मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Daily Horoscope: या राशीची नवीन नोकरी पक्की; कसा असेल 3 जुलैचा दिवस? जाणून घ्या भविष्य

Daily Horoscope: या राशीची नवीन नोकरी पक्की; कसा असेल 3 जुलैचा दिवस? जाणून घ्या भविष्य

ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 3 जुलै 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 3 जुलै 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 3 जुलै 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 3 जुलै 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)

एखाद्या तीर्थक्षेत्राला भेट द्याल किंवा एखाद्या संताची भेट होऊन तो तुम्हाला युक्तीच्या चार गोष्टी सांगेल. प्रवास घडण्याचा योग आहे. किरकोळ वादातून विनाकारण भांडणं होण्याची शक्यता असल्याने त्यापासून दूर रहा. मुलाच्या वागण्याला वैतागाल. इतरांसाठी नियोजन आणि आयोजन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावाल.

LUCKY SIGN – A handheld

वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)

एखाद्या इंटरव्ह्युमध्ये पास होऊ किंवा एखाद्या निवड प्रक्रियेत निवडले जाऊ असं तुम्हाला मनापासून वाटत असेल तर ते खरं असू शकतं. तुमचं नशीब उच्चीचं आहे. घरात अजून कुरबुरी राहतीलच पण दैनंदिन कामांमुळे ऑफिसातील कामात चमक दाखवाल. कुणाच्याही बोलण्यातला अन्वयार्थ समजून घेण्याच्या कौशल्यात तुम्हाला प्रवीण व्हायला हवं.

LUCKY SIGN – A Salt Lamp

मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)

आता बदल घडणार आहेत तुम्ही आधी केलेल्या कामांची फळं आता मिळू लागतील. मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात असाल तर तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी उपयुक्त अशा एखाद्या चांगल्या संधीबद्दल तुम्हाला माहिती मिळेल. लघुउद्योजकांचं कर्ज मंजूर होऊ शकेल. तुमच्या व्यवसाय विस्तारात कमी पडत असलेली मदत एखाद्या महत्त्वाच्या व्यक्ती किंवा योजनेच्या माध्यमातून तुमच्यासमोर येईल.

LUCKY SIGN - A Solitaire

कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)

तुमच्या कामाची वृद्धी होण्यासाठी नव्या संधी मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही जरा दूर-दूरच राहत होतात आणि इतर तुमच्याशी संपर्क करण्याच्या प्रयत्नांत होते. आता हे उलटं होऊ शकतं. पालकांबाबतची चिंता संपून जाईल आणि तुम्ही मोकळे व्हाल.

LUCKY SIGN - A ropeway

सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)

काही जणं तुमच्या आयुष्यात सतत अडचणी आणण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या असण्याने तुम्ही रागावता. अशा माणसांच्या सोबत तुम्ही आहात पण आता ग्रहस्थिती तुम्हाला तुमच्या मनासारखं करण्यासाठी पोषक आहे. व्यवसाय करत असाल तर तुमचा स्रोत तुम्हाला उपलब्ध होईल.

LUCKY SIGN - A golden gate

कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)

चांगला संवाद साधण्यासाठी तुम्ही लोकांच्या विश्वासास पात्र व्हायला हवं. ऑफिसातील सीनिअर तुमच्या सध्याच्या कामावर नाराज असल्याने तुमच्याबद्दल आक्षेप घेतील. तुमच्या हातात काही संधी आहेत पण त्यातली एकही फळणार नाही असं दिसतं. अजून थोडा काळ थांबा, अंतरीचा आवाज कदाचित काही मदत करेल.

LUCKY SIGN - A Silver wire

तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)

तुमचा हेतू हेच तुमचं सामर्थ्य आहे त्यामुळे हेतुंना चिकटून रहा इतर गोष्टी आपोआप घडतील. तुम्ही इतरांबाबत खूप संशय घेताय त्यामुळे तुमच्या कामात अडथळे निर्माण होत आहेत. शेजारी त्रासदायक असतील पण त्यांच्याकडे दुर्लक्षच करा. कुठलीही महत्त्वाची गोष्ट मित्राला सांगू नका ती पसरण्याची शक्यता आहे.

LUCKY SIGN - A glass tumbler

वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)

सध्या मानसिक शांतता आणि स्थैर्य याची चिंता तुम्हाला आहे. मन विचारांनी व्यापून गेलंय. त्यामुळे काय करायचं हेच तुम्हाला कळत नाहीए. शांत रहा आणि ध्यान करा. तुमच्या आयुष्यात काही सकारात्मक गोष्टी घडणार आहेत ज्या तुमचं आयुष्य आणखी उत्तम करतील.

LUCKY SIGN – A blue aventurine

धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)

तुम्ही कुणाच्या प्रेमात असाल, नात्यात असाल तर त्या व्यक्तीसोबत बसून ज्या अडचणी आहेत त्या बोलून सोडवून टाका नाहीतर त्या आणखी क्लिष्ट होतील. तुम्ही दोघंही मनात छोट्या-छोट्या गोष्टी ठेवल्यामुळे तुमच्यातला दुरावा वाढतोय. एखाद्या ज्येष्ठाचा सल्ला तुम्हाला फायद्याचा ठरेल. लवकरच एखाद्या लग्नाला जाल.

LUCKY SIGN - A lake

मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)

तुमच्याकडे आहे ती संधी योग्य पद्धतीने वापरून आपला ठसा उमटवण्याची गरज आहे, सगळं काही तुम्ही संधी कशी हाताळता यावर अवलंबून आहे. तुमच्या अपेक्षांची पूर्ती करणारी ही संधी नसेलही पण तुम्ही पूर्ण समर्पणाने काम करायला हवं. कदाचित मोठ्या पदावर जाण्याची ही पहिली पायरी असू शकते. सार्वजनिक ठिकाणी पैशांचे व्यवहार करताना सावध रहा.

LUCKY SIGN - A white candle

कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)

तुम्ही प्रचंड एकाग्र मनाने काम करत आहात. तुमच्या या दृष्टिकोनाचं इतरांना कौतुक वाटतंय. तुमच्या मनासारख्या गोष्टी करून घेण्यासाठी तुम्ही या संधीचा फायदा घेतलाच पाहिजे. हे सगळं असतानाही तुम्ही शांत आणि आत्मकेंद्रीच रहाल. तुमचा प्रभाव पाडण्यासाठी तुम्हाला थोडंसं बोलायला हवं. नवं काम मिळण्याची शक्यता आहे.

LUCKY SIGN - A black tourmaline

मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)

तुम्ही लोकांबाबत किचकटपणानी वागणं थांबवलं पाहिजे नाहीतर ते खरोखरच तुमची किंमत करणार नाहीत. तुम्ही अनुभवी असाल पण जर तुमचं वागणं दुसऱ्याच्या खासगी आयुष्यात दखल देत असेल तर तुमच्या अनुभवाचं कुणी कौतुक करणार नाही. तुम्ही खरंच काळजी करत असलात तरीही दोन पावलं मागे या. तुम्ही संशोधन कार्यात असाल तर नव्या फॅसिलिटी उपलब्ध होऊन कामाला गती देण्यासाठी तुम्हाला थोडी वाट पहावी लागेल.

LUCKY SIGN - A red scarf

First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya