Home /News /astrology /

राशीभविष्य: सिंह राशीसाठी आजचा दिवस उत्तम; वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी घ्यावी काळजी; वाचा बारा राशींचं भविष्य

राशीभविष्य: सिंह राशीसाठी आजचा दिवस उत्तम; वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी घ्यावी काळजी; वाचा बारा राशींचं भविष्य

जाणून घ्या आजचं राशीभविष्य

जाणून घ्या आजचं राशीभविष्य

Rashi Bhavishya: आज दिनांक 24 जानेवारी 2022 वार सोमवार पौष कृष्ण शष्ठी/सप्तमी. आज चंद्र कन्या राशीतून भ्रमण करेल.पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

आज दिनांक 24 जानेवारी 2022 वार सोमवार पौष कृष्ण शष्ठी/सप्तमी. आज चंद्र कन्या राशीतून भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य (Rashi Bhavishya). मेष आज  दिवस अनुकूल आहे. प्रकृती मार्गी लागण्याची शक्यता आहे. कुटुंब देखील आज तुमचा वेळ घेणार आहे.  शुक्र भाग्यात, सुंदर वस्तु, कपडे आदी खरेदी कराल. दिवस  चांगला आहे. वृषभ आज दिवस तुम्हाला कामाला लावणार असे दिसते. पण काळजी नको, तुम्ही उत्साहाने  घरासाठी खरेदी काम कराल. . संततीचे काळजी घ्या. ऑफिस मध्ये  जास्तीचे काम पडेल. कुटुंबाचा पाठींबा मिळेल. दिवस उत्तम. कर्क अष्टमात  गुरू  षष्ठ स्थानातील  मंगळ  निश्चित पणे उलाढाल वाढवतील. मामा कडुन फायदा होईल. तुमच्या मनाचा कल पाहून निर्णय घ्या.  सूर्य बुध  उच्च शिक्षणात भरघोस यश देईल. दिवस चांगला. सिंह चंद्र  शुक्र केंद्र इग असून तुमचे  व्यक्तिमत्त्व सर्वाना आकर्षित करेल. आर्थिक बळ राहील. विवाहासाठी काही उत्तम  स्थळ येऊ शकतात. गुरुची उपासना करावी. दिवस शुभ  आहे. कन्या आज राशी स्थानातील चंद्र तुम्हाला थकवून टाकणार आहे. अतिशय कष्ट करून प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो. आर्थिक स्थिती ठीक राहील. दिवस मध्यम  आहे. तुला आज आपण आराम करावा असे ग्रह सांगत आहे. चतुर्थ शनि घरा संबंधी आनंदाची बातमी देऊ करील. चंद्र शुक्र शुभयोग आहे. उत्तम लाभ होतील. ऑफिस मध्ये खूप काम  पडेल. पण त्याचा फायदा होईल. दिवस शुभ. वृश्चिक आज तुमचा दिवस  काही महत्त्वाच्या मीटिंग्स, नवीन लोकाना भेटणे, मोठे निर्णय किंवा उशिरा पर्यन्त कामात जाणार आहे. कोणालाही लागेलसं बोलू नका.  प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. दिवस उत्तम. धनु आज चंद्र दशम स्थानात आहे, काही  महत्वाचे कार्य घडेल. किंवा प्रवास योग येतील. तुमच्या बुद्धी चा वापर करून एखाद्या पेच प्रसंगातून   बाहेर याल.त्यामुळे तुमचे  नाव होईल. वाहन  जपून चालवा. दिवस शुभ आहे. मकर आज राशीच्या भाग्य स्थानात चंद्र भ्रमण असून मानसिक त्रास संभवतो. आर्थिक स्थिती ठीक राहील. जोडीदाराची काळजी घ्या. वाद टाळा. प्रकृती  कडे जरा लक्ष द्या. शनीची उपासना करावी. दिवस  मध्यम आहे. कुंभ चंद्र अष्टमात असून आर्थिक दृष्ट्या उत्तम फळ देणारा आहे  संतती सुख मिळेल.काही वार्ता कानी पडेल. चतुर्थ स्थानातील राहू घरा संबंधी काही घडामोडी घडवेल. दिवस  शुभ. मीन आज चंद्र सप्तम स्थानात असून मामा मावशी कडील व्यक्ती भेटतील. आईला वेळ द्या. संतती चिंता थोडी कमी होईल. ईश्वरी कृपा राहील. दिवसभराची दगदग, प्रकृतीवर परिणाम करेल. दिवस बरा आहे. शुभम भवतु!!
Published by:Atharva Mahankal
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या