मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

राशीभविष्य: कुंभ आणि कन्या राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस फलदायी; कसा असेल तुमचा दिवस? वाचा

राशीभविष्य: कुंभ आणि कन्या राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस फलदायी; कसा असेल तुमचा दिवस? वाचा

चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत असेल. तिथे तो राहू सोबत असेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत असेल. तिथे तो राहू सोबत असेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत असेल. तिथे तो राहू सोबत असेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

  • Published by:  Atharva Mahankal

आज दिनांक 17 डिसेंबर 2021. शुक्रवार. तिथी मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशी. चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत असेल. तिथे तो राहू सोबत असेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

मेष

मेष व्यक्ती ना आज  दिवस अनुकूल आहे. कौटुंबिक आणि आर्थिक व्यवहार  याकडे  लक्ष पुरवावे लागेल. नवीन संधी मिळेल. अनेक लाभ होतील. पौर्णिमा काळात नामजप, उपासना  करावी. दिवस आनंदात जाईल.

वृषभ

आज राशिस्थानी  होणार असलेली चंद्र राहू  ग्रहस्थिती सांभाळून रहा असे सुचवते  आहे. मन उद्विग्न झाले  तर ओम  रं राहवे नम: ह्या मंत्राचा  जप करावा.  दान करावे. निर्णय नकोच. दिवस मध्यम .

मिथुन

हजरजबाबी, प्रसन्न  मिथुन राशीच्या व्यक्तींना  व्ययस्थानातील ग्रहांची  हजेरी थोडी  त्रास द्यायचा प्रयत्‍न करेल.दिवस  शांततेत घालवा. नामस्मरण करा.  शिधा  दान करा.

कर्क

राशि स्वामी चंद्र राहु सोबत आहे. मानसिक आंदोलने होतील. मंगळ प्रकृती सांभाळा.असे सुचवत आहे. प्रवास योग येतील. आर्थिक स्थिती चांगली राहील.  पांढऱ्या वस्तु दान कराव्या.

सिंह

सिंह राशीचे  लोक तेजस्वी असतात. सध्या कामाच्या ठिकाणी  ताण  जाणवू शकतो. चतुर्थ असलेला मंगळ खर्चात वाढ करणारा आहे. शुक्र कलेत रुची वाढवेल. दिवस चांगला आहे.   नामस्मरण, दान करावे.

कन्या

धन स्थानातील मंगळ ग्रहांची  उपस्थिती  नवीन संधी  मिळवून देईल.,खर्च वाढेल. ग्रहण काळात  ईश्वरी उपासना ,दान करावे. चतुर्थ शुक्र घरात आनंदाची बातमी आणेल. संतती सुख चांगले राहील.

तुला

राशी स्थानातील ग्रहाची गर्दी   प्रकृतीची काळजी  घेण्याचे सुचवते आहे .अष्टम चंद्र राहू मन उद्विग्न ठेवेल. राशीच्या  धनस्थानातील मंगळ  आर्थिक स्थिती मध्यम ठेवेल. .अन्न दान आणि  उपासना  करावी .दिवस मध्यम आहे .

वृश्चिक

अत्यंत ऊर्जावान ,रागीट, कार्य कुशल  अश्या या व्यक्ती सध्या  मंगळाच्या  प्रभाव  क्षेत्रात आहे. जपून रहा. राशीतील  केतू हा आध्यात्मिक उन्नती  साठी  अनुकूल आहे. चंद्र राहू जोडीदाराची काळजी घ्या असे सुचवीत आहे.

धनु

आरोग्याची  काळजी घ्या.  आर्थिक नियोजन करा . कुटुंबातील व्यक्ती  भेटू शकतात.  मंगळ रवि  धार्मिक निष्ठा वाढेल.  हा नुकसानीचा काळ असू शकतो.  जपून रहा.  दिवस मध्यम जाईल.

मकर

या राशीचे लोक अत्यंत  चिकाटीने काम करणारे,शांत, स्थिर बुद्धी  असे असतात. मंगळ केतू युती आहे. सांभाळून रहा. दिवस  काही वाचन,अध्ययन करण्यात घालवा. शनी  देवांची उपासना  करा.  काही दान करा .

कुंभ

कुंभ व्यक्ती आज घरात वेळ  घालवतील.गुरु चंद्र केंद्र योग शुभ असुन जास्तीचे काम उरकून घ्या.  घरातील व्यक्तींच्या सोबत रहा. कार्यालयीन कामकाज करण्यात  वेळ  जाईल. जप करा. दिवस चांगला

मीन

आज ज्यांना फोन करायचा राहिला असेल त्यांच्या शी संपर्क होईल. बहिण भावंड भेट  .छोटासा प्रवास घडेल . घरात  शुभ कार्याचे नियोजन कराल.  दान करा. दिवस  समाधान कारक आहे.

शुभम भवतु ..

First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya