मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

राशीभविष्य: या 3 राशींसाठी दिवस उत्तम, वाचा बुधवार कसा असेल तुमच्यासाठी

राशीभविष्य: या 3 राशींसाठी दिवस उत्तम, वाचा बुधवार कसा असेल तुमच्यासाठी

आज बुधवार दिनांक 14 जुलै, आषाढ शुद्ध पंचमी. जाणून घेऊ या आजचे बारा राशींचे भविष्य.

आज बुधवार दिनांक 14 जुलै, आषाढ शुद्ध पंचमी. जाणून घेऊ या आजचे बारा राशींचे भविष्य.

आज बुधवार दिनांक 14 जुलै, आषाढ शुद्ध पंचमी. जाणून घेऊ या आजचे बारा राशींचे भविष्य.

आज बुधवार दिनांक 14 जुलै, आषाढ शुद्ध पंचमी. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीतून राहील. जाणून घेऊया आजचे बारा राशींचे भविष्य.

मेष

आज ही दिवस अनुकूल आहे. आर्थिक व्यवहार मार्गी लागण्याची शक्यता आहे. घर अणि ऑफिस  दोन्हीकडे लढा द्यावा लागेल. मुलं देखील आज तुमचा वेळ घेणार आहेत. दिवस  चांगला आहे.

वृषभ

आज दिवस तुम्हाला कामाला लावणार असे दिसते. पण काळजी नको, तुम्ही उत्साहाने  घराची सजावट कराल. ऑफिस मध्ये  जास्तीचे काम करण्याची इच्छा होईल. आई चा पाठींबा मिळेल. दिवस उत्तम.

कर्क

आठवा गुरू आणि धन स्थानातील चंद्र मंगळ  निश्चित पणे आर्थिक उलाढाल वाढवतील. शेअर बाजार मध्ये लाभ होऊ शकतो. तुमच्या मनाचा कल पाहून निर्णय घ्या. व्ययस्थानातील सूर्य परदेशी संबंधी बोलणी सुरू करेल. दिवस चांगला.

सिंह

राशीतील चंद्र गुरूच्या शुभ योगात असून तुमचे प्रभावी व्यक्तिमत्त्व सर्वाना आकर्षित करेल. काही चांगली प्रपोजल अविवाहित व्यक्तींना येऊ शकतात. गुरु ची उपासना करावी. दिवस उत्तम  आहे.

कन्या

आज व्यय स्थानातील चंद्र तुम्हाला थकवून टाकणार आहे. अतिशय कष्ट करून प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो. आर्थिक स्थिती ठीक राहील. नवी नोकरीची संधी येऊ शकते. दिवस मध्यम  आहे.

तुला

आज आपण आपण उत्कृष्ट ग्रहस्थितीचा  लाभ घ्यावा असे ग्रह सुचवत आहेत. पंचमस्थ गुरू  विवाहिता ना आनंदाची बातमी देऊ करील. चंद्र गुरु शुभयोग संतती साठी फार चांगला आहे.ऑफिस मध्ये खूप काम  पडेल. पण त्याचा फायदा होईल. दिवस शुभ.

वृश्चिक

आज तुमचा दिवस  काही महत्त्वाचा मीटिंग्स, नवीन लोकाना भेटणे, मोठे निर्णय किंवा उशिरा पर्यन्त कामात जाणार आहे. कोणालाही लागेलसं बोलू नका. घरातील वृद्ध तुम्हाला  साथ देतील. दिवस उत्तम.

धनु

काही  धार्मिक कार्य, त्यासंबंधी तयारी चर्चा, किंवा प्रवास योग येतील. तुमच्या बुद्धीचा वापर करून एखाद्या पेच प्रसंगातून  बाहेर याल. त्यामुळे तुमचे  नाव होईल. वाहन जपून चालवा.

मकर

आज राशीच्या अष्टमात चंद्र भ्रमण असून मानसिक त्रास संभवतो. आर्थिक स्थिती ठीक राहील. जोडीदाराची काळजी घ्या. वाद टाळा. प्रकृतीकडे जरा लक्ष द्या. शनीची उपासना करावी. दिवस  मध्यम आहे.

कुंभ

राशीतील गुरू चंद्राचा दृष्टी योग अतिशय शुभ असून जोडीदाराला उत्तम फळ देणारा आहे  संतती सुख मिळेल. आनंदाची वार्ता कानी पडेल. चतुर्थ स्थानातील राहू घरा संबंधी काही घडामोडी घडवेल. दिवस  शुभ.

मीन

आज चंद्र षष्ठ स्थानात असून मातुल घराण्यातील व्यक्ती भेटतील. आईला वेळ द्या. संतती चिंता थोडी कमी होईल. ईश्वरी कृपा राहील. दिवसभराची दगदग, प्रकृतीवर परिणाम करेल. दिवस बरा जाईल.

शुभम भवतु!!

First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya, Zodiac signs