Home /News /astrology /

राशिभविष्य: मिथुन आणि मकर राशीला आज आर्थिक लाभ; वृषभ आणि कन्या राशीने मात्र सांभाळा

राशिभविष्य: मिथुन आणि मकर राशीला आज आर्थिक लाभ; वृषभ आणि कन्या राशीने मात्र सांभाळा

आज शनिवार दिनांक 3 जुलै ज्येष्ठ कृष्ण नवमी. वाचा आजचे बारा राशींचे भविष्य.

आज शनिवार दिनांक 3 जुलै ज्येष्ठ कृष्ण नवमी. चंद्र मेष राशीतून  भ्रमण करेल. आज जाणून घेऊया शुक्र ग्रहा बद्दल .शुक्र हा अत्यंत तेजस्वी ग्रह असून असुरांचा गुरू आहे. शुक्र म्हणजे सौंदर्य, विलासी वृत्ती, जीवनातल्या सर्व कला. आकर्षण विवाह संबंध, त्यातील सुख.  नशिबात असलेला पैसा .शुक्र वृषभ अणि तुला या राशीत  उच्च असतो. तर कन्या  ही शुक्राची नीच रास  आहे. उच्चीचा शुक्र असलेल्या व्यक्ती  कमालीच्या  सौष्ठव पूर्ण, आकर्षक असतात. उत्तम कलाकार असतात. नीच शुक्र व्यसनाधीन ,चरित्र हीन  आणि विलासी वृत्ती दर्शवतो. शुक्र भरणी ,पूर्वाषाढा, अणि पूर्वा फाल्गुनी  नक्षत्रांचा स्वामी आहे. विशेष करून मधुमेह, स्त्रीरोग, नेत्र रोग शुक्रा मुळे झालेले  आढळतात. तसेच अति विलासी स्वभावामुळे होणारे  रोग ही  नीच शुक्राचे परिणाम आहेत . सर्व तर्‍हेची कलाक्षेत्र ,घर बांधणी, सजावट ,अर्थशास्त्र, बँक, हे व्यवसाय पूरक आहेत. शुक्राचा रंग हिरवा  असून  रत्न हिरा  आहे. ओम  शु. शुक्राय नम: हा जप करावा. आजचे बारा राशींचे भविष्य. मेष आज तुमच्याच राशीतून भ्रमण करणारा चंद्र मानसिक ताण कमी करण्यासाठी फार मदत करेल. गेले काही दिवस  होणारी  मानसिक आंदोलने  आता कमी होत जातील. घरात शांतता  राहील. आज भाग्य तुमची साथ देणार आहे. वृषभ आज चंद्र बारावा, राशीत राहू, मानसिक ताण वाढवेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. प्रवास टाळा. आरोग्य थोडे जपावे लागेल. कोणाशी वाद करू नका. दिवस  मध्यम आहे. मिथुन आज दिवस  शुभ असुन आर्थिक लाभ संभवतात. प्रगतीच्या नवीन वाटा मोकळ्या होतील. सर्दीचा त्रास होणार्‍या व्यक्तीनी जरा काळजी घ्या. काहींना छोटा प्रवास घडेल. भाग्यकारक  दिवस. कर्क आज तुमच्या राशीतील मंगळ  आणि दशम स्थानातील चंद्र केंद्र योगात आहेत. लक्ष्मी कारक, कामाच्या ठिकाणी शुभ असा हा योग आहे. पण आठवा गुरू थोडे जपुन रहा असे सांगतोय. दिवस शुभ आहे. सिंह भाग्याची साथ मिळाल्यावर  कोण आनंदी होणार नाही ? दोन दिवस ताण सोसला त्याची  भरपाई आज होईल. शुभ घटना, पुजा, धार्मिक कार्य, इत्यादी मध्ये वेळ आनंदात जाईल. शत्रू नाश, जोडीदाराची चांगली प्रगती  असा उत्तम दिवस आहे. कन्या आधीच तयारी करून ठेवली तर येणार्‍या  तणावपूर्ण दिवसाला सामोरे जाता येईल. काही निर्णय पुढे ढकला. प्रकृती सांभाळा. आर्थिक बाजु चांगली राहील. पण काही अनाहूत खर्च येतील. दिवस  मध्यम जाईल. तुला आज छोटीशी का होईना  खरेदी  कराल. आपल्या जोडीदाराला वेळ द्यावा लागेल. शनि मकर राशीत,घरांमधे थोडी कुरबूर सुरू ठेवेल. प्रकृती जपा.व्यवसायात  चांगला लाभ होईल. दिवस  चांगला आहे. वृश्चिक आज तुमची प्रकृती तुम्हाला व्यग्र ठेवेल. विशेष करून पोटाचे  विकार त्रास देतील. संभ्रमात पाडणारी ग्रहस्थिती आहे. कोणाशी बोलाचाली करू नका. त्याने  आणखी त्रास होऊ शकतो. आर्थिक व्यवहार आज टाळा. दिवस  मध्यम. धनु आज शुक्रवार, येणार्‍या  सुट्ट्यांच्या तयारीत जाईल. कोणाला भेटायचे असेल तर  दिवस चांगला आहे. संतती  साठी शुभ समाचार मिळतील,प्रकृती बरी राहील. दिवस चांगला जाईल. मकर आज चतुर्थ स्थानातील  चंद्र घरांमधे जास्ती वेळ, खर्च करायला लावेल. तुमच्या  सध्याच्या धावपळीच्या काळात हा बदल बरा वाटेल. संतती चिंता थोडी कमी  होईल. प्रयत्‍न पूर्वक  नकारात्मक विचार दूर सारा. दिवस चांगला आहे. कुंभ आज तुमच्या  पराक्रमाची, धैर्याची  वाहवा होईल. महत्त्वाची कामे आज उरकून घ्या. दोन दिवस घरात राहण्याची तयारी  करा. बाजारहाट, फोन, भेटी गाठी  उरकून घ्या. दिवस शुभ आहे. मीन पगार नुकताच झाल्यामुळे आर्थिक स्थिती भक्कम राहील. राशीतील  गुरू  शुभ घटनांची सुरवात करणार आहे. थोडा धीर धरा. कुटुंबाचे उत्तम सहकार्य लाभेल. प्रकृती उत्तम राहील. दिवस शुभ. शुभम भवतु!!
Published by:Prem Indorkar
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

पुढील बातम्या