आज दिनांक 15 डिसेंबर 2021 बुधवार. तिथी मार्गशीर्ष शुक्ल द्वादशी. चंद्र आज मेष राशीत असून शुक्राशी केंद्र योग करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.
मेष
राशीतील चंद्र तुम्हाला मानसिक शांती देईल. अकस्मात लाभ संभवतात. अष्टम मंगळ आहे. प्रकृतीच्या किरकोळ तक्रारी सुरू राहतील.
दिवस उत्तम.
वृषभ
राशीच्या व्यय स्थानात चंद्र मानसिक आणि आर्थिक ताण निर्माण करेल. शारीरिक व्याधीकडे दुर्लक्ष नको. हाती घेतलेली कामे नीट पार पाडा. दिवस मध्यम.
मिथुन
आज चंद्र लाभ मिळवून देईल. मित्रमैत्रिणी भेटतील. संतती चिंता कमी होईल. ईश्वरी उपासना करावी. षष्ठ मंगळ रवि शत्रू पराजित होतील. दिवस उत्तम.
कर्क
दशम स्थानातील चंद्र भ्रमण काही महत्त्वाचा बदल घडवून आणेल. कार्यक्षेत्रातील अडचणी कमी होतील. नवीन संधी मिळतील. घरात देखील जास्तीचे काम पडेल. दिवस शुभ.
सिंह
भाग्य स्थानात चंद्र आणि सप्तम स्थानात गुरू वैवाहिक जीवनात पदार्पण करण्याचे योग येतील. तुमच्या बुद्धी चातुर्याने तुम्ही आज यश मिळवाल. दिवस उत्तम आहे.
कन्या
अष्टम स्थानात चंद्र आणि चतुर्थ स्थानात बुध आहे. आज तुम्हाला मनोधैर्य राखून ठेवायचे आहे. दिवस जरा त्रास देणारा ठरेल. पंचम शुक्र शनि संतती आणि शिक्षण यासंबंधी घटना घडतील . दिवस मध्यम.
तुला
सप्तम स्थानात चंद्र व्यावसायिक लाभ, वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण मिळवून देईल. तृतीय स्थानातील बुध ओजस्वी वाणी, प्रवास योग देईल. दिवस शुभ.
वृश्चिक
राशीच्या षष्ठ स्थानात चंद्र प्रकृतीच्या तक्रारी निर्माण करेल. आर्थिक देणंघेणं टाळा. कुठल्याही प्रकारच्या कायद्याचं उल्लंघन करू नका. दिवस बरा आहे.
धनु
राशीच्या पंचम स्थानात प्रवेश केलेला चंद्र आज संतती सुख चांगले देईल. अकस्मात घटना घडण्याची शक्यता आहे. कुटुंबाला वेळ द्यावा लागेल. लाभ होतील. दिवस उत्तम.
मकर
आज घरांमध्ये काही विशिष्ट घटना घडतील. जबाबदारी वाढेल किंवा भरपूर काम करावं लागेल. त्यासाठी वेळ खर्च होऊ शकतो. आई वडिलांच्या प्रकृतीत सुधारणा होईल. दिवस चांगला आहे.
कुंभ
आज दिवस प्रवासी आहे. घरी अचानक पाहुणे येतील. तुमच्या बोलण्यामुळे समस्या निर्माण होतील. व्यवसाय उद्योगात बरा दिवस आहे.
भावंडांची भेट संभवते. दिवस शुभ.
मीन
आज आर्थिक भरभराट करणारा दिवस असून अनेक लाभ होतील. कौटुंबिक सुख, समाधान आणि शैक्षणिक दृष्ट्या चांगला दिवस आहे. त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. दिवस उत्तम..
शुभम भवतु !!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.