Home /News /astrology /

Daily Horoscope 14 January 2022: 'मेष' प्रलंबित कामात यश, 'मकर' खाण्याच्या सवयींना शिस्त लावा

Daily Horoscope 14 January 2022: 'मेष' प्रलंबित कामात यश, 'मकर' खाण्याच्या सवयींना शिस्त लावा

आज संक्रांत - सूर्याचा मकर राशीत प्रवेश. तुमची सूर्यरास कुठली आणि त्यानुसार तुमचं आजचं भविष्य (Daily Horoscope 14 January 2022) काय?

मुंबई, 14 जानेवारी - सितारा-द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa-The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 14 जानेवारी 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या कामात यश मिळेल. नव्याने सुरू झालेल्या प्रकल्पाकडून मोठ्या अपेक्षा ठेवू नका. त्यापेक्षा 'प्लॅन बी'चा विचार करणं चांगलं. स्वतःवर लक्ष केंद्रित करण्यासाठी काही क्वालिटी टाइम द्या. LUCKY SIGN - घरातलं झाड (An indood plant) वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) नवा संवाद सुरू करण्यासाठी आज चांगला दिवस आहे. तुमचे पैशांचे व्यवहार स्पष्ट आणि पारदर्शक ठेवा. कोणत्याही प्रकारच्या कन्फ्युजनमुळे थोडा तोटा होऊ शकतो. तुमचं जुनं रूटिन पुन्हा फॉलो करू इच्छित असाल, तर सध्याचा कालावधी त्यासाठी योग्य आहे. LUCKY SIGN - सूर्योदय (A sunrise) मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) तुमच्या भावनिक समस्या सोडवा आणि त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढा. त्यामुळे तुम्हाला अधिक मोकळं आणि आत्मविश्वासपूर्ण वाटेल. महत्त्वाच्या मीटिंगसाठी चांगली तयारी करा. आउटडोअर अॅक्टिव्हिटीमुळे उत्साह वाटेल. LUCKY SIGN - An antique clock कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) रिलॅक्स होण्यासाठी आणि नंतरसाठी ऊर्जा साठवून ठेवण्यासाठी चांगला दिवस. कमी बोलणं आणि जास्त निरीक्षण करण्याचा हा दिवस आहे. विचार करून तुमच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवा. जे आत्ता महत्त्वाचं वाटतंय, ते कदाचित नंतर करूनही चालू शकतं. LUCKY SIGN - बाग (A garden) सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) आपण नेहमीपेक्षा जास्तच फिलॉसॉफिकल झाल्यासारखं तुम्हाला आज वाटेल. तुम्ही ज्या प्रक्रियेने काम करून तुम्हाला आवश्यक ते रिझल्ट्स मिळत नाहीत, त्या प्रक्रियांचं सुलभीकरण करा. आज तुमचा जास्त वेळ कुटुंबासमवेत जाणार आहे. LUCKY SIGN - A wind chime कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) तुम्ही जे काही मागत आहात, त्याबद्दल दक्ष राहा. कारण ती बाब अशा वेळी घडेल की जेव्हा तुम्ही तयारीत नसाल. कोणी तरी अनोळखी व्यक्ती तुमच्यावर विश्वास ठेवील आणि तुमच्यासोबत बिझनेस करण्याची इच्छा व्यक्त करील. बदलत्या हवामानात स्वतःचं संरक्षण करा. LUCKY SIGN - नवी कार (A new Car) तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) सावकाश, पण सातत्यपूर्ण हे आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य ठरावं. दिवसाची सुरुवात एकदम अॅक्शन-पॅक्ड होईल; पण नंतर मात्र तो वेग घटेल. तुमचा जवळचा मित्र तुमच्याशी संवाद साधू इच्छित आहे. LUCKY SIGN - लाल पान (A red leaf) वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) तुमचे विचार दाबून ठेवू नका. संधी निघून जाण्यापूर्वी ते व्यक्त करा. आजचा दिवस तुमच्या वेळेचं योग्य व्यवस्थापन करण्याचा आहे. तुमच्याकडे आकर्षित झालेलं कोणी तरी लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचेल. LUCKY SIGN - Blue Pottery धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) कौटुंबिक विषयांबद्दल अपडेट राहा. किरकोळ वाद-प्रतिवादाची परिस्थिती उद्भवू शकते. इगोवर आधारित असलेल्या मुद्द्यांना जास्त महत्त्व देऊ नका. सोडून द्या. LUCKY SIGN - A restaurant Menu मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) माइंडफुलनेस अॅक्टिव्हिटीने तुमच्या दिवसाची सुरुवात करा. गेल्या काही दिवसांत धावपळीचे अनेक क्षण आले. तुमच्या मनाला आता दिशेची आणि लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. तुमच्या खाण्याच्या सवयींना शिस्त लावा. LUCKY SIGN - A bright wall कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) तुम्हाला देण्यात आलेलं काम कठीण असेल; मात्र तुमच्याकडे ते पूर्ण करण्याची क्षमता आहे. काय गमावलं आहे, याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही ते पुन्हा मिळवू शकता, तयार करू शकता. सुट्टीचं नियोजन करू शकता. LUCKY SIGN - A pile of bricks मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) प्राथमिक अवस्थेत असलेलं काम लोकांचं लक्ष आकर्षून घेईल. तुमच्या कष्टांसाठी तुमचं कदाचित कौतुक होईल. या दिवसाची ऊर्जा असे संकेत देत आहे, की आज कोणा खास व्यक्तीची भेट होईल. वाहन चालवताना सावध राहा. LUCKY SIGN - White Curtains
Published by:News18 Web Desk
First published:

Tags: Astrology and horoscope, Makar Sankranti, Rashibhavishya

पुढील बातम्या