मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Daily horoscope : चंद्र आश्लेषा नक्षत्रात, शुक्र शनिसोबत करणार प्रतियोग; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

Daily horoscope : चंद्र आश्लेषा नक्षत्रात, शुक्र शनिसोबत करणार प्रतियोग; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

Daily horoscope : पाहा तुमचं आजचं राशिभविष्य, कसा जाईल आजचा दिवस?

Daily horoscope : पाहा तुमचं आजचं राशिभविष्य, कसा जाईल आजचा दिवस?

Daily horoscope : पाहा तुमचं आजचं राशिभविष्य, कसा जाईल आजचा दिवस?

आज दिनांक 23 डिसेंबर 2021. वार गुरुवार, आज मार्गशीर्ष कृष्ण पंचमी. आज चंद्र आश्लेषा नक्षत्रात असेल तिथून तो शुक्र शनिसोबत प्रतियोग करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

मेष

राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्र. घरांमध्ये काही घटना घडतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. कार्यक्षेत्रात सुसंधी मिळतील. मन स्थिर राहिल. दिवस शुभ.

वृषभ

आज दुपारनंतर काही महत्त्वाचे फोन येतील. तुमच्यासाठी प्रवास योग घेऊन आलेला चंद्र दोन दिवस आनंद देणार आहे. विशेष भेट मिळेल. आर्थिक स्थिती उत्तम राहिल. दिवस शुभ .

मिथुन

आज राशीच्या धनस्थानातील चंद्र भ्रमण आर्थिक लाभ मिळवून देईल. बुध भ्रमण सुखद अनुभव देणार आहे. परिश्रमाचं फळ नक्की मिळेल. भाग्यशाली दिवस.

कर्क

आज मनावरचा ताण सैल होईल. प्रवास योग बनतील. धार्मिक कार्य घडेल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहिल. दिवस चांगला  आहे.

सिंह

आज व्यय स्थानात चंद्र मानसिक ताण निर्माण करेल. राशी स्वामी रवी गुरूच्या राशीत एक प्रकारची ऊर्जा निर्माण करत आहेत. दिवस बरा जाईल.

कन्या

राशीच्या लाभस्थानातील चंद्र भ्रमण अतिशय शुभ असून वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण निर्माण करेल. संतती सुख मिळेल. मुलांना वेळ द्याल. दिवस शुभ.

तुला

दशमातील चंद्र अचानक कामाचा ताण निर्माण करेल. पण तुम्ही यशस्वी होणार. येणारे दोन दिवस आनंदी आणि मौजमजेचे राहतील. खर्च वाढेल.

वृश्चिक

भाग्य स्थानात भ्रमण करणारा चंद्र गेल्या काही दिवसापासून वाटणारा ताण कमी करेल. राशीच्या तृतीय स्थानात शुक्र सुखद अनुभव देईल.  प्रकृती उत्तम ठेवा म्हणजे दिवस आनंदात जाईल.

धनु

आज अष्टमात असलेला चंद्र शारीरिक त्रास दर्शवतो. घरी आरामात रहा. दगदग टाळा. प्रवास नकोच. आर्थिक स्थिती बरी राहिल. दिवस  मध्यम.

मकर

दिवस आनंदाचा संदेश घेऊन येत आहे. पराक्रम, चिकाटी वाढेल. व्यवसायातून लाभ. प्रवासात सावध रहा. कुठेही अनावश्यक धाडस करू नका. जोडीदाराकडून लाभ. दिवस शुभ.

कुंभ

षष्ठ चंद्र व्यय शनि आज आर्थिक गैरसोय अणि हेवेदावे याने तुम्हाला त्रस्त करेल. शांत रहा. मातृपक्षातील व्यक्ती भेटतील. दिवस मध्यम जाईल.

मीन

संततीसाठी काही महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल. त्यासाठी खर्चदेखील होऊ शकतो. जोडीदाराची उत्तम साथ  लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात यश. दिवस शुभ.

शुभम  भवतु !!

First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya, Zodiac signs