मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /राशीभविष्य: आज मकर आणि मीन राशीला होणार आर्थिक लाभ, जाणून घ्या तुमच्या राशीचे भविष्य

राशीभविष्य: आज मकर आणि मीन राशीला होणार आर्थिक लाभ, जाणून घ्या तुमच्या राशीचे भविष्य

ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींचं वेगळं महत्त्व आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींचं वेगळं महत्त्व आहे.

आज गुरुवार दिनांक 15 जुलै आषाढ शुद्ध पंचमी/षष्ठी. वाचा आजचे बारा राशींचे भविष्य.

आज गुरुवार दिनांक 15 जुलै आषाढ शुद्ध पंचमी/षष्ठी. आज चंद्र कन्या राशीतून भ्रमण करणार आहे. पाहू या आजचे राशी भविष्य.

मेष

आज दिवस थोडा कष्ट देणारा आहे. काही मानसिक, शारीरिक त्रास, नोकरीच्या ठिकाणी जास्तीची कामं,  जास्तीचा आर्थिक बोजा असा हा दिवस असून फार अपेक्षा करू नये. कोणाशी शत्रुत्व टाळा. दिवस मध्यम .

वृषभ

आज गुरुवार, आज प्रभू चरणी मन रमेल. मुलं मनासारखी वागतील. चंद्र राहू दृष्टी योग  मनाला हुरहूर लावणारा आहे. आर्थिक दृष्टय़ा दिवस बरा आहे. ऑफिस मध्ये काम करायला तयार रहा. दिवस  चांगला जाईल.

मिथुन

आज कामाला कंटाळून तुम्ही घरात राहणे पसंत कराल. एकूण काय तर आज घरकाम जास्त पडेल .काही खरेदीही होण्याची शक्यता आहे. कुटुंबाला वेळ द्यावा लागेल..दिवस चांगला आहे.

कर्क

राशीतील मंगळ  आणि समोरील शनिमुळे आधीच त्रास आहे. आज तृतीय चंद्र महत्त्वाचे फोन  नातेवाईकांच्या भेटीगाठी घडवून आणेल. कोणाशीही वाद करू नका. प्रवास योग येतील. दिवस चांगला जाईल.

सिंह

सूर्य बुध  मार्ग प्रशस्त करीत आहेत. राहू दशमात कामाच्या ठिकाणी बदल घडवून आणतो. आज चंद्र आर्थिक लाभ  मिळवुन देण्यास सज्ज आहे. मंगळ  अजूनही आर्थिक नुकसान किंवा आजारपण दाखवत आहे. दिवस शांततेत पार पडेल.

कन्या

आज राशीतील चंद्र भ्रमण अनुकूल फळ देणार असून भागीदारी व जोडीदारासाठी शुभ फळ देईल. अकस्मात लाभ किंवा त्यासाठी संधी निर्माण होईल.तुम्हाला गरजूंच्या मदतीला जाण्याची  संधी मिळेल. आनंद देणारा दिवस आहे.

तुला

आज दिवस थोडा कष्ट देणारा ठरेल .चंद्र आर्थिक ,शारीरिक हानी, दर्शवतो. गुरु कृपा असेल. चतुर्थातील शनि आईवडील  गृहसौख्य यासाठी कठीण आहे.  पण भाग्य साथ देईल. दिवस मध्यम.

वृश्चिक

आज लाभ मिळवुन देणारा  ,मित्र मैत्रिणीशी गाठ घालून देणारा असा दिवस आहे. चतुर्थ गुरू, तृतीय शनि कुटुंबाकडे जास्त लक्ष पुरवावे लागेल असे सुचवतो. संतती सुख चांगले मिळेल.  दिवस चांगला जाईल.

धनु

आज कार्यालयीन घडामोडी फार वाढतील. तुमचा प्रभाव वाढेल. कार्य सिद्धी होईल. साडेसातीचा प्रभाव हळूहळू कमी होईल. भावंडांची उत्तम साथ लाभेल. दिवस शुभ.

मकर

दोन दिवस  त्रासाचे, अशांत गेले असतील. आज एका भाग्यकारक दिवसासाठी तयार रहा. आर्थिक लाभ संभवतात. प्रगतीच्या काही संधी येतील. मुलांची चिंता कमी होईल. दिवस शुभ असून यश मिळेल.

कुंभ

आज अष्टमात चंद्र भ्रमण मानसिक स्वास्थ्य बिघडवू शकेल. चंद्र गुरू  षडाष्टक शुभ कार्यात अडथळे निर्माण करेल. संतती चिंता होईल.

घरात थोडी अस्थिर आणि तणावपूर्ण स्थिती  होईल  जोडीदाराची काळजी घ्यावी. मध्यम

दिवस.

मीन

आज छानसा दिवस  असून पती पत्नी जोडीने काही खरेदी, मौजमजा करतील. आर्थिक लाभ होतील. नवीन संधी मिळतील. मिथुन राशीतील सूर्य बुध नवीन घरासाठी अनुकूल आहेत. बोलणी करायला शुभ दिवस..

शुभम भवतु!!

First published:
top videos

    Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya