मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

राशीभविष्य: कन्या आणि मीन राशीतल्या नोकरीपेशा व्यक्तींसाठी अत्यंत शुभ दिवस; वाचा तुमचं आजचं भविष्य

राशीभविष्य: कन्या आणि मीन राशीतल्या नोकरीपेशा व्यक्तींसाठी अत्यंत शुभ दिवस; वाचा तुमचं आजचं भविष्य

ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींचं वेगळं महत्त्व आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींचं वेगळं महत्त्व आहे.

आज गुरुवार दिनांक 8 जुलै 2021. राशीभविष्याबरोबर आजपासून जाणून घ्या ग्रह, त्यांचे अंक आणि ग्रहांचे दान याबद्दल...

आज गुरुवार दिनांक 8 जुलै 2021. ज्येष्ठ कृष्ण चतुर्दशी ..

आत्तापर्यंत आपण बारा  राशी, त्यांचे स्वामी, स्वभावधर्म,नवग्रह, त्यांच्या उच्च नीच राशी, स्वभाव व रत्न यांची माहिती घेतली. आज जाणून घेणार आहोत ग्रह, त्यांचे  अंक आणि ग्रहांचे दान याबद्दल.

सूर्य - ग्रहाचा अंक  आहे  1 व दान  गहू, गुळ, सोने, जव.

चंद्र- ग्रहाचा अंक आहे 2 व दान आहे तांदुळ, साखर, चांदी, पाणी, पांढरा कपडा.

गुरू- ह्या ग्रहाचा अंक आहे  3 व दान आहे पिवळा कपडा, चणा डाळ, गुळ, सोने, हळद .भोपळा.

बुध- बुधाचा अंक आहे  5 व दान आहे  हिरवे अख्खे मूग, हिरवा कपडा, चारा, आणि पुस्तक.

शुक्र- शुक्राचा अंक आहे 6 आणि दान आहे  पांढरा कपडा, साखर, तांदुळ , हिरा .

शनि-- शनिचा  अंक आहे  8 व दान आहे

काळा कपडा, काळे उडीद, लोखंडी खिळा, मीठ, तेल.

मंगळ -मंगळाचा अंक आहे  9 आणि दान आहे लाल मसूर ची डाळ, गुळ, तांबे, लाल कपडा, आणि शेंदूर.

राहू  व केतू--8 व 9 अंक.  दान निळा,राखाडी कपडा स्टील, काळे तीळ, तेल, व कांबळे.

4 या अंकावर हर्षल ग्रहाची सत्ता चालते  तर 7 या अंकावर  नेपच्यून  चा अंमल आहे.

आजचे बारा राशींचे भविष्य

आज  चंद्र  वृषभ राशीत भ्रमण करणार आहे.. आज बुधआपल्या स्वराशीत म्हणजे मिथुन राशीत स्थित असून तिथे  असलेल्या सूर्या सोबत बुधादित्य राजयोग करणार आहे. तिथे तो 25 जुलै पर्यंत राहील. हा अत्यंत महत्त्वाचा बदल असून सर्व राशीवर त्याचे  परिणाम काय होतील बघुया.

मेष

राशीच्या पराक्रम स्थानात प्रवेश करणारा  बुध  अतिशय शुभ असुन पराक्रम, बुद्धिमत्ता, संभाषण कला ,यात वाढ करेल. बहिण भावंडां शी संबंध सुधारतील. प्रवास योग येतील. तुमच्या बुद्धी आणि वाणी चातुर्याने तुम्ही सगळ्यांना जिंकून घेणार आहात. दिवस शुभ आहे.

वृषभ

धनस्थानात येणारे  बुध रवि आर्थिक क्षेत्रात भरघोस मदत करतील. कुटुंब सुख ,उच्च विचार व संभाषण चातुर्य यात वाढ होईल. राशीतील राहू चंद्र आजही मानसिक ताण व  अस्वस्थता निर्माण करतील. दिवस  चांगला जाईल.

मिथुन

आज राशीत प्रवेश  करणार्‍या  बुधाची स्वराशी

मिथुन असल्यामुळे तुमचे बुद्धी चातुर्य कमालीचे वाढेल. वकील, न्यायाधीश आणि वक्ते यांना उत्तम काळ आहे. व्ययस्थानातील चंद्र राहू मनावर सावट आणणार आहेत. बाकी  दिवस ठीक आहे.

कर्क

व्यय स्थानात प्रवेश करणारा  बुध सूर्या सोबत राजयोग करीत असून परदेश गमन, त्यासंबंधी  सर्व  कागदपत्रे आणि प्रवास  यासाठी अतिशय उत्तम काळ आहे. नोकरी, व्यवसाय पूरक आहे. फक्त थोडे खर्चावर नियंत्रण ठेवावे. व कुठल्याही प्रकारचे कायद्याचे उल्लंघन करू नये. लाभदायक दिवस.

सिंह

लाभ स्थानात येणारे  रवि बुध शुभ फळ आणि उत्तम लाभ  देतील .मैत्रिणी  किंवा  बहिणी तुम्हाला  उत्तम सल्ला देऊन  फायदा करून देतील. शिक्षण, परीक्षा  याकरता शुभ  काल आहे. कार्यक्षेत्रातील प्रगती  सुखावह राहील. खर्च बेताने करा. गुरु कृपेचा लाभ घ्या.

कन्या

आज राशी स्वामी बुध दशमात उच्च राशीत आले आहेत. .नोकरी पेशा व्यक्तींना अतिशय शुभ काळ आहे. नवीन संधी, हाती घेतलेल्या कामात यश, प्रमोशन, असा हा काळ आहे. आईवडील तुमच्यावर खुश होणार आहेत. शुभ घटनांना आता सुरवात होईल. दिवस चांगला.

तुला

आज भाग्यात प्रवेश करणारा बुध आणि तिथे असलेला रवि  भाग्याचे नवीन दरवाजे उघडणार आहे. अचानक लाभ,परदेश प्रवास, उच्च शिक्षणात भरघोस यश  असा हा दिवस  आहे. बुध गुरू नवपंचम योग होत असून  धर्मा बद्दल आस्था वाढेल. शुभ कार्य घडतील. दिवस शुभ.

वृश्चिक

आज झालेले  बुधाचे  मिथुनेतील राश्यांतर अष्टम स्थानात आहे .वृश्चिक व्यक्तींना जाणवणारा निरुत्साह संपून नवीन जोश येईल.सखोल अभ्यास सुरू होऊन यश मिळेल. गृह सजावट,आर्थिक घडामोडी  यांना प्राधान्य मिळेल.  बुध गुरू नवपंचम योगाचे शुभ फळ मिळेल. दिवस चांगला.

धनु

सप्तम स्थानात होणारे सूर्य बुध  राश्यांतर  जोडीदाराला फार चांगले फळ देणार असून भागीदारी मध्ये सामंजस्य निर्माण करेल. करार यशस्वी होतील. नवीन संधी मिळतील. षष्ठ स्थानात असलेले राहू चंद्र शत्रू वर विजय मिळवून देतील. दिवस शुभ आहे.

मकर

राशीच्या षष्ठ  स्थानातील रवि बुध आईच्या नातेवाईकांशी  भेट, त्यापासून काही लाभ, असे फळ देतील. नोकरीमध्ये नवीन संधी मिळतील. मुलाखतीतून यश, कर्जफेड, आणि एखाद्या दुखण्यातून सुटका असा हा सुंदर योग आहे. संतती चिंता कमी होईल. दिवस चांगला.

कुंभ

पंचमात होणारा बुधादित्य राजयोग,व नवपंचम योग सर्व तर्‍हेने शुभफल देणारा आहे  संतती सुख  उत्तम मिळेल. विद्यार्जन,उच्च शिक्षण यासंबंधी चांगल्या घटना घडतील .आत्मविश्वास वाढेल. कार्य सिद्धी होईल. शुभ दिवस.

मीन

चतुर्थ स्थानातील रवि बुध शुभ असुन घर ही तुमची प्राथमिकता राहणार. त्यासंबंधी काही चर्चा सुरू होईल. नवीन वास्तूचे स्वप्न सत्यात येईल.घरासाठी छान वस्तु खरेदी कराल. नोकरीसाठी फार चांगला काळ असून  नवीन संधी प्राप्त होतील. दिवस चांगला जाईल.

शुभम भवतु!!

First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya