Home /News /astrology /

Daily Horoscope : नोकरी बदलण्याचा विचार; आधी राशिभविष्य पाहा मगच काय तो निर्णय घ्या

Daily Horoscope : नोकरी बदलण्याचा विचार; आधी राशिभविष्य पाहा मगच काय तो निर्णय घ्या

Horoscope 04 June 2022 : नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुमचं 4 जून 2022 चं राशिभविष्य नक्की वाचा.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 4 जून 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) घरगुती गोष्टींकडे लक्ष देण्याचा दिवस आहे. भविष्यातल्या काही योजनांबाबत चर्चा कराल. काही गोष्टी तुम्ही पुढे पुढे ढकलत आहात; मात्र त्या लवकरच पूर्ण कराव्या लागतील. जुन्या ओळखीतली एखादी व्यक्ती भेटेल. LUCKY SIGN – A Marigold वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) तुम्हाला जबाबदारीची जाणीव होईल. तुमचे वरिष्ठ तुम्हाला काय सांगत आहेत याकडे दुर्लक्ष करू नका. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी उत्तम दिवस आहे. LUCKY SIGN – A Butterfly मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) तुमच्या कौशल्यांचे तुम्हाला हवे त्यापेक्षा अधिक चांगले परिणाम दिसून येतील. तुमच्या भूतकाळातल्या काही गोष्टींचा त्रास होत असेल, तर तुम्हाला एखादा खास सल्लागार भेटेल. विद्यार्थ्यांनाही अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळेल. LUCKY SIGN – A Spider Web कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) एखादी ओळखीची व्यक्ती आर्थिक अडचणीत असेल तर ती तुमच्याकडे मदत मागू शकते. तुमचा व्यवसाय असेल तर मोठा आर्थिक फायदा संभवतो. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तो पुढे ढकला. LUCKY SIGN – Rising Sun सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) तुम्हाला बऱ्याच गोष्टी विचारात पाडतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या ओळखीचा वापर करून घेण्याचा पर्याय सुचवला जाईल. एखादी अमूल्य वस्तू जी हरवली होती ती परत मिळेल. दिवस मात्र भरपूर तणावाचा राहील. LUCKY SIGN – A Mountain view कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) गेल्या कित्येक वर्षांपासून तुम्ही ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होतात ती आता होईल. कामाच्या ठिकाणी एखादी चांगली बातमी मिळाल्याने आनंदी असाल. तुमच्या खासगी गोष्टींमध्ये लुडबूड झाल्यामुळे दिनचर्येवर परिणाम होईल. LUCKY SIGN – An Artifact तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नका. एखादी गोष्ट तुम्ही ठरवल्याप्रमाणे होत नसली तरी तुमच्या फायद्याची ठरेल. लवकरच एखादी गोष्ट साजरी कराल. LUCKY SIGN – A Platinum ring वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) तुमचं अति व्यावहारिक वागणं एखाद्याला दुखावू शकतं. तुमच्या व्यक्त होण्याच्या कौशल्यावर काम करणं गरजेचं आहे. तुमच्या मनात जे आहे ते सगळं तुम्हाला समोरच्याला सांगता येईलच असं नाही. एखाद्या गोष्टीचा उत्साह काही काळापुरता थोडा मागे ठेवा. LUCKY SIGN – Golden dust धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) दिवस तुम्हाला हवा तसाच राहिल. तुमच्या कामाच्या बाबतीत जास्त ताण घेऊ नका. आराम करण्याचा मूड राहिल. तुमची एनर्जी रिफ्रेश करण्यासाठी दिवस उत्तम आहे. LUCKY SIGN – A Cherished memory मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) एखाद्या माहिती नसलेल्या ठिकाणी जात असाल तर तो प्रवास फायद्याचा ठरेल. एखाद्या चुलत भावंडाला वा नातेवाईकाला तुमची आठवण येईल. शॉर्ट टर्म ट्रेडिंगसाठी चांगला दिवस. LUCKY SIGN – A pigeon कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) तुमच्या एखाद्या निर्णयावर ठाम न राहण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून तुमची प्रशंसा होईल. एखादी जास्तीची जबाबदारी तुमच्या खांद्यावर येऊ शकते जिचा तुम्हाला भविष्यात फायदाच होईल. तुमची मतं स्पष्टपणे व्यक्त करा. LUCKY SIGN – Three pigeons मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) दिवस भविष्याबाबत नियोजन करण्याचा आहे. तुम्हाला तुमच्या वाढीसाठी एखादी नवी गोष्ट शिकण्याची तयारी ठेवा. तुमच्या बॉसला तुमच्याकडून काही आश्वासनं हवी असतील. तुमचं ध्येय तुमच्या जवळ येत असल्याचं दिसेल. LUCKY SIGN – Shades of Lilac
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya

पुढील बातम्या