Home /News /astrology /

Daily horoscope : नीट लक्ष ठेवा; आज मिळू शकते उत्तम संधी

Daily horoscope : नीट लक्ष ठेवा; आज मिळू शकते उत्तम संधी

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 29 जानेवारी 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) दिवसाची खिन्न सुरुवात तुम्हाला थोडीशी निराशाजनक वाटू शकते. पण बरीचशी कामं सुरळीत पार पडल्याने दिवस आशादायी असेल. एखादी व्यक्ती कौटुंबिक समस्येसाठी तुमच्याशी संपर्क साधू शकते. निरोगी जीवन आणि काम यांचं संतुलन राखण्याचा प्रयत्न करा. LUCKY SIGN – सूर्योदय (a sunrise) वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) आयुष्याबाबत नव्याने निवडी करण्याच्या उत्कृष्ट संधी तुम्ही नीट लक्ष दिल्यास मिळू शकतील. सध्या तुमची अंतःप्रेरणा प्रबळ आहे. तुमच्या भावना दडपण्याचा प्रयत्न करू नका, विशेषकरून तुमची काळजी करणाऱ्यांसमोर. LUCKY SIGN – बांबूचं रोप (a bamboo plant) मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) एखादी झटपट ट्रिप करण्याच्या विचारात असल्यास ही वेळ त्यासाठी चांगली आहे. आजच्या दिवसात गंभीर विषयाबद्दलची चर्चा तितकीशी साध्य होणार नाही. ती नंतरसाठी राखून ठेवा. एखाद्या साध्या वाटणाऱ्या प्रस्तावातही बरेच छुपे तपशील असू शकतात. त्यामुळे कोणत्याही नवीन कागदपत्रांवर सही करायची घाई करू नका. LUCKY SIGN – ब्राइट फ्लॅग (a bright flag) कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) तुमच्या दृष्टिकोनाचं मूल्य इतरांनी ओळखणं महत्त्वाचं आहे. एखादी मस्करी फार झाल्यास त्याची कुस्करी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखादं सामाजिक कार्य नियोजनप्रमाणे न होण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN – अचानक झालेला फेरफटका (An unplanned walk) सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) भूतकाळाच्या प्रयत्नांवर आता फुशारकी मारल्यास त्याचा नकारात्मक परिणाम तुमच्यावर व्हायला सुरुवात होऊ शकते. तुमच्या मुलांना रोजच्या कामात मदत करण्याची हीच वेळ आहे. पचनाबाबतच्या काही समस्यांमुळे तुम्हाला घरच्या जेवणावरच अवलंबून राहावं लागण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN – मोती (a pearl) कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) आजच्या दिवसात हलकेफुलके आणि गंभीर क्षणही अनुभवायला मिळू शकतात. तुम्ही भावनिक होऊ शकता आणि नंतर लगेचच व्यावहारिक व्हाल. तुमच्या वाटाघाटींशी निगडित कौशल्यांना थोडा उजाळा देण्याची गरज आहे. LUCKY SIGN – नवीन अंगठी (A new ring) तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) धोरणात्मकरीत्या काम करणाऱ्यांकडे आजच्या दिवशी जास्त ऊर्जा असेल. सातत्य राखल्यास तुम्हाला चांगली प्रगती करता येईल. रागीटपणाच्या समस्येमुळे तुमचं लक्ष विचलित होईल; पण ते फार काळ टिकणार नाही. LUCKY SIGN – रेडिओ (a radio) वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) जोडीदार आणि आई-वडील यांच्यात रस्सीखेच होऊ शकते. तुमची मुत्सद्देगिरी आणि अनुभव या ठिकाणी महत्त्वाचे ठरतील. एखाद्या नव्या व्यवसायाचं नियोजन आता आकार घेण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN – टेराकोटा बेसिन (a terracotta basin) धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) मत्सरावरचा सर्वात उत्तम उपाय म्हणजे स्वतःकडील चांगल्या गोष्टी पाहणं. तुम्हाला यात अडकल्यासारखं वाटत असल्यास यातून स्वतःच बाहेर पडायचा प्रयत्न करा. आज तुम्हाला चिडचिड झाल्यासारखंही वाटू शकतं. संकेतानुसार संध्याकाळी बाहेर जाण्याचा छान प्लॅन होऊ शकतो. LUCKY SIGN – सिलिकॉन साचा (A silicon mould) मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) काही जुने मित्र तुम्हाला सरप्राइज देऊ शकतात; पण तुम्ही मात्र त्यांना भेटण्याच्या मूडमध्ये नसाल. आज तुम्हाला तुमच्याच कोषात राहण्याची किंवा स्वतःसाठी वेळ देण्याची तीव्र इच्छा होऊ शकते. अचानक थोडी डोकेदुखी होण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN – मेणबत्ती (a candle) कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) तुमचा एखादा जुना विसर पडलेला छंद किंवा जुन्या आवडत्या गोष्टीत रमण्याचा आजचा दिवस आहे. आज तुमची आंतरिक ऊर्जा उत्साहवर्धक दिसत आहे. तुमच्या गतीचा जास्तीत जास्त उपयोग करून पैशांचा प्रश्नही सुटू शकतो. LUCKY SIGN – कँडी (a candy) मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) भूतकाळातल्या काही निराशाजनक गोष्टी आज तुम्हाला पुन्हा सतावण्याची शक्यता आहे. तुमच्या सहकाऱ्यांवर जास्त टीका करू नका. तुमचा जोडीदारही काहीसा दुरावलेला वाटू शकतो. एखादं प्रलंबित संभाषण आता पूर्ण होण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN – माचिस पेटी (a matchbox)
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या