Home /News /astrology /

Daily horoscope : आज गुरु-चंद्र शुभयोग; बाराही राशींना होणार फायदा

Daily horoscope : आज गुरु-चंद्र शुभयोग; बाराही राशींना होणार फायदा

Daily horoscope : पाहा आजचे बारा राशींचे भविष्य.

आज दिनांक 9 डिसेंबर 2021 वार गुरुवार. आज चंपाषष्ठी/सप्तमी. महाराष्ट्राची देवता श्री खंडोबा यांचा आज उत्सव. आज चंद्र सकाळी दहा नंतर कुंभ राशीत प्रवेश करेल. गुरु चंद्र शुभयोगाचे अनेक फायदे आज बारा राशींना मिळतील. पाहुया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष दिवस अत्यंत शुभ असून ग्रह तुमच्यावर प्रसन्न आहेत. आर्थिक, धार्मिक, सामाजिक पातळीवर तुम्ही चमकणार आहात. प्रसिद्धी मिळेल. मात्र  मंगळ अष्टमात, मन उद्विग्न होईल. मत्सरी लोकांना दूर ठेवा. दिवस बरा आहे. वृषभ आज कार्यालयीन काम सुरळीत पार पडेल. जास्त श्रम पडलं तरी यश मिळेल. घरांमध्ये काही जबाबदारी येईल. ती तुम्ही व्यवस्थित पार पाडाल. अतिसंवेदनशील होणं टाळा. दिवस शुभ आहे. मिथुन राशीच्या भाग्य स्थानात चंद्र गुरू, आध्यात्मिक प्रगतीसाठी मदत करतील. छोटे प्रवास संभवतात. मौल्यवान वस्तू प्राप्त होतील. संतती सुख चांगलं. आर्थिक स्थिती ठिक राहील. दिवस उत्तम. कर्क आज अष्टमात चंद्र गुरू वाचन, अभ्यास इत्यादीमध्ये यश देतील. आर्थिक स्थिती ठिक राहिल. मन मात्र विचलित होऊ देऊ नका. प्रकृती जपा. पोटाचे त्रास संभवतात. दिवस मध्यम. सिंह या राशीच्या व्यक्तींना हा काळ मान मिळवून देणारा आहे. प्रतिष्ठा वाढेल. भावंड खूश राहतील. आर्थिक उलाढाली होतील. जोडीदाराला वेळ द्यावा लागेल. नवीन व्यवसाय पूरक घटना घडतील. दिवस चांगला. कन्या वृश्चिक राशीत असलेला रवि लिखाण, वाचन यात शुभ फळ देईल. बुद्धीचा उत्तम वापर करून यश मिळवा. सौंदर्य प्रसाधन खरेदी होतील. आर्थिक स्थिती ठिक राहिल. दिवस चांगला. तुला संततीकडून शुभवार्ता कळतील. धन स्थानात मंगळ आर्थिक उलाढाल वाढवेल. भरभराटीचा दिवस आहे. मात्र कायद्याचे उल्लंघन करू नका. सामाजिक जबाबदाऱ्या जपून घ्या. आर्थिक नियोजन नीट करा. दिवस बरा जाईल. वृश्चिक आज घरात होणार्‍या काही समारंभाची तयारी, आखणी कराल. त्यानिमित्त खरेदी होईल. कार्यक्षेत्रातील प्रगती सुरू राहिल. आर्थिक बाजू ठिक राहिल. चंद्र गुरू घरात आनंद देतील. दिवस चांगला जाईल. धनु छोटे प्रवास, गाठीभेटी, संवाद, मनोरंजन असा हा दिवस आहे. मनोरंजनात्मक कार्यक्रम ठरतील. कुटुंब सुख मिळेल. फोन येतील. आर्थिक बाजू जपा. काहींना भावंडाची साथ मिळेल. दिवस चांगला. मकर आज आर्थिक व्यवहार, अचानक धनलाभ असा दिवस आहे. गुरु चंद्र शुभयोग, प्रकृतीबाबत काळजी नको. कुटुंब सुख, पैसा, मान लाभेल. आत्मविश्वास राहिल. दिवस चांगला. कुंभ राशीतील चंद्र गुरू सात्विक अनुभव देणार आहेत. आध्यात्मिक प्रगती होईल. दशमातील ग्रह नवीन संधी मिळवून देतील. घरातील शांतता भंग होऊ नये म्हणून सजग रहा. कुठेही अनावश्यक खर्च टाळा. दिवस शुभ. मीन धार्मिक समारंभ, नातेवाईकांच्या गाठीभेटी, त्यानिमित्ताने खर्च, देणंघेणं पार पडेल. प्रकृती जपा. आर्थिक बाजू ठिक राहिल. शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाही. दिवस मध्यम जाईल. शुभम भवतु!!
Published by:Priya Lad
First published:

Tags: Lifestyle, Rashibhavishya, Rashichark, Zodiac signs

पुढील बातम्या