Home /News /astrology /

कुंभ राशीसाठी आजचा दिवस भाग्यशाली; पाहा तुमचं आजचं राशिभविष्य

कुंभ राशीसाठी आजचा दिवस भाग्यशाली; पाहा तुमचं आजचं राशिभविष्य

Daily horoscope today 27 january 2022 : तुमच्या राशीनुसार तुमचा आजचा दिवस कसा जाणार?

आज दिनांक 27 जानेवारी 2022 तिथी पौष कृष्ण दशमी. आज चंद्र दिवसभर वृश्चिक राशीतून भ्रमण करणार असून गुरूशी केंद्र योग करत आहे. मेष आज दिवसभर मन उद्विग्न राहिल. अष्टमात चंद्र केतू काही धार्मिक कार्य घडेल. कौटुंबिक सुख लाभेल. आर्थिक परिस्थिती ठिक राहिल. दिवस मध्यम आहे. वृषभ दिवस थोडा संथ, हुरहुर लावणारा आहे. थकवा वाटेल. आराम करावा. सप्तम चंद्र केतू जोडीदारासाठी काही खर्च करायला लावेल. दिवस बरा. मिथुन आज षष्ठ चंद्र आजार आणि थकवा घेऊन येईल. संततीसाठी शुभ दिवस. काही वाचन किंवा अभ्यास कराल. आईकडचे नातेवाईक भेटतील. दिवस चांगला जाईल. कर्क राशीच्या पंचम स्थानात होणारे चंद्र भ्रमण अनुकूल असून घरामध्ये विशेष पूजा केली जाईल. आर्थिक स्थिती ठिक. दिवस चांगला जाईल. सिंह चतुर्थ चंद्र आणि सप्तमात गुरू उत्तम योग आहे. प्रवास सफल होतील. चर्चा, संभाषण यश देईल. बंधू भेट होईल. धार्मिक कार्य घडतील. दिवस शुभ. कन्या आर्थिक लाभ, प्रवास संभवतात. गुरु उपासना नोकरीत उत्तम संधी मिळवून देईल. कायदा पाळा. चतुर्थ स्थानात मंगळ घर खर्चात वाढ करेल. दिवस बरा. तुला राशीच्या धन स्थानातील चंद्र आज कौटुंबिक कामात यश देईल. मित्रमैत्रिणींसोबत मौज कराल. तृतीय स्थानात शुक्र चैनीच्या गोष्टीवर खर्च करायला लावेल. जपून रहा. वृश्चिक आज राशी स्थानातील चंद्र भ्रमण आध्यात्मिक प्रगती आणि त्यासाठी खर्च दाखवित आहे. मित्रमैत्रिणींना भेटून आनंद होईल. दिवस मध्यम जाईल. धनु आज व्यय स्थानातील चंद्र भ्रमण अनुकूल असून आर्थिक घडामोडी करणार आहेत. नवीन वस्तूची खरेदी नक्की होणार. कामाच्या ठिकाणी अचानक काही नवीन संधी मिळतील. दिवस मध्यम. मकर कार्यक्षेत्रातील बदल फायद्याचे ठरतील. अधिकारी व्यक्तीशी ओळख करून काही तरी उपयोग होईल. राशीतील ग्रह अनेक घटना घडवतील. दिवस शुभ. कुंभ आज भाग्यशाली दिवस आहे. आध्यात्मिक प्रगती, प्रवास आणि एखाद्या विशिष्ट स्थळाला भेट असा दिवस आनंदात जाईल. कार्यक्षेत्रात सफलता मिळेल. दिवस चांगला. मीन आज भाग्यात चंद्र आनंददायी ठरू शकतो. घरातल्या प्रत्येकाचा विचार करून आज नियोजन करा. घरातले तुमच्यावर खुश राहतील. दिवस मध्यम. शुभम भवतु
Published by:Priya Lad
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या