Home /News /astrology /

Daily horosope : आज Datta jayanti दिनीच 'या' राशीला दत्तगुरूंच्या कृपा प्रसादाचा लाभ होणार

Daily horosope : आज Datta jayanti दिनीच 'या' राशीला दत्तगुरूंच्या कृपा प्रसादाचा लाभ होणार

Daily horoscope : आज दत्तजयंतीचा तुमचा दिवस कसा जाणार पाहा.

आज दिनांक 18 डिसेंबर 2021. शनिवार. आज मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशी/पौर्णिमा. आज दत्तजयंती आहे. श्री दत्त गुरूंच्या जन्माचा दिवस. अत्यंत पवित्र असा हा दिवस सर्व ठिकाणी आनंद आणि उत्साहाने साजरा करण्यात येतो. जप, दान आणि उपासना केल्याने उत्तम फळ मिळेल. आज चंद्र दिवसभर वृषभ राशीत भ्रमण करीत आहे. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष धनस्थानातील चंद्र राहू भ्रमण काहीसं कठीण असून मानसिक ताण जाणवेल. आर्थिक बाजू ठिक राहिल. कौटुंबिक जीवनात काही समस्या निर्माण होतील. दिवस अनुकूल. वृषभ आज राशीतील चंद्र राहू मन उद्विग्न ठेवेल. अष्टमस्थ सूर्य बुध शारीरिक कष्ट दाखवत आहे. आर्थिक बाजू ठिक राहिल. भाग्यात शनि शुक्र अध्यात्मिक अनुभव देणार आहे. दिवस शुभ. मिथुन आज व्यय स्थानात चंद्र राहू योगाने थोडा कठिण दिवस आहे. त्यासाठी मानसिक तयारी ठेवा. जुनाट व्याधी डोक वर काढतील. आर्थिक बाजू जपून रहा. कुठेही अनावश्यक धाडस नको. दिवस बरा. कर्क आज चंद्र राहू लाभ स्थानात आहेत. अनेक नवीन व्यक्तींच्या सोबत आनंदात वेळ जाईल. सप्तम स्थानात शुक्र वैवाहिक जीवनात सुखद अनुभव देईल. दिवस शुभ. सिंह दशमातील चंद्र अधिकार बहाल करण्यास तत्पर आहे. मात्र राहूमुळे कधीतरी काही गैरसमज होण्याची शक्यता आहे. कुटुंबाला वेळ द्यावा लागेल. आईची काळजी घ्यावी. दिवस शुभ. कन्या भाग्य स्थानात भ्रमण करणारा चंद्र राहू योगाने आध्यात्मिक साधना फलद्रुप होईल. दत्तगुरूंच्या कृपा प्रसादाचा लाभ होईल. धार्मिक कार्य घडेल. कौटुंबिक सुख लाभेल. दिवस उत्तम. तुला अष्टमात चंद्र राहू शारीरिक कष्ट दाखवत आहेत. अध्यात्मिक अनुभव येतील. तुमच्यासाठी धार्मिक कार्य, नाम जप करणं योग्य राहिल. घरात समारंभ घडतील. दिवस चांगला. वृश्चिक आज चंद्र राहू सप्तम स्थानात असून जोडीदारासाठी थोडा कष्ट दाखवत आहे. गैरसमज पसरतील. मात्र व्यावसायिक लाभ होतील. दिवस उत्तम जाईल. धनु व्यय स्थानात मंगळ आणि षष्ठ चंद्र आज तुम्हाला प्रकृती जपा असं सांगत आहे. प्रवास योग येतील. अनेक मार्गानी धन प्राप्तीचे योग आहेत. आनंदात दिवस व्यतीत करा. मकर राशीत शुक्र शनि कधी कष्ट तर कधी लाभ असे योग दाखवत आहेत. नवीन वस्तूची खरेदी नक्की होणार आहे. प्रवास देखील होतील. आर्थिक स्थिती ठिक राहिल. दिवस शुभ. कुंभ राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्र घरांमध्ये काही विशिष्ट घटना घडतील. आईवडील भेटतील. कार्यक्षेत्रात काम जास्त पडेल. नोकरीमध्ये काही गैरसमज पसरतील. दिवस शुभ. मीन तृतीय चंद्र राहू योगाने बहीण भावंडं भेट देतील. महत्त्वाचा निर्णय, फोनवर संपर्क होईल. धार्मिक कार्य घडेल. घरांमध्ये समारंभ होईल. प्रवास घडेल. आर्थिक बाजू ठिक राहील. अकल्पित लाभ होतील. दिवस उत्तम. शुभम भवतु!!
Published by:Priya Lad
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या