Home /News /astrology /

Daily horoscope : या एका राशीला आजचा दिवस उत्तम जाणार; पाहा तुमची रास तर नाही ना

Daily horoscope : या एका राशीला आजचा दिवस उत्तम जाणार; पाहा तुमची रास तर नाही ना

Horoscope today : पाहा तुमचं आजचं राशिभविष्य.

आज दिनांक 19 डिसेंबर 2021 वार रविवार. आज अश्विन कृष्ण षष्ठी आहे. चंद्र मिथुन राशीत असणार आहे. पाहूया आजचं बारा राशींचं भविष्य. मेष आज दिवस अनुकूल असून काही विशेष बोलणी होतील. आर्थिक स्थिती ठिक राहिल. प्रकृतीकडे थोडं लक्ष असू द्या. कार्यक्षेत्रात विशेष भरारी घ्याल. दिवस शुभ. वृषभ आर्थिक स्थितीमध्ये भरभराट देणारा हा दिवस आहे. दोन दिवस जाणवणारा ताण कमी होईल. कामाच्या ठिकाणी अचानक काही नवीन घडामोडी होतील. दिवस चांगला जाईल. मिथुन आज राशीतील चंद्र तुम्हाला आनंदी ठेवेल. परदेशी जाण्याची संधी येऊ शकते. त्यासंबंधी काही चर्चा होईल. धार्मिक कार्य निष्ठेने कराल. कला प्रकारांमध्ये रुची वाढेल. दिवस उत्तम. कर्क आज उदास मन अणि थकवा यापासून जपा. काहींना अचानक प्रवासाचे योग येतील. तुमच्या राशीच्या तृतीय स्थानात असलेला बुध तुम्हाला योग्य मार्ग सुचवेल. दिवस मध्यम आहे. सिंह आज अनेक प्रकारे  लाभ होतील. मित्रमैत्रिणींसोबत आनंदात दिवस घालवा. शक्यतोवर एकट्याने प्रवास टाळा. प्रकृतीकडे लक्ष असू द्या. दिवस शुभ. कन्या आज काही घडामोडीमुळे तुमच्या कार्यक्षेत्रातील प्रतिष्ठा वाढेल. घराकडेसुद्धा खूप लक्ष देणं आवश्यक आहे. तृतीय स्थानातील मंगळ प्रवासात काळजी घ्या असं सुचवीत आहे. दिवस चांगला जाईल. तुला आज दिवस शुभ असून भाग्य तुमची साथ देणार आहे. कालपर्यंत जाणवणारा निरुत्साह आणि प्रकृतीची तक्रार आज कमी होईल. ईश्वरी उपासना सफल होईल. दिवस शुभ. वृश्चिक आज शारीरिक त्रास वाढण्याची शक्यता आहे. प्रवास टाळा. कोणाशी वाद, गैरसमज टाळा. आज दिवस घरात शांततेत  नामस्मरण करण्यात घालवा. दिवस मध्यम जाईल. धनु आजचा दिवस हा व्यवसाय, भागीदारीमध्ये सामंजस्य निर्माण करणारा आहे. कामाच्या ठिकाणी अचानक काही जास्तीचं काम येईल. राशी स्थानात रवी प्रकृती थोडी उष्ण ठेवेल. दिवस मध्यम. मकर राशीतील शनि आणि षष्ठ चंद्र आज तुम्हाला सांभाळून राहण्याचा संकेत देत आहे. कुटुंबात मतभेद, खर्चात वाढ आणि एकूण निरुत्साह राहिल. दिवस मध्यम. कुंभ आज पंचम चंद्र गुरूशी शुभ योग करीत आहे. दिवस आनंदात जाईल. आध्यात्मिक प्रगती होईल. शिक्षण क्षेत्रात यश मिळवून देणारा दिवस आहे. संततीसंबंधी शुभ समाचार मिळतील. दिवस शुभ. मीन घर अणि कुटुंब यात आज रमून जाल. घरात काही विशेष काम उरकून घ्या. आर्थिक नियोजन करणं आवश्यक आहे. बाकी दिवस आनंदात जाईल. शुभम भवतु!!
Published by:Priya Lad
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या