आज मंगळवार दिनांक 13 जुलै आषाढ शुद्ध चतुर्थी. आज अंगारकी चतुर्थी आहे. चंद्र आज सिंह राशीत भ्रमण करेल. तिथून तो गुरूशी सम सप्तक योग करेल. पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.
मेष
आज पंचम स्थानात होणारे चंद्र भ्रमण शुभ फळ देईल. संतती संबंधी काही शुभ समाचार मिळतील. आर्थिक लाभ. विवाहित व्यक्तींना शुभ काळ आहे. विद्यार्जन उत्तम होईल. दिवस शुभ आहे.
वृषभ
आज चंद्र राहू केंद्र योग मानसिक व्यग्रता वाढवेल. आई संबंधित काही चिंता वाढेल . घरातली काम जास्त प्रमाणात करावी लागतील. कामाच्या ठिकाणी मात्र चांगला अनुभव येईल. दिवस अनुकूल आहे.
मिथुन
तृतीय स्थानातील चंद्र भ्रमण आज भावंडा शी संपर्क आणेल प्रवास, मौजमजेसाठी खर्च, अणि महत्त्वाचा फोन असा हा दिवस आहे. राशीतील रवि बुध अधिकारात वाढ करतील. दिवस चांगला आहे.
कर्क
आज अचानक धनलाभ संभवतो. त्यामुळे आर्थिक बाजू भक्कम राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. काही शुभ घटना घडू शकते. थोडी चिडचिड कमी करा. दिवस शुभ.
सिंह
राशीतील चंद्र , गुरूच्या शुभ योगात तुमची मानसिक स्थिती उत्तम ठेवेल. कुठल्याही कामात आज यश मिळेल. व्ययस्थानातील मंगळ थोडा प्रकृती संबंधी चिंता निर्माण करतो. पण आज तुम्हाला खूप बरे वाटणार आहे. दिवस शुभ आहे.
कन्या
आज चंद्र व्ययात असून तिथे तो गुरूशी शुभयोग करीत आहे. परदेशातून काही समाचार, फोन येऊ शकतो. काही आकस्मिक खर्च, औषधा वर किंवा डॉक्टर वर होऊ शकेल. दिवस मध्यम आहे. काळजी घ्या.
तुला
आज पंचम आणि लाभ स्थान अतिशय सुंदर फळ देणार आहे. मुलांची चिंता आज दूर होईल. त्यांच्या बाबत एखादी छान घटना घडेल. घरात शांतता राखण्याचा प्रयत्न कराल. एकूण दिवस चांगला आहे.
वृश्चिक
दशमातील चंद्र आज कार्य क्षेत्रात प्रसिद्धी मिळवून देईल. भाग्य स्थानातील शुक्र छान व्यक्तीचा सहवास प्राप्त करून देईल. सध्या घरावर भरपूर खर्च करत आहात. जरा जपून. प्रवास संभवतात. दिवस उत्तम जाईल.
धनु
आज दिवस तुमचा आहे. भाग्य सर्व तर्हेने साथ देईल. भावंडांची उत्तम साथ लाभेल. साडेसातीचा त्रास विसरून जाल. छानसा प्रवास घडेल. घरात काही धार्मिक कार्य घडेल. दिवस शुभ.
मकर
आज दिवस कठीण जाणार आहे. एकतर साडेसाती त्यात अष्टमात चंद्र अनेक अडचणी आणेल. प्रकृती चिंता सतावू शकते. राशीतील शनिमुळे कधीतरी खिन्न वाटेल. चिंता करू नका. लवकरच सगळे अनुकूल होईल. शनि जप करावा.
कुंभ
आज राशीच्या सप्तम स्थानात चंद्र भ्रमण अनुकूल आहे. मन अगदी खुष राहील. जोडीदाराला घेऊन बाहेर पडाल. व्यावसायिक निर्णय योग्य ठरतील. आर्थिक स्थिती उत्तम राहील दिवस शुभ आहे.
मीन
आज जरा जास्तच काम पडल्यामुळे निवांत आराम करावा असं वाटेल. शरीर थोडे थकलेले अणि मन अशांत असेल. काही पोटाचे त्रास असतील तर काळजी घ्या. घरा संबंधी निर्णय घ्याल. दिवस शुभ आहे.
शुभम भवतु !!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.