Home /News /astrology /

राशीभविष्य: आज सूर्य कर्क राशीत प्रवेश करणार; कुणाला लाभणार हा काळ?

राशीभविष्य: आज सूर्य कर्क राशीत प्रवेश करणार; कुणाला लाभणार हा काळ?

ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींचं वेगळं महत्त्व आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींचं वेगळं महत्त्व आहे.

आज दिनांक 17 जुलै 2021 शनिवार. तिथी आषाढ शुद्ध अष्टमी. आजचे महत्त्वाचे राश्यांतर म्हणजे सूर्याचा कर्क राशीत झालेला प्रवेश. तिथे तो साधारण एक महिना असेल. त्यानुसार पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

आज दिनांक 17 जुलै 2021 शनिवार. तिथी आषाढ शुद्ध अष्टमी..चंद्र आज दुपारनंतर तुला राशीत  भ्रमण करेल. आजचं महत्त्वाचं राश्यांतर  म्हणजे  सूर्याचा  कर्क राशीत झालेला प्रवेश. तिथे तो साधारण एक महिना असेल. त्यानुसार पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष राशीच्या चतुर्थ स्थानात प्रवेश करणारा सूर्य  घराविषयी  शुभ घटना घडवून आणेल. बरेच दिवस रेंगाळणारी घराची कामे आता पटापट होतील. ऑफिस मध्ये  तुमचा अधिकार वाढेल. लोक तुमच्या मतांचा आदर करतील. दुपारनंतर दिवस अनुकूलता वाढवणारा आहे. वृषभ तृतीय स्थानात प्रवेश करणारा  रवि पराक्रमाची वाढ करेल. स्वभाव तेजस्वी होईल. रवि मंगळ युती बोलण्यात तिखट पणा आणेल. पण कोणाला दुखावून चालणार नाही. विशेष म्हणजे भावंडाना. दुपारनंतर मानसिक ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे. मिथुन धनस्थानात प्रवेश करणारा सूर्य हा राजकीय कामांसाठी उत्तम  सरकारी नोकरी असणार्‍यांना आर्थिक लाभ संभवतात. प्रगतीच्या नवीन संधी येतील. डोळ्यांची काळजी घ्या.  शनीची उपासना करा. दुपारनंतर दिवस  अनुकूल आहे. कर्क राशीत प्रवेश करणारा सूर्य तुम्हाला सरकारी नोकरीची संधी मिळवून देईल. किंवा सरकारी कामे होतील. बॅंकिंग क्षेत्रात  नवीन संधी निर्माण होईल. सूर्य शनी प्रतियोग वडिलांना फारसा अनुकूल नाही. मतभेद संभवतात. दुपारनंतर  जरा आराम करा . सिंह व्यय स्थानात येणारा सूर्य शनिच्या प्रतियोगात असल्यामुळे त्यांचे तीव्र परिणाम होणार आहेत. सरकारी कायदे, टॅक्स वगैरे अगदी कटाक्षाने पाळा. आरोग्य संभाळावे  लागेल. पैतृक संपत्ती संबंधी काही अडचणी येतील. दुपारनंतर दिवस शुभ आहे. कन्या लाभ स्थानात येणारा सूर्य आणि तिथे असलेला मंगळ शुक्र यांचे  काही अचानक परिणाम होतील. मित्रांशी बोलाचाली, मुलांशी वाद होतील. दुपारनंतर आर्थिक लाभ संभवतात. प्रकृती ठीक राहील. तुला दशमातील सूर्य मंगळ  प्रगतीचे नवीन दालन उघडतील. पुढील महिना तुमच्या करिअर साठी सर्वोत्तम आहे. मुलाखत यशस्वी झाल्याने आत्मविश्वास वाढेल. पण वडीलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. दुपारनंतर राशीत येणारा चंद्र  मौजमजेसाठी अनुकूल आहे. वृश्चिक भाग्य स्थानात प्रवेश करणारा  रवि अचानक नवीन संधी घेऊन येईल. वडिलोपार्जित संपत्ती संबंधी निर्णय होईल. धार्मिक निष्ठा तीव्र होतील. परदेशी प्रवासासाठी अनुकूल काळ. दुपारनंतर मानसिक ताण जाणवत असेल तर  घरी  आराम करा. धनु अष्टमात असलेला मंगळाची रवि सोबत होणारी युती आज घातक सिद्ध होऊ शकते. एकट्याने प्रवास करणे टाळा. घातपात, लागणे यापासून जपा. काहींना अचानक आर्थिक लाभ होतील. पण सर्व व्यवहार  जपून व कायद्याच्या चौकटीत राहून करा. दुपारनंतर दिवस चांगला जाईल. शनी स्तोत्र वाचावे. मकर राशीतील शनिच्या समोर येणारे रवि मंगळ  जपून राहण्याचे संकेत देत आहेत. जोडीदाराची काळजी घ्या. शक्यतो दोघांनी कुठे जाणे, प्रवास  टाळा. कोणाशी शाब्दिक वाद नको. मात्र व्यवसाय असणार्‍यांना सरकारी मदत मिळेल. दुपारनंतर अचानक कामाचा ताण वाढेल. शनी जप, दान करावे. कुंभ षष्ठ स्थानात प्रवेश करणारा रवि सरकारी कामांसाठी शुभ आहे  .अडचणी येतील पण काम होईल. रक्तदाब असणार्‍यांनी सावध राहावे. प्रकृतीच्या तक्रारी कडे लक्ष द्यावे. शत्रू पिडा वाढेल  पण जिंकणार तुम्हीच. दुपारनंतर दिवस शुभ. शनीची उपासना करावी. मीन पंचमात येणारा रवि  शनि प्रतियोग मुलांसाठी फारसा शुभ नाही. प्रकृती, पोटाचे त्रास, किंवा काही कायदेशीर बाबी समोर येतील. तुमच्या साठी  धार्मिक वाचन, काही नवीन शिकण्यास अनुकूल वेळ आहे. दुपारनंतर दिवस, कष्टीक, कंटाळवाणा होईल . शुभम भवतु !!
Published by:Prem Indorkar
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या