मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

राशीभविष्य: सिंह आणि मकर राशीने हिंमत ठेवावी, 'या' राशींसाठी मात्र दिवस चांगला!

राशीभविष्य: सिंह आणि मकर राशीने हिंमत ठेवावी, 'या' राशींसाठी मात्र दिवस चांगला!

आज रविवार दिनांक 20 जून 2021. तिथी ज्येष्ठ शुद्ध दशमी. आजचं बारा राशींचं भविष्य, सोबत कन्या राशीचे स्वभाव गुण-दोष जाणून घ्या..

आज रविवार दिनांक 20 जून 2021. तिथी ज्येष्ठ शुद्ध दशमी. आजचं बारा राशींचं भविष्य, सोबत कन्या राशीचे स्वभाव गुण-दोष जाणून घ्या..

आज रविवार दिनांक 20 जून 2021. तिथी ज्येष्ठ शुद्ध दशमी. आजचं बारा राशींचं भविष्य, सोबत कन्या राशीचे स्वभाव गुण-दोष जाणून घ्या..

आज रविवार दिनांक 20 जून 2021.तिथी  ज्येष्ठ शुद्ध दशमी. रोजच्याप्रमाणे एका राशीच्या स्वभावदोषांविषयी थोडंसं...

आज  जाणून घेऊया  कन्या  राशी बद्दल. कन्या रास ही  राशी चक्रातील सहावी  रास. पृथ्वी तत्त्वाची, द्विस्वभाव  ,राशी स्वामी बुध. कन्या  किंवा  हातात डहाळे  घेतलेली मुलगी  हे चिन्ह आहे. राशीचा अंमल पोटावर असतो. अत्यंत हुशार,चिकित्सक, बुद्धिमान, स्वाभिमानी व्यक्ती. कधीतरी संशयी  व  भिडस्त सुद्धा  असतात. मध्यम उंची, थोडे  मोठे पोट व आकर्षक व्यक्तिमत्त्व असते. बुधाची उपासना ,जप  करावा.

आता आजचं बारा राशींचं भविष्य

मेष

आज चंद्र  कन्या राशीतून भ्रमण  करेल.  आराम करा, शांत रहा, दिवस मध्यम आहे. एखाद्या धार्मिक कार्यासाठी आमंत्रण  येईल. मातृ चिंता  संभवते.

वृषभ

तृतीय स्थानात मंगळ भ्रमण  अनपेक्षित गाठी भेटी, प्रवास दर्शवत आहे. द्वितीय  शुक्र आर्थिक लाभ मिळवून देईल. मुलं आज तुम्हाला  कामाला लावतील .

मिथुन

आर्थिक  बाजू संभाळून रहा. सरकारी  कामात दिरंगाई संभवते. कायदे पाळा. आरोग्य ठीक राहील. गृहसौख्य  उत्तम मिळेल .

कर्क

आज शत्रू तुमच्या समोर  टिकणार नाहीत. तृतीय चंद्र  पराक्रमात वाढ करेल. बहिण भावाशी प्रेमाने  रहा. गैरसमज टाळा. दिवस उत्तम.

सिंह

कौटुंबिक सौख्य, आर्थिक लाभ, संभवतात. पण खर्च ही होईल. हिम्मत  ठेवा. गुरु अडचणी आल्या तरी  सांभाळून घेईल.

कन्या

राशीतील चंद्र  कामे  मार्गी लावेल. कुठूनतरी महत्त्वाचा निरोप किंवा बातमी येईल. मुलांची चिंता  वाटेल. पोटाचे  दुखणे  डोके वर काढेल.

तुला

धैर्य ,साहस आणि सातत्य अडचणीच्या काळात  तुमची  मदत करेल. खर्च, प्रकृतीच्या बारीकसारीक  तक्रारी  सुरू राहतील. वाढलेले काम आज संपवून टाका.

वृश्चिक

चंद्र शुभ आहे, संतती सुख, मित्र मैत्रिणीशी गाठी भेटी, आर्थिक बाजु उत्तम  राहील. वाहने  जपून चालवा. अधिकारी व्यक्तींशी जपून बोला.

धनू

आज  कार्य क्षेत्रात तुमचा प्रभाव राहील. अष्टमात मंगळ प्रवासात अडचणी, नुकसान दाखवतो. आर्थिक नियोजन करा. डोळ्यांची काळजी घ्या.

मकर

आज राशीतील शनी मुळे नैराश्य ,भीती  जाणवेल. घाबरू नका. हळूहळू सगळ्या  गोष्टी मार्गी  लागतील.  मनोबल  खचू देऊ नका.  दिवस  एखादी चांगली  बातमी देईल.

कुंभ

आज दिवस जरा  वादग्रस्त जाण्याची  शक्यता  आहे. जपून रहा. कोणाशी वाद  होऊ देऊ नका. आर्थिक बाजू  ठीक राहील. प्रकृती  अस्थिर  राहील.

मीन

सध्याचा काळ तुमच्या स्वभावात थोडा  बदल  दिसेल. . आक्रमक व  धाडसी वृत्ती  होईल. मुळात संयमी असल्याने  तुम्ही स्वतःवर ताबा  ठेवाल. दिवस  आनंदात  कुटुंबीयां सोबत  घालवाल.

शुभम  भवतु!!

First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya