मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

राशीभविष्य: आज सिंह आणि कन्या राशीसाठी अतिशय उत्तम दिवस, तुमचा रविवार कसा जाणार वाचा..

राशीभविष्य: आज सिंह आणि कन्या राशीसाठी अतिशय उत्तम दिवस, तुमचा रविवार कसा जाणार वाचा..

आज दिनांक 18 जुलै 2021 तिथी ज्येष्ठ शुद्ध नवमी. आज रविवार.आज चंद्र तुला राशीत भ्रमण करेल. जाणून घेऊया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

आज दिनांक 18 जुलै 2021 तिथी ज्येष्ठ शुद्ध नवमी. आज रविवार.आज चंद्र तुला राशीत भ्रमण करेल. जाणून घेऊया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

आज दिनांक 18 जुलै 2021 तिथी ज्येष्ठ शुद्ध नवमी. आज रविवार.आज चंद्र तुला राशीत भ्रमण करेल. जाणून घेऊया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

आज दिनांक 18 जुलै 2021 तिथी ज्येष्ठ शुद्ध नवमी. आज रविवार.आज चंद्र तुला राशीत भ्रमण करेल.

जाणून घेऊया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

मेष

आज चंद्र भ्रमण अनुकूल असून दिवस  आनंदात जाईल जोडीदाराला वेळ द्यावा लागेल घर आणि व्यवसाय दोन्ही साठी दिवस शुभ आहे .

वृषभ

आज जास्तीच्या कामांना खूप वेळ द्यावा लागेल .त्यामुळे थकवा येईल. अंगदुखी  ,सर्दी पडसे इत्यादी पासून जपून रहा. आर्थिक स्थिती उत्तम राहील. दिवस चांगला जाईल.

मिथुन

पंचमातील चंद्र भ्रमण आज मुलांना वेळ द्या असे सुचवीत आहे. चंद्र बुध नव पंचमात असून व्यावसायिक निर्णय योग्य ठरतील. नाव होईल .

दिवस शुभ आहे.

कर्क

आज चा दिवस घरात जास्तीची काम करण्याचा आहे  म्हणजे आठवडा व्यवस्थित जाईल. कामाचे प्लॅनिंग करा. राशीतील सूर्य मंगळ क्रोधावर नियंत्रण ठेवा असे सुचवत आहे. दिवस शुभ.

सिंह

तृतीय स्थानात आलेला चंद्र गुरूशी नव पंचम

योग करीत आहे. अतिशय उत्तम दिवस. धार्मिक गोष्टी मध्ये मन रमेल. दिवस आरामात जाईल.

कन्या

आज धनस्थानातील चंद्र भ्रमण अनुकूल असून आर्थिक भरभराट करणार आहे. व्ययस्थानातील शुक्राचे भ्रमण चैनीच्या गोष्टीवर खर्च करायला लावेल. जपुन खर्च करा. दिवस उत्तम.

तुला

राशीतील चंद्र गुरूशी नव पंचम योग करीत आहे  आध्यात्मिक अनुभव येतील. तुमच्या बुद्धी चातुर्याने तुम्ही भाग्य खेचून आणाल. लाभ होतील. दिवस उत्तम.

वृश्चिक

व्यय स्थानातील चंद्र आज शारीरिक कष्ट, आर्थिक व्यय दाखवित आहे. लौकरच भाग्य आणि कर्म यांची उत्तम साथ लाभणार आहे. तेव्हा सगळ्या कष्टांची फळ मिळतील. दिवस मध्यम.

धनु

अष्टमातील ग्रह स्थिती नुसार आज प्रवास टाळा. दिवस लाभदायक असून फार दगदग ना करता पार पडेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. दिवस उत्तम.

मकर

आज रविवार चा दिवस शांतपणे घरात व्यतीत कराल. लहानसहान समारंभ किंवा पिकनिक चे प्लॅनिंग होईल  पण सध्याचा काळ पाहता टाळलेले बरे. आर्थिक बाजू ठीक. दिवस चांगला आहे.

कुंभ

भाग्य कारक दिवस. कर्क राशीतील सूर्य मंगळ शत्रू पिडा करतील. आर्थिक बाजू चांगली राहील. आरोग्य थोडे  सांभाळावे लागेल .त्यासाठी आज योग्य ती काळजी घ्या. आराम करा. दिवस मध्यम आहे.

मीन

आज ग्रहस्थिती कष्ट  देणारी असून कोणते ही धाडस करू नका. वाद टाळा. शारीरिक कष्ट असतिल तर घरात आराम करा. मानसिक हुरहूर जाणवेल. दिवस मध्यम जाईल.

First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya