आज गुरुवार दिनांक 24 जून 2021. आज ज्येष्ठ पौर्णिमा. वटसावित्री पौर्णिमा. स्त्रियांचे सौभाग्य व्रत. शुभ दिवस. ही पौर्णिमा कुठल्या राशीला फलदायी ते पाहू या. पण त्याआधी रोजच्या प्रमाणे, एका राशीचा स्वभाव- गुणदोष. आज माहिती घेऊया मकर राशीबद्दल.
काल पुरुषाच्या कुंडलीतील ही दहावी रास. त्यामुळे कर्म हा स्थायी भाव आहे. पृथ्वी तत्त्वाची, चर रास, राशी स्वामी शनि. या राशीचा अंमल पोटऱ्यांवर असतो. उंच, लांब हात पाय, भरपूर केस, उभट चेहरा, खोल डोळे, अश्या साधारण ह्या व्यक्ती असतात. एकुण गंभीर, शांत, कष्टाळू चिकाटीने कार्य पार पाडणारे, लोक असतात. कधी नैराश्यवादी स्वभाव असतो. शनीची उपासना करावी.
आजचे बारा राशींचे भविष्य असे आहे.
मेष
पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर दिवस सहज पार पडेल. मधेच हुरहूर जाणवेल. आर्थिक स्थिती मध्यम राहील. घरात अशांतता होण्याचे संकेत आहेत. काळजी घ्या. दिवस मध्यम आहे .
वृषभ
आज जोडीदारासाठी करण्याचे वटसावित्री व्रत वृषभ स्त्रिया मनोभावे करतील. आनंदी दिवस. भावंडाची आठवण ठेवा.काही मतभेद असतील तर मिटवून टाका. दिवस उत्तम.
मिथुन
आर्थिक लाभ, त्याबरोबर खर्च, असा आजचा दिवस आहे. प्रकृती नरम गरम राहील. सर्दी पडसे अंग दुखणे असे त्रास होतील. एकुण दिवस मध्यम जाईल .
कर्क
चंद्र आज उत्तम फळ देण्यास सज्ज आहे. मुले आनंद देतील. स्त्रियांना मौज मजा ,साज शृंगार करण्यास उत्तम दिवस .आज आपण या ग्रह स्थितीचा फायदा घ्या.आर्थिक लाभ होतील. दिवस उत्तम.
सिंह
आर्थिक बाबी जरा सांभाळून करा. घरांमधे वातावरण आनंदाचे राहील. चंद्र शुक्र शुभ योगात आहे. स्त्रिया घरात आज जास्त वेळ खर्च करतील.अनेक लोकांचे सहकार्य मिळेल .. दिवस शुभ .
कन्या
आज चंद्र दिवसभर शुभ स्थितीत आहे. तुमच्यात एक प्रकारचे तेज येईल. चिकाटीने सर्व कामे पार पाडाल. स्त्रिया पूजेच्या निमित्ताने आनंदाने घराबाहेर पडतील. दिवस उत्तम.
तुला
आज तुमचे कुठे पैसे येणे असेल तर नक्की प्रयत्न करत रहा. कदाचित वसुली होईल. कुटुंब पाठीशी असेल. त्यांना वेळ द्या. दिवस चांगला आहे. गोड बोला .
वृश्चिक
राशीतील चंद्र शुक्रा शी शुभ योग करीत आहे. मार्केटिंग, साठी उत्तम योग. कामे मार्गी लागतील. स्त्रिया आज अतिशय आनंदाने पूजा , व्रत, करतील. दिवस शुभ.
धनु
खर्च, नुकसान, अनपेक्षित अडचण असा दिवस आहे. बारीक सारीक आरोग्याच्या तक्रारी जाणवत राहतील. पण काळजी करू नका. गुरु महाराज समर्थ आहेत. दिवस मध्यम .
मकर
पत्र, ईमेल, फोन, असे महत्त्वाचे संपर्क आज करावे लागतील. जोडीदार ,स्त्री व्यक्ती कडून फायदा संभवतो. आर्थिक बाजू पक्की असू द्या. स्त्रिया आज मैत्रिणींबरोबर श्रद्धेने व्रत करतील. दिवस लाभदायक.
कुंभ
कार्यक्षेत्रातून काही शुभ समाचार, किंवा मनोबल वाढवणारी घटना घडेल. मुले तुम्हाला जरा गुंतवून ठेवण्याची शक्यता आहे. कुटुंबाला वेळ द्या. आर्थिक व्यवहार जपून करा. दिवस शुभ.
मीन
आज भाग्य तुमची साथ देणार आहे. मीन व्यक्ती तश्याच श्रद्धाळू असतात. आज पूजेची सुंदर तयारी करा.जोडीदार आनंदी राहील. छोटे प्रवास संभवतात. घर,अणि मुल यांकडे लक्ष द्या. दिवस उत्तम आहे.
शुभम भवतु!!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.