मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /राशीभविष्य : कशी आहे आठवड्याची सुरुवात? 'या' राशीच्या लोकांनी आज जरा सांभाळा

राशीभविष्य : कशी आहे आठवड्याची सुरुवात? 'या' राशीच्या लोकांनी आज जरा सांभाळा

आज सोमवार दिनांक 12 जुलै. आषाढ शुद्ध द्वितीया. आज चंद्र कर्क राशीत भ्रमण करेल.

आज सोमवार दिनांक 12 जुलै. आषाढ शुद्ध द्वितीया. आज चंद्र कर्क राशीत भ्रमण करेल.

आज सोमवार दिनांक 12 जुलै. आषाढ शुद्ध द्वितीया. आज चंद्र कर्क राशीत भ्रमण करेल.

आज सोमवार दिनांक 12 जुलै. आषाढ शुद्ध द्वितीया. आज चंद्र कर्क राशीत भ्रमण करेल.

मेष

आज तुम्हाला दिवस शुभ असुन सूर्य आणि गुरु बुध शुभ योगाचे उत्तम फळ मिळेल प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील. अविवाहित व्यक्तींसाठी लवकरच छानसा प्रस्ताव येईल .गृहसौख्य उत्तम. दिवस शुभ.

वृषभ

आज आश्लेषा नक्षत्रात चंद्र  भ्रमण सुखद आहे. राशीतील राहू, आणि शनि थोडी नकारात्मक मानसिकता करतील. पण तुम्ही प्रयत्‍न पूर्वक त्यावर विजय मिळवाल. आर्थिक बाजू ठीक राहील. दिवस चांगला आहे.

मिथुन

आज धन स्थानातील चंद्र भ्रमण अनुकूल फळ देणार आहे. राशीतील रवि बुध संभाषण चातुर्य आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व देईल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. दिवस शुभ.

कर्क

राशीतील चंद्र मंगळ तुम्हाला धाडस आणि फिरण्याची आवड निर्माण करणार आहे.व्ययस्थानातील सूर्य डोळ्या संबंधी काही विकार  निर्माण करेल .काळजी घ्या.

सिंह

आज चंद्र मंगळ योग आर्थिक हानी, शारीरिक कष्ट दाखवत आहे. दिवस कामात व्यस्त असा जाईल. काहीतरी हुरहुर लावणारा दिवस आहे. राशी स्वामी रवि मात्र लाभ मिळवुन देईल.

कन्या

राशी स्वामी बुध कार्य क्षेत्रात उच्चीचा होउन तुम्हाला उत्कृष्ट फळ, अधिकार बहाल करण्यास मदत करेल. चंद्र मंगळ केलेल्या कष्टाचे फळ देतील. प्रकृती ठीक राहील. दिवस शुभ.

तुला

आज ऑफिस मध्ये भरपूर काम असणार आहे .मात्र त्यात तुम्हाला आनंद मिळेल .भाग्य कारक दिवस आहे. नोकरी व्यवसायात नवीन संधी मिळतील .दिवस चांगला आहे.

वृश्चिक

आज दिवस उत्तम असून नवीन संधी ,प्रवास, आप्त परिवार भेट करुन देणारा ठरेल .घरात शांतता व आनंद राहील .छोटीशी मेजवानी आयोजित कराल. शुभ दिवस.

धनु

आज दिवस अनुकूलता वाढवणारा आहे. 2 दिवस जाणवणारा ताण कमी होऊ लागेल. भागीदारी मध्ये चांगले यश मिळेल. आर्थिक त्रास मात्र  जाणवेल.

मकर

आजचा दिवस  व्यवसाय पूरक आहे..काही  निर्णय होतील. जे फायद्याचे ठरतील. पती पत्नी एकमेकांना समजून घेतील. नोकरी नवीन संधी मिळतील. दिवस शुभ आहे.

कुंभ

आज आपण आजारी आहोत असे वाटेल .पण काम करावे लागेल मात्र थोडा वेळ स्वतःला द्या. थोडा आराम करा. मानसिक ताण जाणवत असेल तर  काही उपाय करा. दिवस मध्यम आहे.

मीन

मुलांना नवीन खरेदी करण्याची इच्छा होईल. तुम्ही ती आनंदाने पूर्ण करणार आहात. काही विशेष अध्यात्मिक साधना करण्यासाठी फार शुभ दिवस असून दिवस आनंदात घालवा.

शुभम भवतु!!

First published:
top videos

    Tags: Rashibhavishya, Rashichark