मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

राशीभविष्य: कुंभ आणि तुला राशीसाठी दिवस चांगला, वृषभ आणि मकर राशी मात्र जपून रहा

राशीभविष्य: कुंभ आणि तुला राशीसाठी दिवस चांगला, वृषभ आणि मकर राशी मात्र जपून रहा

ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींचं वेगळं महत्त्व आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींचं वेगळं महत्त्व आहे.

आज शनिवार दिनांक 26 जून 2021. आज ज्येष्ठ कृष्ण द्वितीया. आज मीन राशीच्या गुण दोषाचा आढावा घेऊ या. वाचा तुमचं राशी भविष्य.

आज शनिवार दिनांक 26 जून 2021. आज ज्येष्ठ कृष्ण द्वितीया. चंद्र धनु राशीत असेल.

आज राशी चक्रातील शेवटच्या म्हणजे बाराव्या मीन राशीच्या गुण दोषाचा आढावा घेऊ या. द्विस्वभाव, जल तत्त्व, अणि राशी स्वामी गुरू अशी ही शुभ रास. राशीचा अंमल पावलांवर असतो. अतिशय सुंदर डोळे, हनुवटीवर खळी, छान केस, मध्यम उंची अश्या मीन व्यक्ती फार सोशीक असतात. लवकर  गोंधळतात. सात्विक  स्वभाव असतो. गुरू बलवान असेल तर आध्यात्मिक प्रगती होते. बोलणे सौम्य  असते. गुरूची  उपासना  फल देणारी ठरते. गुरु जप करावा.

आजचे  राशी भविष्य.

मेष

आजचा दिवस मेष राशीला चांगला आहे. व्यावसायिक  निर्णय  घ्यायचे असतील तर थोडे  थांबा. समाजासाठी  काही करण्याची इच्छा होईल. आर्थिक गणित जुळून येईल. घराकडे  लक्ष असू द्या. दिवस बरा आहे.

वृषभ

आज शनिवार, 8 अंक  आणि आठवा चंद्र .अत्यंत जपून काळजीपूर्वक दिवस घालवा. शक्यतोवर  घरात  शांतपणे  रहा. वाहन, दुखापत, यापासून जपा. प्रवास  नकोच. दिवस  मध्यम.

मिथुन

आज तुम्हाला फारसे  काही न करता घरी आरामात  दिवस  घालवावा  अशी इच्छा होईल. घर कुटुंब, आणि निवांत पणा  हवासा वाटेल. छोटेसे  काही  काम असेल तर दोघांनी मिळून करावे. आर्थिक व्यवहार जपून. दिवस मध्यम जाईल.

कर्क

आज शरीर विश्रांतीची  मागणी करेल. आठवडाभर दगदग  केल्यामुळे  आज थकवा वाटेल. आराम करा. कोणाशी  बोलाचाली, शत्रुत्व नकोच. दिवस अगदी  शांतपणे घालवा. आर्थिक  निर्णय आज नको. दिवस  मध्यम.

सिंह

सध्याचा काळ जोडीदाराची भरभराट करणारा आहे. कामाच्या ठिकाणी अचानक संधी, उत्कर्ष  होईल. मुले आज तुमचा वेळ घेणार आहेत. पित्त किंवा श्वासाचा त्रास असेल तर जपून. मंगळ व्ययात प्रकृती साठी  खर्च करेल. दिवस  बरा आहे.

कन्या

आज दिवस पाहुणे रावळे  येण्याचा त्यांची सरबराई करण्याचा  आहे. समाजात, मित्र मैत्रिणींना भेटणे तुम्हाला आवडते. पण फार कष्ट करू नका. मोठ्या  व्यक्ती भेटतील. भाग्यशाली रास.

तुला

आज शनिवार, तुमचे काही प्रवासाचे कार्यक्रम ठरले असतील. पण जपून रहा. कुठेही  अनावश्यक धाडस  नको. काही कारणाने  आर्थिक खर्च  पण बराच होईल. भावंडाची भेट होईल. दिवस  चांगला आहे.

वृश्चिक

आर्थिक लाभ, त्याबरोबर कौटुंबिक, सामाजिक जबाबदाऱ्या, त्यासाठी  कष्ट  असा आजचा दिवस आहे. अजाणता कोणाला शब्द देऊ नका. राशीतील केतू धार्मिक कार्यासाठी शुभ आहे. दिवस  उत्तम.

धनु

प्रगतीशील दिवस. मन स्थिर राहील. प्रवास टाळा. घरात शांतता राहील. शत्रू दबून राहतील. आज दिवस  शांततेने व्यतीत करण्याचा आहे. मंगळाचा जप, दान करावे.

मकर

आज कुणावर  विसंबून राहणे  तुम्हाला  महागात पडेल. व्ययस्थानातील चंद्र तुम्हाला  त्रासदायक ठरू शकतो. शनिवार अणि 8 अंक. मकर राशीच्या  व्यक्तीसाठी आजचा दिवस जपून राहण्याचा आहे.

कुंभ

राशीत गुरू अणि लाभात चंद्र आज तुम्हाला  शुभ फळ  देईल. मात्र शनी मंगळ प्रतियोग  सुरू आहे. अवाजवी धाडस करू नका. आर्थिक व्यवहार जपुन करा. नातेवाईकांना महत्व द्या. दिवस चांगला.

मीन

सुट्टी असूनही कुठल्याही प्रकारे  तुम्हाला व्यस्त रहाण्याचा आज दिवस आहे. यश मिळेल पण काम एकाग्रतेने करा. परिस्थितीनुसार  निर्णय घ्या. आर्थिक बाजु  सांभाळा. भावंडाची काळजी घ्या. दिवस चांगला  आहे.

शुभम भवतु!!

First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya, Zodiac signs