मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

तुमच्या Sun Sign नुसार कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या बाराही राशींचं भविष्य

तुमच्या Sun Sign नुसार कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या बाराही राशींचं भविष्य

 प्रत्येक राशीचं 13 फेब्रुवारी 2022 या दिवसासाठीचं भविष्य

प्रत्येक राशीचं 13 फेब्रुवारी 2022 या दिवसासाठीचं भविष्य

प्रत्येक राशीचं 13 फेब्रुवारी 2022 या दिवसासाठीचं भविष्य

    सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 13 फेब्रुवारी 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) काही गोष्टींबाबत तुमचा दृष्टिकोन पुराणमतावादी असू शकतो; पण तरीही तुमच्या दृष्टिकोनामुळे इतरांचं लक्ष वेधून घ्याल. सोप्या दृष्टिकोनामुळे तुम्हाला प्रकल्प लवकर पूर्ण करण्यास मदत होऊ शकते. गुंतागुंत टाळा. काही महत्त्वाच्या लोकांशी तुमची भेट होईल आणि त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळेल. धैर्य एकवटणं तितकंसं अवघड नसू शकते. एखादी लांबची व्यक्ती तुमच्यासाठी भेटवस्तू आणू शकते. LUCKY SIGN – घरातलं रोपटं (An indoor plant) वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) दुसऱ्यांचा हेतू जाणणं सोपं नसतं; पण तरीही तुम्ही ती जोखीम घेऊ शकता. उशिराने का होईना इतरांवर विश्वास ठेवणं तुमच्यासाठी सोपं झालं आहे. सध्याच्या योजनेसाठी तुमचा बॅकअप असल्याची खात्री करून घ्या. लवकरच सहल आणि प्रवास होऊ शकतो. तुम्ही ज्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करत होतात ती अघोषितपणे येऊ शकते. मित्रांची निवड करताना हुशारीने करा. LUCKY SIGN – फुलांचा गुच्छ (A bunch of flowers) मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) एखाद्या कार्यक्रमात उपस्थितांवर तुम्ही चांगली छाप पाडण्याची शक्यता आहे. तुमच्यावर लक्ष ठेवून असणारी एखादी व्यक्ती आता तुमच्याशी संपर्क साधेल. तुमचा स्वतःवरचा विश्वास अनेक मार्गांनी पुन्हा प्रस्थापित झाला आहे. तुमच्या भूतकाळात मिळवलेलं यश आता तुम्हाला आंतरिक कौशल्याची परत खात्री देईल. तुम्ही गुंतवणूक केली असल्यास आता त्यात चांगली वाढ होताना दिसू शकते. तुमच्या नात्याला तजेला द्यायचा प्रयत्न करा. LUCKY SIGN – A ceramic vase) कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) स्वतःला पँपर करा कारण तुमच्या मेंदूला शांत होण्याची गरज आहे. आता घेतलेल्या विश्रांतीमुळे भविष्यातल्या योजना आखण्यात मदत होऊ शकते. जी व्यक्ती आधी तितकीशी खास वाटत नव्हती ती आता वाटू शकते. आता तुम्हाला तुमच्या मित्रांसोबत वेळ घालवावासा वाटू शकतो. तुमच्यावर कुटुंबामुळे असलेला दबाव आता नाहीसा होऊ शकतो. कर्ज घेणं टाळा. LUCKY SIGN – गुलाबी फूल (pink flower) सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) खासगी संवाद सार्वजनिक ठिकाणी करणं टाळा. एखाद्या गोष्टीत नकळत तुम्ही स्वतःला अडकवून घेण्याची शक्यता आहे. आजचा दिवस संमिश्र भावभावनांचा असेल आणि तुमच्याकडे आकर्षित झालेली एखादी व्यक्ती संपर्क तुमच्याशी संपर्क साधू शकते. तुम्हाला स्वतःला भावनिकरीत्या असुरक्षित असल्याचं जाणवू शकतं. कोणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नका. तुम्ही गोंधळला असाल तर ते सोडून दीर्घ श्वासाच्या व्यायामाचा सराव करा. LUCKY SIGN – आवडता परफ्युम (favorite perfume) कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) तुम्ही एखादी योजना केली असली, तरी ती अमलात आणणं कठीण वाटू शकतं. रोजच्या गोष्टीमुळे तुम्ही व्यग्र राहू शकता. तुम्हाला भूतकाळात केलेल्या गोष्टीची फळं मिळू शकतात. एका वेळी एकच गोष्ट करा. कारण अनेक गोष्टींवर एकाच वेळी विचार केल्यास गोंधळ आणि अकारण तणाव वाटू शकतो. छोट्याश्या ब्रेकचं नियोजन करण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN– पांढरा फळा (A whiteboard) तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) एखादी व्यक्ती उगाच तुमच्याशी भांडण उकरण्याची शक्यता आहे. ते शक्य असेल तितकं टाळण्याचा प्रयत्न करा. रागीटपणाची समस्या जाणवू शकते; पण दिवसाअखेर तुम्हाला स्वतःला शांत ठेवण्याचा मार्ग सापडू शकतो. इतर व्यक्ती तुमच्यावर कामाचा बोजा टाकण्याचा आणि ताण देण्याचा प्रयत्न करतील. सध्या तुमच्या डोक्यात बऱ्याच गोष्टी सुरू आहेत; पण त्याबद्दल बोललंच पाहिजे असं नाही. भूतकाळातला एखादा गुंता सोडवण्याची संधी मिळू शकते. बाहेर जेवायला गेल्यास हवा तो बदल मिळू शकेल. LUCKY SIGN – A silicon mould वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीची भेटण्याची वेळ घेतली असल्यास त्यांच्या वेळेचा आदर करा आणि मानसिकता जपा. ज्या कल्पना तुम्हाला अंमलात आणता येणार नाहीत त्याबद्दल बोलणं टाळण्याची शक्यता आहे. काही काळासाठी आर्थिक चणचण जाणवू शकते; पण तुम्ही त्यावर लवकरच मात कराल. वरिष्ठांवर तुमची चांगली छाप पडली आहे आणि त्यामुळे तुम्ही त्यांना निराश होऊ न देण्याची शक्यता आहे. एखादी महिला तुमच्याकडे मदत मागू शकते. पालक सहल नियोजन करण्याची शक्यता असून, त्यांना तुमच्या मताची आवश्यकता आहे. LUCKY SIGN – लाइट्सची माळ (a string of lights) धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) तुम्ही काही तरी घडेल असं गृहीत धरलं असल्यास ती भीती खरी ठरण्याची शक्यता आहे. यावरचा उत्तम उपाय म्हणजे त्या विचाराला बळावू देऊ नका. आजच्या ऊर्जेनुसार दिवस शिस्तीचा असेल. तुम्हाला तुमची दिनचर्या बारकाईने पूर्ण करता येऊ शकते. तुमचे काही मित्र तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील; पण त्यांना भेटणं तुम्ही टाळण्याची शक्यता आहे. नव्या सहयोगाची कल्पना डोक्यात असल्यास तुमचा जोडीदार काळजीपूर्वक निवडा. LUCKY SIGN – हँगर (A hanger) मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) सध्या ग्रह तुमच्या गरजा आणि इच्छांनुसार बदल करण्याचा प्रयत्न करत आहेत. एकदा ते घडल्यावर तुम्हाला कृतज्ञापूर्ण वाटू शकतं. एखाद्या क्षुल्लक गोष्टीवरून छोटंसं भांडण किंवा वाद होऊ शकतो. तुमचा जोडीदार तुमच्याशी समन्वयाच्या अभावामुळे काही तरी पूर्णपणे उलट गोष्ट सुचवू शकतो. तुम्हाला काही वेळ काढावासा वाटेल किंवा स्वतःला द्यावा वाटेल. आध्यात्मिक प्रवास उपयोगी ठरू शकतो. LUCKY SIGN – a suntan कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) साधारण आयुष्य कंटाळवाणं वाटू शकतं आणि तुम्हाला काही तरी वेगळं करण्याची आकांक्षा वाटू शकते. जुना बॉस काही कामासाठी संपर्क साधू शकतो. संधी मर्यादित असल्या तरी तुम्ही स्वतःसाठी एखादी मिळवाल. सध्या मिळवण्याची वेळ असल्यामुळे त्याचा जास्तीत वापर करा. मनातल्या दाबलेल्या भावना कदाचित सर्वांसमोर येऊ शकतात, ज्यामुळे इतरांचं लक्ष विचलित होईल. भूतकाळात झालेली आर्थिक प्रगती आता मात्र काही काळासाठी स्थिर होऊ शकते. तुमचा छंद पुन्हा जोपासा. LUCKY SIGN – मातीचं मडकं (a clay pot) मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) तुम्ही जितके नम्र राहाल तितका तुम्हाला फायदा होईल. तुम्ही याचं अनुकरण केलं, तर तुमच्या लक्षात येईल की, गोष्टी कोणत्याही प्रतिकाराविना घडतात. तुमची आई या आठवड्यात तुमच्या आनंदाचा स्रोत ठरेल. एखादं कौटुंबिक गेट-टुगेदर होण्याची शक्यता आहे, जे पुढे ढकललं जात होतं. तुम्ही तुमच्या कामातून छोटासा ब्रेक घेऊन इतर जबाबदाऱ्यांकडे लक्ष देण्याची शक्यता आहे. पैसा खुळखुळता राहणार असून, तणावही कमी असेल. पुढील दिवस हे अनुकूल असू शकतात. निळा रंग शक्यतो टाळा. LUCKY SIGN – अपेक्षित मेल (an awaited mail)
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya

    पुढील बातम्या