Home /News /astrology /

राशीभविष्य: वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी प्रकृतीकडे द्या लक्ष; जाणून घ्या कसा जाईल तुमचा दिवस

राशीभविष्य: वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी प्रकृतीकडे द्या लक्ष; जाणून घ्या कसा जाईल तुमचा दिवस

जाणून घ्या आजचं राशीभविष्य

जाणून घ्या आजचं राशीभविष्य

आज पौष पौर्णिमा. आज चंद्र मिथुन राशीत भ्रमण करीत आहे. रात्री 10 वाजून 2 मिनिटांनी कर्क राशीत प्रवेश करेल.

आज दिनांक 17 जानेवारी 2022.वार सोमवार. आज पौष पौर्णिमा. आज चंद्र मिथुन राशीत भ्रमण करीत आहे. रात्री 10 वाजून 2 मिनिटांनी कर्क राशीत प्रवेश करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष तृतीय स्थानात होणार चंद्र  भ्रमण  भावंडाना फार चांगले जाईल. आज शक्यतोवर प्रवास टाळा. कोणाशी शाब्दिक वाद नको. आर्थिक बाजु ठीक राहील. पौर्णिमा  शुभ आहे. वृषभ धनस्थानातील ग्रह आज अचानक लाभ मिळवुन देतील. पण पौर्णिमेच्या प्रभाव क्षेत्रात आहात.व्यवहार जपुन करा. मोठे निर्णय लांबणीवर टाका. डोळ्यांची काळजी घ्या. कुटुंबात कोणाला नाराज करू नका. दिवस  चांगला जाईल. मिथुन आज दिवस सांभाळून राहण्याचा आहे. तुमच्या राशीतून होणारी  पौर्णिमा मन अशांत करेल. व्यवसाय धंद्यात नवीन निर्णय आज नको. अष्टमात शनि आणि मंगळ जपुन व्यवहार करा असे सुचवत आहे .दिवस  मध्यम . कर्क आज व्यय स्थानातील चंद्र भ्रमण आणि पौर्णिमेच्या प्रभावातून दिवस बरा जाईल. नुकसान,  काही प्रकृतीची तक्रार ,कार्य क्षेत्रात अडचणी असा दिवस आहे. राशी च्या षष्ठ स्थानात  मंगळ   उग्र  फळ देईल . जपुन रहा. दिवस  अनुकूल नाही. सिंह आजची पौर्णिमा ही लाभ स्थानात होत आहे.  तुम्हाला  मित्र मैत्रिणींसोबत दिवस घालवावा असे वाटेल. त्यासाठी खर्च कराल. मुलांना मात्र आज जपा. प्रवास टाळा. दिवस बरा  आहे. कन्या आज वरिष्ठांशी वाद विवाद नको. त्या पेक्षा  आपले नेमलेले काम करून  बाजूला व्हावे  .घराकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. वडीलांचे आरोग्य सांभाळा. आर्थिक स्थिती ठीक आहे. दिवस बरा. तुला आज भाग्याला जरा ग्रहण लागल्यासारखे होईल. साध्या गोष्टी वेळ खातील. धार्मिक   वचन,पुजा करावी. अष्टमात असलेला राहू  काही तक्रारी  निर्माण करेल. भावंडांची भेट,प्रवास  संभवतो. दिवस मध्यम . वृश्चिक अष्टम स्थानातील  ग्रहांची दाटी प्रकृतीकडे अगदी नीट लक्ष द्या असे  सुचवत आहे. कोणाशीही  नको ती चर्चा, वाद करू नका. जोडीदाराकडून मदत घ्या. सध्या  घरांमधे होणारा खर्च  कमी करा. दिवस मध्यम आहे. धनु आज पती पत्नी एकमेकांना वेळ द्या. आर्थिक बाजु जरा सांभाळून घ्या. उगीच खर्च नको. कर्ज  देणे किंवा घेणे  दोन्ही नकोच. अपघात, लागणे पडणे यापासून अगदी जपून रहा. दिवस शांत घरात घालवा. मकर षष्ठ स्थानातील ग्रहांचा प्रभाव आरोग्याचा प्रश्न निर्माण करेल. मातृ  चिंता संभवते. एकुण कोणाशीही शत्रुत्व करण्याचा  आजचा दिवस  नाही. आर्थिक बाजू ठीक राहील. दिवस मध्यम जाईल . कुंभ आज पंचमात   होणार्‍या पौर्णिमेच्या  प्रभावातून मुलांचे  प्रश्न पुढे येतील. त्याची काळजी घ्या  मन थोडे अस्वस्थ राहील . गुरुकृपेने फारसा त्रास होणार नाही. पण जपून, शांततेत दिवस घालवा. मध्यम दिवस . मीन आज गृहकलह टाळण्यासाठी कोणाशीही वाद करू नका. घरातील वृद्ध व्यक्तींची काळजी घ्या. आर्थिक स्थिती ठीक राहील. प्रकृती साथ देईल. मुलांची काळजी घ्या. दिवस चांगला जाईल. शुभम भवतु!!
Published by:Atharva Mahankal
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

पुढील बातम्या