Home /News /astrology /

Daily Horoscope: वृश्चिकसाठी नवी प्रॉपर्टी खरेदी करायला योग्य दिवस; कुंभसाठी एक सावध इशारा

Daily Horoscope: वृश्चिकसाठी नवी प्रॉपर्टी खरेदी करायला योग्य दिवस; कुंभसाठी एक सावध इशारा

Daily Horoscope 16 January 2022: रविवारचा दिवस तुमच्यासाठी काय घेऊन येईल? वाचा सूर्यराशीप्रमाणे तुमचं दैनंदिन राशीभविष्य

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 16 जानेवारी 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) नीरस, कंटाळवाण्या, एकसुरी आयुष्यामुळे तुम्ही तुमच्या जुन्या आवडीकडे परत वळण्याची शक्यता आहे. सध्या आयुष्य थबकल्यासारखं वाटत असेल, त्याला गती मिळणं गरजेचं आहे. हा एक तात्पुरता टप्पा आहे. आठवडाभरात आर्थिक घडामोडीही वेग घेतील. काहींना मानसिक स्वास्थ्यासाठी पाळीव प्राणी घरी आणावेसे वाटतील. नवीन मित्रमैत्रिणी जोडण्यापेक्षा जुन्या मित्रमैत्रीणींच्या संपर्कात राहणं अधिक आनंददायी वाटेल. LUCKY SIGN - (An open gate) वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) तुमच्याकडे येणाऱ्या नवीन संधींचा चांगला उपयोग करा. तुमच्या कामाला हळूहळू गती मिळत आहे. तुम्ही स्वतःसाठी काही मोठी उद्दिष्टे निश्चित केली आहेत, ती पूर्ण होणार नाहीत, अशी नकारात्मक भावना निर्माण होऊ शकते. मुलांना तुमच्यासोबत अधिक वेळ घालवायचा आहे. घरातले प्रश्न घरातच सोडवणं योग्य ठरेल. आरोग्याच्या दृष्टीनं नवीन दिनचर्या आखून त्याचं पालन केल्यास मानसिक स्वास्थही सुधारेल. LUCKY SIGN - (a rose petal) मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) घराचं रिनोव्हेशन करण्याचा विचार मनात घर करण्याची आणि तो कृतीत आणण्याची दाट शक्यता आहे. उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होण्याची शक्यता आहे. मात्र त्यासाठी खूप वेळ देण्याची गरज असेल. तुम्ही त्यासाठी अनुकूल असाल. नवनवीन पर्याय आजमावण्यासाठी तुम्ही तयार असाल. तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. भूतकाळात घडलेल्या त्रासदायक आणि नकारात्मक गोष्टी आता मागे पडतील. सकारात्मक ऊर्जा नवी दिशा देईल. व्यापारी, रिअल इस्टेट व्यावसायिक आणि छोटे-मोठे व्यावसायिक यांच्यासाठी हा उत्तम काळ आहे. LUCKY SIGN – (A buddha statue) कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) सध्या थांबा आणि वाट पहा असे धोरण स्वीकारण्याची वेळ आहे. मात्र तुम्ही मोठ्या कामाची अंमलबजावणी करणार असाल तर थोडं थांबण्याची आवश्यकता आहे. तपासून घेतलेल्या आणि विश्वासार्ह स्रोतांवर अवलंबून राहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या लोकप्रियतेचा, प्रसिद्धीचा कोणीतरी फायदा घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी होणाऱ्या बदलांपासून सावध राहा, कदाचित ते तुमच्यासाठी प्रतिकूल ठरतील. घर हीच जागा शांतता देणारी आणि विश्वासार्ह आहे. LUCKY SIGN - (A portrait) सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) एखाद्या नव्या बांधिलकीच्या दिशेनं तुमचा प्रवास सुरू होईल. मर्यादित जोखमीसह घेतलेला आक्रमक दृष्टिकोन तुमच्या प्रगतीला पूरक ठरेल. तुमची स्वाभाविक आकर्षकता, प्रभावी व्यक्तिमत्व लोकांना आकर्षित करेल आणि तुमच्या मतांची आणि विचारांची दखल घेण्यास भाग पाडेल. घरगुती आघाडीवर काही किरकोळ कुरबुरी होऊ शकतात. अचानक जुळून आलेलं गेट -टुगेदर आनंदाचा शिडकावा करेल, तुम्हाला नवी ऊर्जा, उत्साह देऊन जाईल. LUCKY SIGN - (A box of sweets) कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) तुमच्या संपर्कात आलेली नवीन व्यक्ती तुम्हाला आवडू शकते. सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या एखाद्या गोष्टीचा वापर कराल. एखादी गोष्ट गोपनीय ठेवणं कठीण होईल, मात्र ते गुप्त ठेवणं आवश्यक असेल. सकाळी वर्कआउट करणं जमत नसेल तर काही काळासाठी त्यासाठी थोड्या उशीराची कामाची वेळ निवडा. जवळची नाती आणि व्यवहार यांची गल्लत करू नका. ते परस्परांशी जोडू नका. LUCKY SIGN - (A name tag) तुळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) सध्या काहीच गोष्टी पुढे सरकत नसल्याचं जाणवेल. एखादी नवीन गोष्ट घडण्याचीही शक्यता नाही असं वाटेल.पण ही तात्पुरती स्थिती आहे. एखादा बोगदा ओलांडेपर्यंत कसा अंधार असतो, तसा हा टप्पा तात्पुरता आहे. लवकरच ही स्थिती बदलेल. तुम्ही नवीन योजना आखाल, तुमची भरभराट होईल. वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या आणि नंतर मागं पडलेल्या तुमच्या प्रमोशनच्या हालचाली पुन्हा सुरू होतील. LUCKY SIGN - (A walking stick) वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) चांगल्या मनाच्या माणसांसोबत चांगल्याच गोष्टी घडतात. तुमचा दृष्टिकोन नेहमीच चांगला असतो, त्यामुळे तुमची प्रगती होण्यास मदत होईल. तुमच्या घरी येणाऱ्या मदतनीस आजारी पडू शकतात. शक्य असल्यास त्यांना अवश्य मदत करा. इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी कराल. नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही अगदी योग्य वेळ आहे. LUCKY SIGN (A wooden box) धनु (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) तुम्‍ही एखादी गोष्ट खरेदी करण्‍याचा तसंच मित्रमैत्रिणींसोबत मजा करण्याची, वेळ घालवण्‍याचा बेत आखत असाल तर नशीब तुम्हाला साथ देईल. बागकाम हा एक चांगला छंद आहे, त्यातून तुम्हाला व्यवसायाची कल्पना देखील सुचू शकेल. तुमच्या कामाची गती संथ झाली असेल तर त्याला गती देण्यासाठी काही गोष्टी बदलण्याची गरज आहे. धावपळीच्या आयुष्यात थोडा बदल म्हणून एखाद्या सहलीला जाण्याचा योग आहे. LUCKY SIGN - (pink flowers) मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) कुटुंबासोबत एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार कराल. या महिन्याच्या अखेरीस तुम्हाला चांगला प्रोजेक्ट मिळण्याची किंवा डील होण्याची शक्यता आहे. तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याविषयी सार्वजनिकरित्या टीका करू नका, त्यांच्या कानावर ही गोष्ट जाऊ शकते. लवकरच किंवा नंतर याबद्दल ऐकायला मिळेल. तुमच्याकडे व्यवस्थापनाची हातोटी आहे. मोठ्या प्रमाणावर एखादी गोष्ट करण्याची क्षमता आहे. त्याचा वापर करा. LUCKY SIGN - (A brand new coin) कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) तुमच्या एखाद्या मित्राला तुमची गरज आहे, ते ओळखून त्याची मदत करा. काही वर्षांपूर्वी घडलेल्या प्रकारांसारखे काही प्रकार पुन्हा घडण्याची शक्यता आहे. पण आता तुम्हाला त्याचा आधीच अंदाज येईल. तुम्हाला प्रयोग करायला आवडतात; मात्र त्यासाठी आधी योग्य संशोधन करत नसल्यानं अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. लग्न पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे. खरोखरच मनापासून तुमचं कौतुक असणारी व्यक्ती भेटेल. सध्यातरी कसलीही भागीदारी करू नये. LUCKY SIGN - (an aquarium) मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) कामाच्या बदल्यात मिळालेला परतावा निराशाजनक वाटण्याची शक्यता आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही पातळीवर काही नवीन गोष्टी करण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात. एकटेपणा जाणवत असेल तर जुन्या मित्रांशी पुन्हा संपर्क साधल्यास तो कमी होऊ शकेल. सतत बदलतं हवामान प्रवासाच्या योजनांमध्ये अडथळे आणेल. ऑनलाइन फसवणुकीपासून सावध रहा. तुमच्या प्रश्नांवर, समस्यांवर तुमच्या आई-वडिलांकडे उत्तर असू शकते, तुम्ही त्यांच्याकडं जाणं महत्त्वाचं आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी पुढील आठवडा अगदी व्यस्ततेचा ठरणार आहे. LUCKY SIGN - (tangerine plates)
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

पुढील बातम्या