमचा शब्द शेवटचा असेलच असं नाही. तुमच्या भावंडांना प्रवेशासाठी थोडा अडथळा जाणवेल. जुने संपर्क विश्वासार्ह ठरतील. LUCKY SIGN from above – आवडतं पेयं (a favorite drink) कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) होऊन गेलेल्या गोष्टी विसरून तुम्हाला नव्या विचाराने आणि कृतीने सुरुवात करावी लागेल. गेले काही दिवस संथ गेल्यासारखे वाटले, तरी आता तुम्हाला गोष्टी वेगाने होताना दिसतील. नवीन नियमावलीमुळे तुमच्या व्यावसायिक व्यवहारांत अडथळा येऊ शकेल. एखाद्या नव्या प्रोजेक्टसाठी अर्ज करायच्या प्रयत्नात असाल तर विलंब लागेल. बँकेच्या लोनमुळे आता तुम्हाला थोडा दिलासा मिळेल. सध्या एका गोष्टीसाठी एक दिवस घ्या. कारण गोष्टी सुरळीत व्हायच्या प्रक्रियेत आहेत. LUCKY SIGN from above – लाल बस (a red bus) मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) तुम्ही काही भावनिक प्रश्नांची उत्तरं शोधत असाल तर त्याचा शोध तुमच्या मनातच घ्यावा लागेल. तुमच्या ग्रहमानानुसार तुम्ही सध्या अस्वस्थ असल्याचे संकेत आहेत; पण ही स्थिती लवकरच दूर होईल. आपल्या आसपास जे काही घडतं त्यामुळे नक्कीच काही कारणं असतात. जवळच्या व्यक्तीकडून तुम्हाला मदत मिळण्याची शक्यता आहे. तुमचं मूल तुम्हाला चांगली प्रेरणा देईल. तुमच्या दिनचर्येत ध्यानधारणा समावेश करण्याची शिफारस आहे. LUCKY SIGN from above – gold plated crockery
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या