आज दिनांक 3 डिसेंबर 2021. शुक्रवार. तिथी कार्तिक कृष्ण चतुर्दशी चार वाजून पंचावन मिनिटांपर्यंत राहिल. नक्षत्र विशाखा. त्यानंतर अमावास्या लागत असून चंद्र वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. तिथे तो सूर्य, बुध अणि केतूसोबत असेल. पाहूया आजचं बारा राशींचं भविष्य.
मेष
आज ईश्वरी पूजन करण्यात वेळ आनंदात जाईल. दोघांनी जोडीने सर्व कार्य पार पाडावीत. व्यवसाय पूरक दिवस आहे. मतभेद कमी होतील. दुपारनंतर मानसिक ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्टय़ा उत्तम दिवस.
वृषभ
षष्ठ स्थानात चंद्र मंगळ अतिशय शुभ असून वैचारिक, आर्थिक लाभ होतील. उसणं देणं टाळा. दिवस समारंभ पूरक, आनंदी आहे. दुपारनंतर नातेवाईकांना जोडीने भेट द्याल. नोकरीत उत्तम दिवस.
मिथुन
राशीच्या पंचम/षष्ठ स्थानातील रवि बुध चंद्र शुभ आहेत. उच्च प्रतीचे ज्ञान मिळावं म्हणून प्रयत्न करावा. अध्यात्मिक अनुभव, मिळवून देणारा दिवस. संतती आनंदी राहिल. प्रकृतीची काळजी घ्या. शुभ दिवस.
कर्क
आज घरातल्या पूजा विधीमध्ये दिवस आनंदात जाईल. मनापासून केलेल्या प्रार्थनेचं फळ देणारा दिवस आहे. घरात मिष्टान्न, उंची कपडे, वस्तू खरेदी होतील. आईवडील तुमच्यावर खुश राहतील. दिवस शुभ.
सिंह
आज कोणाकडे तरी काही निमित्ताने जाणं होईल. भेटी, फोन, आनंदी वातावरण राहिल. प्रवास सुखकर होतील. आर्थिक स्थिती सांभाळा. धन आगमन होईल पण खर्चदेखील वाढेल. दुपारनंतर दिवस उत्तम.
कन्या
धन कुटुंब वाणी स्थानात होणारे चंद्र भ्रमण अनुकूल फळ देणार असून आर्थिक बाबतीत यश मिळवून देईल. अचानक लाभ होतील पण खर्चदेखील वाढेल. कुटुंबात आनंदाचे क्षण येतील. दुपारनंतर प्रवास योग येतील. शुभ दिवस.
तुला
आज राशीत चंद्र मंगळासोबत असून तुम्हाला मौज मजा करण्याची इच्छा होईल. पूजेत रमून जाल. खरेदी होईल. लक्ष्मी कृपेने दिवस चांगला जाईल. दुपारनंतर धन आगमन होईल.
वृश्चिक
आज व्ययस्थानातील स्थानातील चंद्र मंगळ जरा जास्तीचा खर्च करतील. पण त्या ही आनंद असेल. मनात असलेली चिंतेची छाया आज विसरून जा. ईश्वरी कृपा सर्व ठिक करेल. दिवस बरा जाईल. प्रकृतीची कुरकुर राहिल.
धनु
केतू बुध योग वाणीवर ताबा ठेवावा असं सुचवतो आहे. दिवसभर लाभाच्या अनेक संधी मिळतील. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. मित्रमैत्रिणींना भेट द्याल. आनंदात दिवस जाईल. दुपारनंतर काळजी घ्या.
मकर
दशमातील, मंगळ, चंद्र ही ग्रहस्थिती वडीलधारी व्यक्ती लाभ करून देईल असं सुचवत आहे. कार्यक्षेत्रातील प्रगती सुरू राहिल. एक आनंद देणारा दिवस. घरातल्या प्रत्येक व्यक्तीची काळजी घ्यावी लागेल.
कुंभ
भाग्य स्थानात होणारी चंद्र मंगळ युती जपून राहण्याचा संकेत देत आहे. भाग्य स्थानातील चंद्र धार्मिक कार्य घडवून आणेल. संतती सुख चांगले. सुखद घटनांची सुरुवात. सायंकाळी अमावस्या काळात जपून रहा. दिवस शुभ.
मीन
चंद्र मंगळ अष्टमात असले तरी आज दिवस अनुकूल फळ देईल. थोडं मानसिक द्वंद्व चालू राहिल. प्रकृती जपून काम करा. श्री लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल. आर्थिक लाभ होतील. सायंकाळनंतर दिवस मध्यम .
शुभम भवतु!!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.