मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Daily horoscope : आजचा दिवस समस्यांचा; जरा जपूनच राहा

Daily horoscope : आजचा दिवस समस्यांचा; जरा जपूनच राहा

Daily horoscope : आज दिवसभरात तुम्हाला कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागेल पाहा.

Daily horoscope : आज दिवसभरात तुम्हाला कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागेल पाहा.

Daily horoscope : आज दिवसभरात तुम्हाला कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागेल पाहा.

आज दिनांक 20 डिसेंबर 2021 वार सोमवार. चंद्र आज मिथुन राशीत भ्रमण करीत असून पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

मेष

आज काही महत्त्वाची बोलणी होतील अडकलेले पैसे मिळू शकतात. मुलांचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. आरोग्य ठीक. दिवस चांगला जाईल.

वृषभ

राशीच्या द्वितीय स्थानातील चंद्र, योगाने थोडा मानसिक ताण जाणवेल. मात्र दैनंदिन कामे सुरळीत होतील. घर खर्च वाढता राहील. सप्तम स्थानातील  ग्रहामुळे आनंद घरात येईल. दिवस बरा जाईल.

मिथुन

प्रकृतीची तक्रार असेल. खर्च तो ही अनावश्यक होण्याची शक्यता आहे. कामाचा ताण जास्त जाणवेल. सप्ताहात बुध वास्तुसंबंधी निर्णय घेण्यास मदत करेल. दिवस मध्यम आहे.

कर्क

आज नवीन परिचय होतील. व्यय स्थानातील चंद्र राहू मित्रांपासून सावधगिरीचा इशारा देत आहेत. खर्चिक गोष्टींकडे कल होईल. वाणीमध्ये तेज येईल. दिवस बरा आहे.

सिंह

राशीच्या चतुर्थ स्थानातील मंगळ तेजस्वी व्यक्तिमत्त्व आणि वाणी बहाल करेल पण वाद नको. दैनंदिन कामे मार्गी लागतील. घरासाठी सुंदर वस्तू खरेदी कराल. कार्यक्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल. दिवस चांगला जाईल.

कन्या

एखाद्या विशिष्ट व्यक्तीकडून त्रास किंवा मत्सर असे अनुभव येतील. जपून रहा. कर्म स्थानातील चंद्र भ्रमण उन्नतीसाठी अनुकूल आहे. तुमच्या बुद्धीचा वापर योग्य कामासाठी कराल. एकूण दिवस चांगला आहे.

तुला

भाग्य स्थानात चंद्र दिवसाचे कार्यक्रम सुरळीत होतील. काहीतरी विचित्र हुरहूर, प्रकृतीची कुरकुर राहील. आर्थिक बाजू जरा बरी राहील. आरोग्य जपा. खर्च बेताने करा. दिवस मध्यम.

वृश्चिक

वैवाहिक जीवनात संभ्रमात टाकणार्‍या काही गोष्टी घडतील. खूप मानसिक ताण आणि विचित्र घटनांचा सामना करावा लागेल. पण आपल्या  मताशी ठाम रहा. दिवस प्रतिकूल आहे.

धनु

आज शरीर जरा थकलेलं असेल. पण हाताखालच्या व्यक्तींकडून काम होतील. मदत मिळेल. आर्थिक व्यवहार जपून. शत्रूवर नजर ठेवून रहा. दिवस ठीक आहे.

मकर

आज आरोग्य चिंता सतत सतावू शकते. नवीन प्रश्न निर्माण होतील. शैक्षणिक क्षेत्रात काहीशी संभ्रमावस्था राहील. खर्चाचं प्रमाण वाढेल. वाहन जपून चालवा. दिवस  मध्यम जाईल.

कुंभ

काही वास्तु विषयक प्रश्न आज निर्माण होतील. आज घरात जास्तीचे काम पडेल. आर्थिक लाभ होतील. नवीन योजना सुरू करणं टाळा. दिवस शांततेत घालवा.

मीन

प्रवासात त्रास, नातेवाईकांना भेट किंवा खर्च, मानसिक अस्थिरता असा हा दिवस आहे. अनेक फोन येतील. भावंडाची काळजी वाटेल. मुलाखतीतून यश मिळेल. दिवस चांगला जाईल.

शुभम भवतु!!

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs