Home /News /astrology /

Daily horoscope : या व्यक्तींच्या आयुष्यात आज नव्या घडामोडीचे संकेत; झोप उडवणारी घटना घडणार

Daily horoscope : या व्यक्तींच्या आयुष्यात आज नव्या घडामोडीचे संकेत; झोप उडवणारी घटना घडणार

Daily horoscope 21 January 2022 : वाचा सूर्यराशीप्रमाणे तुमचं दैनंदिन राशीभविष्य (Rashibhavishya)

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 22 जानेवारी 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) दीर्घकालीन अस्वस्थतेनंतर आजचा दिवस हा आत्मशांती देणारा असेल. नव्या कल्पनांसाठी पुढाकार घ्यावासा वाटेल. आयत्या वेळी आलेली आणि प्रलंबित कामांमध्ये दिवस जाईल. LUCKY SIGN - जुना आवडता शर्ट किंवा ड्रेस (old favorite shirt/dress) वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) ज्या प्रस्तावाचा तुम्ही विचार करत आहात, तोच तुमच्या मनातील जागा व्यापेल. भावनांपासून दूर राहा आणि त्यांच्या आहारी जाणे टाळा. भूतकाळात जाणवलेल्या मर्यादांमध्ये निश्चितच सुधारणा करता येईल. LUCKY SIGN - उत्तम कादंबरी (a classic novel) मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) पुढच्या काही महिन्यांसाठी एखादी नवी कल्पना तुमच्यासाठी ट्रिगर पॉईंट ठरेल. ती विकसित करा. स्वतःसाठी एकांत असलेल्या जागेचा शोध घ्यायचा प्रयत्न कराल. मसालेदार पदार्थ खाणं टाळा. LUCKY SIGN – कलंडणारं फर्निचर (an unstable furniture) कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) काही वेळा दैवी इशारा इतका सूक्ष्म असतो की चट्कन लक्षात येत नाही. तुमचा निर्णय पक्का करण्यासाठी या आधी आयुष्याने कितीतरी इशारे दिले आहेत. एखादा मित्र तुम्हाला महत्त्वपूर्ण सल्ला देईल. LUCKY SIGN - विविधरंगी गोट्या (colorful pebbles) सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) आजचा दिवस हा नेहमीसारखा वाटला तरी त्यात होणारा हळूवार बदल तुमच्या लक्षात येईल. तुम्ही जपून बोलाल, पण आज तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो. एखादं काम तुमच्या वाट्याला येईल, त्यामुळे तयार राहा. LUCKY SIGN - जुनं वडाचं झाड (Old Banyan tree) कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) तुम्ही बाहेरून जरी सगळं छान आहे, असं दाखवत असलात तरी मनामध्ये विचारांचं काहूर माजलंय. छोटं छोटं यशही तुमच्यासाठी फार मोलाचं आहे. चांगल्या परिणामांसाठी तुम्हाला अजून कंबर कसावी लागेल. एखादी लाँग कार जर्नी लवकरच घडेल. LUCKY SIGN - ग्रीन टी कप (A cup of green tea) तुळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) भूतकाळाने तुम्हाला बरंच काही शिकवलं आहे आणि त्याचाच सराव आता तुम्हाला करण्याची गरज आहे. तुमच्या कुटुंबाला तुमच्याकडून स्पष्टता अपेक्षित आहे. लवकरच चांगल्या घडामोडी होण्याचे संकेत आहेत. LUCKY SIGN - लाल पेन (a red pen) वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) काही नव्या घडामोंडीमुळे तुमची रात्रीची झोप उडाल्याची शक्यता आहे. त्या स्थिर होण्यासाठी काही वेळ द्या. एखाद्या जवळच्या मित्राच्या कॉलमुळे तुमच्या मनाला पुन्हा उभारी मिळेल. समाजकार्याकडे आकर्षित व्हाल. LUCKY SIGN - टूल कीट (A tool kit) धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) प्रगत अभ्यास किंवा पुढील शिक्षणाच्या विषयाकडे आज तुमचं लक्ष वेधलं जाईल. एखाद्या नव्याने ओळख झालेल्या व्यक्तीसाठी मनात भावना निर्माण होतील. लवकरच धनलाभ होण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN – जादाचं पाकिट (a spare wallet) मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) एखाद्या प्रवेशासाठी पात्रतेचे नवीन निकष तुमच्याशी मिळते जुळते ठरतील. एखादी हरवलेली व्यक्ती किंवा महत्त्वाच्या कागदपत्रांबदल सकारात्मक बातमी कळेल. बाहेर पडणे किंवा विश्रांती घेणे ही चांगली कल्पना ठरेल. LUCKY SIGN - तांब्याची वस्तू (a copper article) कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) एखाद्या नव्या खेळाकडे तुम्ही आकर्षित व्हाल. आजच्या दिवसाचा सदुपयोग करा आणि लोकांची भेट घ्या. एखाद्याला आरोग्यासंबंधी मदतीसाठी तयार राहा. एखाद्या कॉलमुळे तुमचा आजच्या दिवसाचा प्लॅन बदलेल. LUCKY SIGN - सोन्याचं घड्याळ (a golden watch) मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) अचानक मिळालेल्या सरप्राईजेसचं कौतुक करायचा तुमचा मूड नसेल. तुमची जुन्या मैत्रीची आज परीक्षा बघितली जाईल. जर तुम्हाला स्वतःच्या बाबतीत शंका वाटत असल्यास कुणाचं तरी मार्गदर्शन घ्या. आज गोड पदार्थ खाण्याची इच्छा होईल. LUCKY SIGN - मोकळं आकाश (a rare clear sky)
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या