मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /Daily Horoscope: 'व्हॅलेन्टाईन डे' च्या दिवशी कोणत्या राशीला मिळणार खरं प्रेम? जाणून घ्या आजचं संपूर्ण राशीभविष्य

Daily Horoscope: 'व्हॅलेन्टाईन डे' च्या दिवशी कोणत्या राशीला मिळणार खरं प्रेम? जाणून घ्या आजचं संपूर्ण राशीभविष्य

ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 14 फेब्रुवारी 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 14 फेब्रुवारी 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 14 फेब्रुवारी 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

  सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 14 फेब्रुवारी 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

  मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)

  भूतकाळात घडलेल्या सगळ्या गोष्टी विसरून पुढं जाणं खूप कठीण असतं. परंतु त्या गोष्टी विसरण्याचा प्रयत्न करून नव्याने सुरुवात करणं हेच श्रेयस्कर असतं. त्यामुळे जुन्या गोष्टी विसरा, वेगळा विचार करा, नवी आव्हानं स्वीकारा आणि मग बघा तुम्ही अल्पावधीतच फार पुढे निघून गेलेला असाल. तुमचा उत्कर्ष झालेला असेल. जे गमावलंय त्यातून योग्य बोध घ्या आणि ती या अनुभवाची किंमत आहे, असं समजून पुढे चला.

  LUCKY SIGN - A pile of bricks (विटांचा ढीग)

  वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)

  एखाद्या व्यक्तीचा विचार वारंवार तुमच्या मनात येत असेल; परंतु सध्या तरी ती व्यक्ती तुमचं मन वाचू शकणार नाही. तुम्हाला तुमच्या भावना त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायच्या असतील, तर आधी स्वत:ची हिंमत वाढवा. तुमचं मन नेमकं काय सांगतंय ते ऐका आणि मगच कृती करा.

  LUCKY SIGN - finding a lost thing

  मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)

  तुमच्या चेहऱ्यावरून तुमच्या मनात काय चाललंय ते अगदी सहज कळतं. तरीही तुमच्या मनातल्या भावना वाचणं समोरच्या व्यक्तीला जमेलच असं नाही. त्यामुळं वाईट वाटून घेण्यापेक्षा इतर गोष्टींमध्ये मन रमवा. तोल ढळू देऊ नका. आर्थिक उलाढालीत गुंतून राहाल.

  LUCKY SIGN - an abstract art

  कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)

  नेहमी तुमची प्रशंसा करणार्‍या एखाद्या व्यक्तीकडून तुम्हाला आलेला एखादा संदेश तुम्हाला विचित्र वाटू शकतो; मात्र तो गांभीर्यानं घ्यायचा की नाही, हे तुम्हीच ठरवा. त्या संदेशामागची भावना खरी असू शकते. दिवसभर तुम्हाला कामातून अजिबात वेळ मिळणार नाही; मात्र संध्याकाळ खूप सुंदर, आनंददायी ठरेल.

  LUCKY SIGN - a satin cloth

  सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)

  तुमच्यासाठी अगदी खास असलेल्या व्यक्तीकडून अपेक्षित प्रतिसाद, बातमी न आल्यानं तुमची चिडचिड होऊ शकते; मात्र समोरच्या व्यक्तीलाही वेळ देणं आवश्यक आहे, हे लक्षात घ्या. एखादं नवीन काम करत असाल तर त्याबाबत सकारात्मक घडामोडी घडतील. दिवसाच्या दुसऱ्या टप्प्यात मित्रमंडळी भेटतील, मनोरंजन होईल.

  LUCKY SIGN - strategy game

  कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)

  जुन्या आठवणी आणि नेहमीचे ओळखीचे चेहरे सतत डोळ्यासमोर येत राहतील. मनात रुंजी घालत राहतील. तुम्हाला त्या आठवणी नको असतील तर त्या निग्रहानं मनाआड केल्या पाहिजेत किंवा त्यांचा स्वीकार केला पाहिजे. या दोन्ही गोष्टी एकाचवेळी करणं शक्य होणार नाही. अनपेक्षित भेटीगाठी होऊ शकतात.

  LUCKY SIGN - A soap dish

  तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)

  सगळं ठीक आहे असं सर्वांना दाखवण्याचा तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहात. त्यात तुम्ही यशस्वीदेखील होऊ शकता. परंतु कोणी तरी असं आहे ज्याला माहीत आहे, की खरं काय आहे. आणि ती व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधण्याची शक्यता आहे. बाहेर जाण्यासाठी चांगला दिवस आहे.

  LUCKY SIGN - a poster

  वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)

  तुम्हाला जे मिळत आहे, त्यापेक्षा अधिक मिळण्याची अपेक्षा तुम्ही करत आहात; मात्र त्यासाठी तुम्हाला थोडे अधिक प्रयत्न करावे लागतील. काही कमी महत्त्वाच्या गोष्टींना वेळ द्यावा लागू शकेल, त्यामुळं तातडीच्या गोष्टी मागं राहण्याची शक्यता आहे. डोकेदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे.

  LUCKY SIGN - a map

  धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)

  आजचा दिवस काही बाबतीत तुमच्यासाठी खूप अनुकूल आहे, मात्र काही गोष्टी मनासारख्या होणार नाहीत. त्यामुळं तुम्हाला उदास वाटू शकतं. अवास्तव अपेक्षा ठेवू नका. परिस्थिती सतत बदलत असल्यानं संयम ठेवणं महत्त्वाचं आहे.

  LUCKY SIGN - A sparrow

  मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)

  तुमच्या टीका करण्यामुळे कोणी दुखावलं जाणार नाही याची काळजी घ्या. तुमचे विचार काही व्यक्तींना थोडे क्रांतिकारक वाटतील. परंतु तुम्ही तुमच्या मतांवर ठाम रहा. एखाद्या कायदेशीर प्रकरणात सकारात्मक घडामोड होऊ शकते.

  LUCKY SIGN - a glass box

  कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)

  कोणी तुम्हाला तुच्छ लेखण्याचा, तुमच्या मनात न्यूनगंड निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल, तर तुम्ही तुमचे सुप्त कलागुण दाखवून त्यांना तुमचं सामर्थ्य दाखवून देऊ शकता. तुमच्या जवळच्या व्यक्तीला तुमच्या मनातल्या भावना सांगण्यासाठी आजचा दिवस अतिशय चांगला आहे. आपलं रूटीन बदलणार नाही याची काळजी घ्या.

  LUCKY SIGN - a sample box

  मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)

  तुमच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर पुस्तकात किंवा अन्यत्र कुठेतरी लिखित स्वरूपात मिळेल. प्रासंगिक घटनांमध्ये जास्त अडकू नका. काही घरगुती बाबी त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.

  LUCKY SIGN - a gallery

  First published:
  top videos

   Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya