राशीभविष्य: 'या' 5 राशींसाठी आजचा दिवस शुभ, कुणाचे जोडीदार होतील नाराज? वाचा भविष्य

ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींचं वेगळं महत्त्व आहे.

आज बुधवार दिनांक 21 जुलै 2021 तिथी ज्येष्ठ शुद्ध द्वादशी. पाहू या आजचे बारा राशींचे भविष्य.

  • Share this:
आज दिनांक 21 जुलै 2021 तिथी ज्येष्ठ शुद्ध द्वादशी. आज बुधवार. आज मंगळाचा  सिंह राशीत  प्रवेश   झाला असुन यापुढील काही दिवस तो तिथे शुक्रा सोबत असेल. तिथून तो गुरूशी प्रतियोग करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष आज तुम्हाला मनोधैर्य राखून ठेवायचे आहे. पंचम स्थानात प्रवेश केलेले मंगळ शुक्र मुलांसंबंधी  काही चिंता उत्पन्न करतील. पण गुरुकृपा सर्व संकटाचे निवारण करील. धार्मिक कार्य घडेल. दिवस बरा जाईल. वृषभ चतुर्थ स्थानात  मंगळ शुक्र,घर अणि वाहन यासंबंधी चांगल्या घटना घडतील. काही नवीन वास्तु संबंधी निर्णय होईल. आईच्या प्रकृतीची काळजी घ्या. आर्थिक नियोजन नीट करा. दिवस चांगला जाईल. मिथुन आज चंद्र दिवसभर वृश्चिकेत असणार आहे.षष्ठ चंद्र आराम करावा असे सुचवत आहे. तृतीय स्थानात प्रवेश करणारा मंगळ  शुक्र भावंडाची काळजी  लागेल. प्रवास ठरतील. तुमचा स्वभाव कणखर होईल. दिवस शुभ. कर्क आज धन स्थानात प्रवेश करणारा मंगळ  यापुढील काही दिवस खर्चात  अचानक वाढ करेल. कुटुंबासाठी काहीतरी करावेसे वाटेल. शुक्र आर्थिक स्थिती उत्तम ठेवेल. मुलांची काळजी घ्या. दिवस शुभ. सिंह राशीत आलेला मंगळ सिंह व्यक्ती ना  तेजस्वी व्यक्तिमत्त्व बहाल करेल. शुक्राचा आकर्षण निर्माण करण्याचा स्वभाव आहे. तेव्हा  जरा जपून रहावे. अचानक आयुष्यात कोणीतरी येण्याची शक्यता आहे. कुटुंबाला वेळ द्यावा लागेल. दिवस चांगला. कन्या आज तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वात आणखी भर पडेल. समाजासाठी काही करण्याची इच्छा होईल. तुमचे  नाव होणार आहे. व्यय स्थानात आलेला मंगळ  आता जपून रहा असे संकेत देत आहे. दिवस मध्यम. तुला आज मन पूर्णपणे कुठेतरी गुंतून राहील. संतती, मित्र मैत्रिणींना वेळ द्यावा लागेल  लाभ होतील. आर्थिक स्थिती बाबत जरा जपून राहावे असे वाटते . दिवस शुभ आहे. वृश्चिक राशीतील चंद्र अनेक ठिकाणी यश देईल. कार्यक्षेत्रातील बदल फायद्याचे ठरतील. जुने संबंध  फायदा करून देतील. प्रकृती ठीक राहील .आर्थिक बाजु चांगली राहील. दिवस चांगला  आहे. धनु भाग्यात प्रवेश करणारा मंगळ शुक्र वडिलांकरता शुभ आहे. पण त्यांच्याशी वाद करू नका. प्रकृती ठीक राहील. आर्थिक बाजु चांगली राहील. दिवस शुभ . मकर आज पासून अष्टमात प्रवेश करणारे मंगळ शुक्र, पोटाचे किंवा तत्सम विकार डोके वर काढतील. प्रवास संभवतात. मात्र काळजीपूर्वक रहावे. वाहनापासून जपावे. गुरुकृपा आहे. दिवस चांगला आहे. कुंभ, आज मंगळ सप्तमात  शुक्रा सोबत आलेला असून येथे  शुक्राचा प्रभाव आहे. जोडीदार कधीतरी नाराज राहील. विवाह जमत असेल तर नीट चौकशी करावी. मंगळ अडचण निर्माण करेल. दिवस चांगला जाईल. मीन आज पासून काही दिवस प्रकृतीची काळजी घ्या  रक्तदाब, मधुमेह असेल तर तपासणी करून घ्यावी. मंगळाची उपासना करावी. आज चंद्र भाग्यात शुभ फळ देणारा ठरेल. शुभ दिवस. शुभम भवतु!!
Published by:Prem Indorkar
First published: